मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|

एकपाद विपरीत दंडासन १ **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ५२१)
एकपाद म्हणजे एक पाय. विपरीत म्हणजे उलटे किंवा उफराटे. दंड म्हणजे काठी किंवा दांडके (अधिकार अथवा शासन यांचे प्रतीक) किंवा शरीर. हे आसन म्हणजे द्विपाद विपरीत दंडासनाचा (चित्र क्र.५१६) पुढला टप्पा आहे.

पध्दती
१. द्विपाद विपरीत दंडासन करा. (चित्र क्र.५१६)
२. श्वास सोडून डावा पाय काटकोनात वर उचला. त्याच वेळी उजवा पाय विपरीत दंडासनात (चित्र क्र. ५२१) जमिनीवर ठेवा.
३. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत १० सेकंद राहा.
४. डावा पाय खाली आणून विपरीत दंडासनात या. मग श्वास सोडून उजवा पाय विपरीत दंडासनात (चित्र क्र. ५२१) जमिनीवर ठेवा.
३. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत १० सेकंद राहा.
४. डावा पाय खाली आणून विपरीत दंडासनात या. मग श्वास सोडून उजवा पाय काटकोनात वर नेऊन हे आसन आधीच्या इतका वेळ करा.
५. पुन्हा विपरीत दंडासनात येऊन जमिनीवर विसावा घ्या.
६. प्रगत अभ्यासकांनी वाटल्यास दोन्ही पाय वर नेऊन सालंब शीर्षासन १ (चित्र क्र. १९०) करावे, मग ते जमिनीवर आणून विसावा घ्यावा किंवा ऊर्ध्व धनुरासन (चित्र क्र.४८६) करुन ताडासनात उभे राहावे (चित्र क्र.१) किंवा विपरीत चक्रासनात जावे (चित्र क्र. ४८८ ते ४९९).

परिणाम
या आसनामुळे कणा सुधारतो व छाती पूर्ण फुगवली जाते. त्याबरोबरच शीर्षासनाचेही (चित्र क्र.१९०) लाभ मिळतात. ह्या आल्हाददायक आसनामुळे मनालाही शांतता मिळते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP