मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
पार्श्व हलासन *

पार्श्व हलासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. २४९)
हलासनामध्ये (चित्र क्र. २४४) दोन्ही पाय डोक्याच्या पाठीमागे टेकलेले असतात. या आसनात पाय डोक्याच्या एका बाजूला आणि डोक्याच्याच रेषेमध्ये ठेवले जातात.

पध्दती
१. सुप्तकोणासन (चित्र क्र. २४७) करा आणि पुन्हा हलासनात या.
२. तळहात बरगडयांच्या मागच्या बाजूला ठेवा. (चित्र क्र. २४०)
३. दोन्ही पाय डाव्या बाजूला शक्य तितके दूर न्या.
४. दोन्ही गुडघे घट्ट आवळा. तळहातांच्या सहाय्याने धड वर उचला आणि पाय लांबवा. (चित्र क्र. २४९).
५. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत अर्धे मिनिट राहा.
६. श्वास सोडा. डोक्याच्या रेषेत येईपर्यंत पाय उजवीकडे न्या. आणि त्या स्थितीत अर्धे मिनिट राहा. पाय हालवताना छाती आणि धड यांची स्थिती बदलू नका. छाती आणि धड सर्वांगसनात आणि हलासनात असते तसे राहू द्या.

परिणाम
या आसनात पाठीचा कणा दोन्ही बाजूंकडे नेला जातो आणि त्यामुळे तो अधिक लवचिक बनतो. मोठे आतडे या आसनामध्ये उफराटे केले जाते त्यामुळे त्याला आवश्यक तो व्यायाम घडतो आणि मळाचा उत्सर्ग पूर्णपणाने होतो. ज्यांना तीव्र किंवा सततच्या बध्दकोष्ठाचा त्रास आहे त्यांना ह्या आसनामुळे अतिशय फायदा होतो. बध्दकोष्ठ ही अनेक रोगांची जननी आहे. घराजवळ कोणी कचरा आणून टाकला तरी आपल्याला मळमळू लागते. मग आपल्या शरीरयंत्रणेमध्ये विषद्रव्ये निर्माण करणारी निरुपयोगी वस्तू शरीराबाहेर घालविल्या नाहीत तर रोग चोरांप्रमाणे आपल्या शरीरात प्रवेश करतील आणि आपली आरोग्यसंपत्ती हरण करतील. आतडयांमधून मळ सहजपणे पुढे सरकला नाही तर आपले मनही मंद होते आणि आपल्याला जड जड आणि चिडल्यासारखे वाटू लागते. या आसनामुळे आतडी स्वच्छ राहातात. व ती आपल्याला आरोग्याचे पारितोषिक मिळवून देतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 11, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP