Site Search
Input language:
-
पु. १ ( एखाद्या पदार्थाचा ) खालचा भाग , बूड . २ जमीन ; जमीनीचा पृष्ठभाग . दोन्ही दळभारा देषता । प्रद्मने ( प्रद्युम्ने ) आणीला तळा । - उषा १४१५ . ३ ( झाड , छपर इ० कांच्या ) खालील जागा , जमीन . लपे आत्मभ्रांतिछाया । आपणया तळी । - ज्ञा १६ . १० . ४ सैन्य ; स्वारी इ० कांची मुक्कामाची जागा छावणीचा गोठा ; शिबिर ; कँप . ( क्रि० घालणे , देणे ; मांडणे ; धरणे ; पडणे ; येणे ; सोडणे ). महाराणीसाहेबांचा तळ बडोदे मुक्कामी ज्या राजवाड्यांत मुक्काम असेल तेथील पाहरे - बडोदे , राजमहाल , कामगारी - कारकून नियम ७ . ५ पृष्ठभाग ; सपाट भाग . जसे हाताचा पायाचा तळ . ऐसे चारी हे सरळ । करचरणतळ । - ज्ञा १४ . १०३ . पृथ्वीतळ उलथो पहात । - ज्ञा १ . १५६ . ६ व्यापारी , प्रवासी , लमाण , गाड्या , घोडी इ०कांच्या मुक्कामाची जागा , अड्डा . ७ एखाद्या ठिकाणी काही काळ झालेले सैन्याचे वास्तव्य ; मुक्काम ; छावणी , कँप . ८ एख्याद्या पदार्थाच्या राशीने व्यापलेली जागा ; पदार्थ ज्या ठिकाणी असेल ती जागा . ( पदार्थ हलविताना , तेथून दुसरीकडे नेतांना सापेक्षतेने या शब्दाचा उपयोग करतात ). आंबे सगळेच नेऊ नकोस , कांही तळावर ठेव ., ९ विस्तृत व सपाट भूभाग ; मैदान ; सपाट प्रदेश . या तळाची प्रदक्षिणा चार कोसांची आहे . बूट , जोडा इ० कांचा खालचा ( ज्यावर पाय टेकतात तो ) भाग ; तळवा ; जोड्याच्या तळव्यांतील चामड्याचा तुकडा . ११ ( - न ) कुंभाराच्या चाकाच्या मध्याची फळी , १२ नाश ; रसातळ . मानी मेलाचि जरि दुर्जय तरि निजशतात्मजरिपु तळा । - मोस्त्री २ . २२ . १३ . ( वणजारी ) तांडा . [ सं . तल ; फ्रे . जि . तलै = खाली , आंत ] ( वाप्र . )
-
०करणे मुक्काम करुन राहणे ; डेरा देणे ; बिर्हाड लावणे ,
-
०घालून - १ ( एखाद्या ठिकाणी ) कायम वस्तीच्या इराद्याने राहणे ; उतरणे ; आसन ; ठाण मांडणे . २ दुसर्यांचा पैसा गिळंकृत करुन , लुबाडून बेदरकारपणे स्वस्थ आणि निर्धास्त राहणे . तळ मारणे . तळची - तळपायाची आग मस्तकात जाणे - ( कर्त्याची षष्ठी ) रागाने नखशिखान्त संतप्त होणे ; अतिशय राग येणे . तळचे मडके हाणणे - फोडणे - ( मडक्यांच्या उतरंडीतील सर्वात खालचे मडके फोडणे ) ( ल . ) मुळावरच घाव घालणे ; समूळ नाश करणे .
-
बसणे - १ ( एखाद्या ठिकाणी ) कायम वस्तीच्या इराद्याने राहणे ; उतरणे ; आसन ; ठाण मांडणे . २ दुसर्यांचा पैसा गिळंकृत करुन , लुबाडून बेदरकारपणे स्वस्थ आणि निर्धास्त राहणे . तळ मारणे . तळची - तळपायाची आग मस्तकात जाणे - ( कर्त्याची षष्ठी ) रागाने नखशिखान्त संतप्त होणे ; अतिशय राग येणे . तळचे मडके हाणणे - फोडणे - ( मडक्यांच्या उतरंडीतील सर्वात खालचे मडके फोडणे ) ( ल . ) मुळावरच घाव घालणे ; समूळ नाश करणे .