मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
गोरक्षासन *

गोरक्षासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ११७)
गोरक्ष म्हणजे गुराखी. हे एक तोल सांभाळण्याचे कठीण आसन आहे आणि अगदी थोडेसे सेकंद जरी ह्या आसनात तोल सांभाळता आला तरी उल्हास वाटू लागतो.

पध्दती
१. पद्मासन करा. (चित्र क्र. १०४) आता हात पुढे लांबवा आणि ते जमिनीवर ठेवा.
२. हाताच्या पंज्यांवर भार देऊन ढुंगण जमिनीवरुन उचला.
३. धड सरळ वरच्या दिशेने खेचा आणि गुडघ्यांचा वरचा भाग जमिनीवर टेकून उभे राहा.
४. मांडया ताणा आणि प्रथम एक पंजा व नंतर दुसरा पंजा जमिनीवरुन उचलून शरीर तोलून धरा.
५. तोल सांभाळला गेला म्हणजे छातीसमोर हात जुळवा आणि शक्य तितका अधिक वेळ या स्थितीत राहा. (चित्र क्र. ११७)
६. पाय जमिनीवर ठेवा. खाली बसा आणि पाय मोकळे करा.
७. मांडी बदला आणि हे आसन आधीच्या इतकाच वेळ पुन्हा करा.

परिणाम
या आसनामुळे पद्मासनाचे (चित्र क्र. १०४) फायदे मिळतातच, पण त्याशिवाय शरीराला तोल येतो. हे आसन केल्यामुळे गुदास्थी लवचिक बनते.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP