मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया| वीरासन * योगासने, बंध आणि क्रिया ताडासन * वृक्षासन * उत्थित त्रिकोणासन * परिवृत्त त्रिकोणासन * उत्थित पार्श्व कोणासन * परिवृत्त पार्श्वकोणासन * वीरभद्रासन १ * वीरभद्रासन २ * वीरभद्रासन ३ * अर्धचंद्रासन * उत्थित हस्तपादांगुष्ठासन * पार्श्वोत्तानासन * प्रसारित पादोत्तानासन १ * प्रसारित पादोत्तानासन २ * परिघासन * उष्ट्रासन * उत्कटासन * पादांगुष्ठासन * पादहस्तासन * उत्तासन * ऊर्ध्व प्रसारित एकपादासन * अर्ध बध्द पद्मोत्तानासन * गरुडासन * वातायनासन * शलभासन * मकरासन * धनुरासन * पार्श्वधनुरासन * चतुरंग दंडासन * नक्रासन * भुजंगासन १ * ऊर्ध्वमुख श्वानासन * अधोमुख श्वानासन * परिपूर्ण नावासन * दण्डासन * अर्धनावासन * गोमुखासन * लोलासन * सिध्दासन * वीरासन * सुप्त वीरासन * पर्यकासन * भेकासन * बध्द कोणासन * पद्मासन * षण्मुखी मुद्रा * पर्वतासन * तोलासन * सिंहासन १ * सिंहासन २ * मत्स्यासन * कुक्कुटासन * गर्भपिंडासन * गोरक्षासन * बध्दपद्मासन * योगमुद्रासन * सुप्त वज्रासन * महामुद्रा पाच * जानुशीर्षासन * परिवृत्त जानु शीर्षासन * अर्ध बध्द पद्म-पश्चिमोत्तानासन * त्र्यंग मुखैकपाद पश्चिमोत्तानासन * क्रौंचासन * मरीचासन १ मरीच्यासन २ * उपविष्ट कोणासन * पश्चिमोत्तानासन * परिवृत पश्चिमोत्तानासन * उभय पादांगुष्ठासन * ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन १ * पूर्वोत्तानासन * आकर्ण धनुरासन * सालंब शीर्षासन १ * ऊर्ध्वदंडासन * सालंब शीर्षासन २ * सालंब शीर्षासन ३ * बध्दहस्त शीर्षासन * मुक्त हस्त शीर्षासन * पार्श्व शीर्षासन * परिवृत्तैकपाद शीर्षासन * एकपाद शीर्षासन * पार्श्वैकपाद शीर्षासन * ऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन * पार्श्वऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन * पिंडासनायुक्त शीर्षासन * सालंब सर्वांगासन १ * सालंब सर्वांगासन २ * निरालंब सर्वांगासन १ * निरालंब सर्वांगासन २ * हलासन * कर्णपीडासन * सुप्तकोणासन * पार्श्व हलासन * एकपाद सर्वांगासन * पार्श्वैकपाद सर्वांगासन * पार्श्वसर्वांगासन * सेतुबंध सर्वांगासन किंवा उत्तान मयूरासन * एकपाद सेतुबंध सर्वांगासन किंवा एकपाद उत्तान मयूरासन * ऊर्ध्व पद्मासनयुक्त सर्वांगासन * ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन २ * पिंडासनयुक्त सर्वांगासन * पार्श्वपिंडासनयुक्त सर्वांगासन * जठर परिवर्तनासन * ऊर्ध्व प्रसारित पादासन * चक्रासन * सुप्तपादांगुष्ठासन * अनंतासन * उत्तान पादासन * सेतुबंधासन * भारद्वाजासन १ * भारद्वाजासन २ * मरीच्यासन १ * मरीच्यासन २ * अर्ध मत्स्येंद्रासन १ * अर्धमत्स्येंद्रासन २ * अर्ध मत्स्येंद्रासन ३ ** परिपूर्ण मत्स्येंद्रासन ** मालासन १ * मालासन २ * पाशासन * अष्टा वक्रासन * एकहस्तभुजासन * द्विहस्त भुजासन * भुजपीडासन * मयूरासन * पद्म मयूरासन * पिंचमयूरासन * हंसासन * शयनासन * अधोमुख वृक्षासन * कूर्मासन * सुप्त कूर्मासन * एकपाद शीर्षासन * स्कंदासन * बुध्दासन * कपिलासन * भैरवासन * कालभैरवासन * चकोरासन * दुर्वासासान ** रुचिकासन * विरंच्यासन १ * विरंच्यासन २ * योगनिद्रासन * द्विपाद शीर्षासन ** टिट्टिभासन ** वसिष्ठासन * कश्यपासन * विश्वामित्रासन * बकासन * पार्श्वबकासन * ऊर्ध्व कुक्कुटासन * पार्श्वकुक्कुटासन * गालवासन * एकपाद गालवासन * द्विपाद कौंडिण्यासन * एकपाद कौंडिण्यासन १ ** एकपाद कौंडिण्यासन २ ** एकपाद बकासन १ ** एकपाद बकासन २ ** योगदंडासन * सुप्त भेकासन ** मूलबंधासन ** वामदेवासन १ * वामदंडासन २ * कंदासन ** हनुमानासन ** समकोणासन ** सुप्त त्रिविक्रमासन ** ऊर्ध्व धनुरासन १ * ऊर्ध्वधनुरासन २ * विपरीत चक्रासन युक्त ऊर्ध्व धनुरासन ** एकपाद ऊर्ध्व धनुरासन * कपोतासन ** लघुवज्रासन ** द्विपाद विपरीत दंडासन ** एकपाद विपरीत दंडासन १ ** एकपाद विपरीत दंडासन २ ** चक्रबंधासन ** मंडलासन ** वृश्चिकासन १ ** वृश्चिकासन २ ** एकपाद राजकपोतासन १ ** वालखिल्यासन ** एकपाद राजकपोतासन १ ** एकपाद राजकपोतासन २ ** एकपाद राजकपोतासन ३ ** भुजंगासन ** राजकपोतासन ** पादांगुष्ठ धनुरासन *** घेरंडासन १ *** घेरंडासन २ *** कपिंजलासन *** शीर्षपादासन *** गंड भेरंडासन *** विपरीत शलभासन *** त्र्यंग मुखोत्तानासन *** नटराजासन *** शवासन (मृतासन) * उड्डियानबंध * नौली सोळा * बंध नाडया आणि चक्रे वीरासन * प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे. Tags : scienceyogaयोगशास्त्रशास्त्र वीरासन * Translation - भाषांतर (चित्र क्र. ८९)वीर म्हणजे योध्दा किंवा विजेता. गुडघा जुळवून पाय पसरुन आणि ते पुठ्ठयाशेजारी टेकून, बसून करण्याचे हे आसन आहे. ध्यान आणि प्राणायाम यांसाठी ते उपयुक्त आहे. पध्दती १. जमिनीवर गुडघे टेका. गुडघे एकत्र जुळवून ठेवा आणि पावलांमध्ये १८ इंच अंतर ठेवून पाय पसरा. २. कुल्ले जमिनीवर टेका. परंतु शरीर पावलांवर ठेवू नका. पावले मांडयांच्या शेजारी ठेवा. पोटरीची आतली बाजू ही त्या बाजूच्या मांडीच्या बाहेरच्या बाजूला चिकटेल अशा तर्हेने बसा. बोटे मागे रोखलेली आणि जमिनीला स्पर्शिणारी असू द्या. मनगटे गुडघ्यांवर ठेवा. तळहात वर वळवलेले असू द्या. आणि अंगठा व पहिल बोट एकत्र जुळवा. इतर बोटे उघडलेली असू द्या. पाठ सरळ व ताठ ठेवा. (मागील दृश्य : चित्र क्र. ८९)३. दीर्घ श्वसन करीत शक्य तितका अधिक काळ या स्थितीत राहा. ४. मग तळहात काही काळ गुडघ्यांवर विसावू द्या. (बाजूचे दृश्य : चित्र क्र. ९०) ५. आता बोटे एकमेकांमध्ये गुंफा आणि हात सरळ डोक्यावर ताणा. तळहात वरच्या दिशेला असू द्या. (चित्र क्र. ९१) ६. दीर्घ श्वसन करीत या स्थितीत एक मिनिट राहा. ७. श्वास सोडा. बोटे मोकळी करा. तळहात चवडयावर ठेवा. पुढे वाका आणि हनुवटी गुढग्यांवर टेका. (चित्र क्र. ९२)८. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत एक मिनिट राहा. ९. श्वास घ्या. धड वर उचला. पावले पुढे आणा आणि विसावा घ्या. १०. हे आसन वर वर्णिल्याप्रमाणे करणे कठीण वाटले, तर एका पावलावर दुसरे पाऊल ठेवून आणि त्यावर कुल्ले टेकून हे आसन करा. (चित्र क्र. ८५) हळूहळू पायाची बोटे एकमेकांपासून दूर हलवा. पावलांमधील अंतर वाढवा. (चित्र क्र. ८६ आणि ८७) आणि मांडयांच्या बाहेरच्या बाजूला ते टेकलेले राहू द्या. मग हळूहळू कुल्ले योग्य तर्हेने जमिनीवर टेकू लागतील आणि शरीराचा भार पावलांवर पडेनासा होईल. परिणामसंधिवातामुळे गुडघ्यात येणार्या कळा या आसनामुळे बर्या होतात. तळपायामधील सपाटपणा नाहीसा होतो. घोटे आणि पावले यांना या आसनात ताण बसतो. त्यामुळे तेथे योग्य तर्हेची कमान निर्माण होते. अर्थात ह्याला बराच काळ लागतो आणि कित्येक महिने दररोज काही मिनिटे हे आसन करावे लागते. टाचेमध्ये वेदना होत असतील किंवा टाचेमधील हाड वाढले असेल तर ते बरे होते. जेवण किंवा खाणे झाल्यावर लगेच सुध्दा हे आसन करता येते आणि त्यामुळे जड झालेले पोट हलके होते. N/A References : N/A Last Updated : September 09, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP