मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|

कपिलासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३७४)
कपिल हे एक महान ऋषी होऊन गेले. सांख्य तत्त्वज्ञान त्यांनी प्रतिष्ठापित केले असे सांगतात. हे आसन म्हणजे बुध्दासनाचा (चित्र क्र. ३७३) पुढचा टप्पा.

पध्दती
१. मानेच्या पाठीमागे डावा पाय ओढून हाताची पकड बुध्दासनातल्याप्रमाणेच ठेवा. श्वास सोडा. धड पुढे वाकवा. पश्चिमोत्तानासनातल्याप्रमाणे (चित्र क्र. १६०) लांबवलेल्या उजव्या गुडघ्यावर हनुवटी टेका.
२. दीर्घ श्वसन करीत या स्थितीत १० ते १५ सेकंद राहा. श्वास घ्या. डोके आणि धड वर उचला आणि हाताची पकड सोडा.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP