मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
रुचिकासन *

रुचिकासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३८४ व ३८५)
रुचिक हे एका ऋषीचे नाव असून विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम हा याचा नातू होय.

पध्दती
१. दुर्वासासन (चित्र क्र. ३८३) पूर्ण केल्यानंतर श्वास सोडा. धड पुढे वाकवा. उजव्या पावलाच्या दोन बाजूंना तळहात टेका. (चित्र क्र. ३८४ व ३८५)
२. डावा पाय मानेच्या बाजूवरुन घसरु न देता डोके उजव्या गुडघ्यावर टेका. नंतर हळूहळू मान पुढे ताणून उत्तानासनातल्याप्रमाणे (चित्र क्र. ४८) हनुवटी उजव्या गुडघ्याला स्पर्शू द्या.
३. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत सुमारे १५ सेकंद राहा.
४. उजवा गुडघा वाकवा. जमिनीवर बसा. मानेच्या मागच्या बाजूवरुन डावा पाय खाली आणा आणि विसावा घ्या.
५. त्यानंतर उजवा पाय मानेच्या मागे ठेवा. आणि वर दिलेल्या सूचनेमध्ये ‘डावा’ ऐवजी ‘उजवा’ व ‘उजवा’ ऐवजी ‘डावा’ अशी उलटापालट करुन वरील सर्व आसनचक्र पुन्हा करा.

एकपाद शीर्षासनचक्रातील आसनांचे परिणाम
या आसनचक्रातील विविध कृतींमुळे सर्व शरीरातेल स्नायुसंस्था, मज्जासंस्था आणि रक्ताभिसरणसंस्था सुधारतात. पाठीच्या कण्यामध्ये रक्ताचा उत्तम पुरवठा होऊ लागतो. आणि पाठीच्या कण्यातील विविध चक्रांना अधिक शक्ती मिळू लागते. या आसनामुळे छाती विकसित होते; तसेच श्वासोच्छ्‍वास अधिक भरघोसपणे होऊ लागून शरीराला अधिक कणखरपणा मिळतो. शरीरातील प्रत्येक भागाला शुध्द रक्ताचा पुरवठा होतो. व साकळलेले रक्त शुध्दीकरणासाठी हृदय आणि फुप्फुसे यांच्याकडे येते, त्यामुळे विषद्रव्ये शरीरातून बाहेर घालविली जातात. ही आसने नियमित केल्यास रक्तातील हेमोग्लोबिनचे प्रमाण सुधारते; शरीर व मन जोमदार बनतात आणि कार्यक्षमता वाढते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP