मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|

चकोरासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३७९ आणि ३८०)
चकोर हा तीतरासारखा किंवा कवडयासारखा एक पक्षी. हा चंद्रकिरणांचे भक्षण करुन जगतो असे म्हणतात.

पध्दती
१. कालभैरवासन (चित्र क्र. ३७५) केल्यानंतर उजवा तळहात जमिनीवर ठेवा. उजवा गुडघा वाकवा. डावा पाय मानेच्या पाठीमागे ठेवलेल्या अवस्थेत जमिनीवर बसा. अशा तर्‍हेने एकपाद शीर्षासनात या (चित्र क्र. ३७१).
२. दोन्ही तळहात कंबरेजवळ जमिनीवर टेका.
३. कुल्ले जमिनीवरुन उचला आणि शरीर तळहातावर तोलून धरा. लांबवलेला उजवा पाय, जमिनीपासून ६० अंश ते ७५ अंश चा कोन होईल अशा रीतीने, वर उचला. (चित्र क्र. ३७९ व ३८०) नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत शक्य तितका वेळ राहा.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP