मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
मरीच्यासन २ *

मरीच्यासन २ *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १४६ व १४७)
पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. डावा पाय गुडघ्याशी वाकवा. डावे पाऊल उजव्या मांडीच्या मुळाशी ठेवा. डावी टाच बेंबीवर दाबलेली असावी आणि बोटे ताणलेली व समोर रोखलेली असावीत. आता डावा पाय अर्धपद्मासनामध्ये असेल.
३. उजवा पाय गुडघ्याशी वाकवा. उजव्या पायाचा चवडा आणि टाच जमिनीवर टेकवा. उजव्या, पायाची नडगी काटकोनात ठेवा. उजवी मांडी आणि उजवी पोटरी एकमेकांना स्पर्शू द्या. उजवी टाच शिवणीला लावून ठेवा.
४. किंचित पुढे वाका. उजवी बगल काटकोनातील उजव्या नडगीला स्पर्शेल इतका उजवा खांदा पुढे न्या. श्वास सोडून उजवा हात उजवी नडगी आणि मांडी त्यांच्याभोवती वेढा. उजवे कोपर वाकवा. आणि कोपरापासून पुढला हात पाठीमागे कंबरेजवळ न्या. नंतर डावा हात पाठीमागे न्या आणि उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडा. (चित्र क्र. १४५)
५. पाठीचा कणा वरच्या दिशेला ताणा आणि दीर्घ श्वसन करीत या स्थितीत काही सेकंद राहा.
६. श्वसन सोडा. धड आणि डोके पुढे न्या. आणि वाकवलेल्या डाव्या गुडघ्यावर डोके टेका. नंतर मान ताणून हनुवटी डाव्या गुडघ्यावर टेका. (चित्र क्र. १४६ आणि १४७) हीच हालचाल ३ ते ४ वेळा पुनरावृत्त करा. डोके व धड वर उचलताना श्वास घ्या आणि खाली नेताना श्वास सोडा.
७. श्वास घ्या. डोके आणि धड वर उचला. हात मोकळे करा. पाय लांब करा. आणि उलटया बाजूने आधीच्याइतकाच वेळ हे आसन पुन्हा करा.

परिणाम
हे आसन मरीच्यासन १ (चित्र क्र. १४४) या आसनाचाच अधिक तीव्र असा प्रकार आहे. त्याचे लाभही अधिक प्रमाणात मिळतात. बेंबीवरील टाचेमुळे पोटावर अधिक दाब येतो. त्यामुळे पोटातेल अवयव अधिक चांगल्या तर्‍हेने सशक्त बनतात. तसेच पचनशक्तीही वाढते.

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP