मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
पिंडासनायुक्त शीर्षासन *

पिंडासनायुक्त शीर्षासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. २१८)
पिंड म्हणजे गर्भ. पद्मासनयुक्त शीर्षासन (चित्र क्र. २११) केल्यावर कंबर वाकविली जाते. आणि बगलांना स्पर्शतील अशा रीतीने पाय खाली आणले जातात.

पध्दती
१. वर वर्णन केल्याप्रमाणे पद्मासनयुक्त शीर्षासन (चित्र क्र. २११) करा. श्वास सोडा. कंबर वाकवा (चित्र क्र. २१७) आणि दोनदा श्वास घ्या. नंतर श्वास सोडून दोन्ही पाय बगलांच्या जवळ दंडांना स्पर्शतील अशा रीतीने खाली आणा. (चित्र क्र. २१८)
२. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीमागे २० ते ३० सेकंद राहा.
३. श्वास घ्या. पुन्हा ऊर्ध्वपद्मासनात जा. मांडी मोडा आणि काही काळ शीर्षासनात राहा. नंतर मांडी बदला आणि हे आसन पुन्हा करा.
४. मांडी घातलेल्या पायांना, आधी एक व नंतर दुसरा अशा तर्‍हेने विसावा द्या. पाय ताणून पुन्हा शीर्षासनात या. श्वास सोडून हळू हळू पाय खाली आणा आणि सरळ जमिनीवर टेका.

परिणाम
आधीच्या आसनाखेरीज परिणाम या आसनामुळे होतात. त्याशिवाय पोटातील अवयव आकुंचित झाल्यामुळे आणि रक्तप्रवाह वाढल्यामुळे सुधारतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 11, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP