मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
परिवृत्त त्रिकोणासन *

परिवृत्त त्रिकोणासन *

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.


(चित्र क्र. ६ व ७)
परिवृत्त म्हणजे फिरवलेला किंवा भोवती अगर मार्ग वळविलेला. फिरवलेल्या त्रिकोणाच्या स्थितीवर आधारलेले हे आसन आहे. याच्यातील स्थिती (चित्र क्र. ४) उत्थित त्रिकोणासनाच्या उलट असते.

पध्दती
१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्र. १) दीर्घ श्वास घ्या, आणि उडी मारुन पाय दोन बाजूस फाका. पावले तीन ते साडेतीन फूट अंतरावर ठेवा. हात बाजूंनी उचला आणि खांद्याच्या रेषेत आणा. तळहात जमिनीकडे वळवा. (चित्र क्र.३)
२. उजवे पाऊल ९० अंशांनी उजवीकडे वळवा. डावे पाऊल ६० अंशांनी उजवीकडे वळवा. डावा पाय सरळ ताणलेला आणि गुडघ्याशी आवळलेला असू द्या.
३. श्वास सोडा आणि धड डाव्या पायासहित विरुध्द दिशेला (उजवीकडे) वळवून डावा तळहात उजव्या पावलाच्या बाहेरच्या कडेशी जमिनीवर टेकवा.
४. उजवा हात डाव्या हाताच्या रेषेत उंचावा आणि उजव्या हाताच्या आंगठयावर दृष्टी खिळवा. (चित्र क्र. ६ व ७)
५. गुडघे घट्ट आवळलेले असू द्या. उजव्या पायाची बोटे जमिनीपासून उचलू नका. डाव्या पावलाची बाहेरची कड जमिनीवर चांगली टेकून ठेवण्याचे ध्यानात राहू द्या.
६. दोन्ही खांदे आणि खांद्यांची पाती ताणलेली असू द्या.
७. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत अर्धे मिनिट राहा.
८. श्वास घ्या. डाव्या हाताचा पंजा जमिनीवरुन उचला. धड फिरवून मूळ स्थितीला आणा आणि क्र. १ च्या स्थितीवर पुन्हा या.
९. श्वास सोडा. डावे पाऊल डावीकडे ९० अंश वळवा. उजवे पाऊल डावीकडे ६० अंश आणि डाव्या पावलाच्या बाहेरच्या कडेजवळ उजवा तळहात जमिनीवर टेकवा, आणि हे आसन पुन्हा करा.
१०. दोन्ही बाजूंकडील आसनांना सारखाच वेळ द्या. प्रत्येक बाजूला तीन ते चार वेळा दीर्घ श्वसन करुन वेळेचा हिशेब ठेवता येईल.
११. वेळ पुरा झाल्यावर श्वास घ्या. धड उचलून पूर्वस्थितीला आणा. पायाची बोटे पुढे आणि हात क्र. १ च्या स्थितीत ठेवा.
१२. श्वास सोडा आणि उडी मारुन ताडासनात या. येथे हे आसन पूर्ण होते. (चित्र क्र. १)

परिणाम
या आसनामुळे मांडया व पोटर्‍या, तसेच गुडघ्यामागची (धोंडशिर) यांना सुदृढता येते. पाठीचा कणा आणि पाठीचे स्नायू यांची कार्ये योग्य तर्‍हेने होऊ लागतात. कारण, कण्याच्या खालच्या भागाच्या आसपासचा रक्ताचा पुरवठा या आसनामुळे वाढतो. छाती पूर्णपणे फुगवली जाते. या आसनामुळे पाठीच्या वेदना थांबतात. पोटातील अवयव मजबूत होतात आणि पुठ्ठयाचे स्नायू सशक्त बनतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP