मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया| सिंहासन १ * योगासने, बंध आणि क्रिया ताडासन * वृक्षासन * उत्थित त्रिकोणासन * परिवृत्त त्रिकोणासन * उत्थित पार्श्व कोणासन * परिवृत्त पार्श्वकोणासन * वीरभद्रासन १ * वीरभद्रासन २ * वीरभद्रासन ३ * अर्धचंद्रासन * उत्थित हस्तपादांगुष्ठासन * पार्श्वोत्तानासन * प्रसारित पादोत्तानासन १ * प्रसारित पादोत्तानासन २ * परिघासन * उष्ट्रासन * उत्कटासन * पादांगुष्ठासन * पादहस्तासन * उत्तासन * ऊर्ध्व प्रसारित एकपादासन * अर्ध बध्द पद्मोत्तानासन * गरुडासन * वातायनासन * शलभासन * मकरासन * धनुरासन * पार्श्वधनुरासन * चतुरंग दंडासन * नक्रासन * भुजंगासन १ * ऊर्ध्वमुख श्वानासन * अधोमुख श्वानासन * परिपूर्ण नावासन * दण्डासन * अर्धनावासन * गोमुखासन * लोलासन * सिध्दासन * वीरासन * सुप्त वीरासन * पर्यकासन * भेकासन * बध्द कोणासन * पद्मासन * षण्मुखी मुद्रा * पर्वतासन * तोलासन * सिंहासन १ * सिंहासन २ * मत्स्यासन * कुक्कुटासन * गर्भपिंडासन * गोरक्षासन * बध्दपद्मासन * योगमुद्रासन * सुप्त वज्रासन * महामुद्रा पाच * जानुशीर्षासन * परिवृत्त जानु शीर्षासन * अर्ध बध्द पद्म-पश्चिमोत्तानासन * त्र्यंग मुखैकपाद पश्चिमोत्तानासन * क्रौंचासन * मरीचासन १ मरीच्यासन २ * उपविष्ट कोणासन * पश्चिमोत्तानासन * परिवृत पश्चिमोत्तानासन * उभय पादांगुष्ठासन * ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन १ * पूर्वोत्तानासन * आकर्ण धनुरासन * सालंब शीर्षासन १ * ऊर्ध्वदंडासन * सालंब शीर्षासन २ * सालंब शीर्षासन ३ * बध्दहस्त शीर्षासन * मुक्त हस्त शीर्षासन * पार्श्व शीर्षासन * परिवृत्तैकपाद शीर्षासन * एकपाद शीर्षासन * पार्श्वैकपाद शीर्षासन * ऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन * पार्श्वऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन * पिंडासनायुक्त शीर्षासन * सालंब सर्वांगासन १ * सालंब सर्वांगासन २ * निरालंब सर्वांगासन १ * निरालंब सर्वांगासन २ * हलासन * कर्णपीडासन * सुप्तकोणासन * पार्श्व हलासन * एकपाद सर्वांगासन * पार्श्वैकपाद सर्वांगासन * पार्श्वसर्वांगासन * सेतुबंध सर्वांगासन किंवा उत्तान मयूरासन * एकपाद सेतुबंध सर्वांगासन किंवा एकपाद उत्तान मयूरासन * ऊर्ध्व पद्मासनयुक्त सर्वांगासन * ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन २ * पिंडासनयुक्त सर्वांगासन * पार्श्वपिंडासनयुक्त सर्वांगासन * जठर परिवर्तनासन * ऊर्ध्व प्रसारित पादासन * चक्रासन * सुप्तपादांगुष्ठासन * अनंतासन * उत्तान पादासन * सेतुबंधासन * भारद्वाजासन १ * भारद्वाजासन २ * मरीच्यासन १ * मरीच्यासन २ * अर्ध मत्स्येंद्रासन १ * अर्धमत्स्येंद्रासन २ * अर्ध मत्स्येंद्रासन ३ ** परिपूर्ण मत्स्येंद्रासन ** मालासन १ * मालासन २ * पाशासन * अष्टा वक्रासन * एकहस्तभुजासन * द्विहस्त भुजासन * भुजपीडासन * मयूरासन * पद्म मयूरासन * पिंचमयूरासन * हंसासन * शयनासन * अधोमुख वृक्षासन * कूर्मासन * सुप्त कूर्मासन * एकपाद शीर्षासन * स्कंदासन * बुध्दासन * कपिलासन * भैरवासन * कालभैरवासन * चकोरासन * दुर्वासासान ** रुचिकासन * विरंच्यासन १ * विरंच्यासन २ * योगनिद्रासन * द्विपाद शीर्षासन ** टिट्टिभासन ** वसिष्ठासन * कश्यपासन * विश्वामित्रासन * बकासन * पार्श्वबकासन * ऊर्ध्व कुक्कुटासन * पार्श्वकुक्कुटासन * गालवासन * एकपाद गालवासन * द्विपाद कौंडिण्यासन * एकपाद कौंडिण्यासन १ ** एकपाद कौंडिण्यासन २ ** एकपाद बकासन १ ** एकपाद बकासन २ ** योगदंडासन * सुप्त भेकासन ** मूलबंधासन ** वामदेवासन १ * वामदंडासन २ * कंदासन ** हनुमानासन ** समकोणासन ** सुप्त त्रिविक्रमासन ** ऊर्ध्व धनुरासन १ * ऊर्ध्वधनुरासन २ * विपरीत चक्रासन युक्त ऊर्ध्व धनुरासन ** एकपाद ऊर्ध्व धनुरासन * कपोतासन ** लघुवज्रासन ** द्विपाद विपरीत दंडासन ** एकपाद विपरीत दंडासन १ ** एकपाद विपरीत दंडासन २ ** चक्रबंधासन ** मंडलासन ** वृश्चिकासन १ ** वृश्चिकासन २ ** एकपाद राजकपोतासन १ ** वालखिल्यासन ** एकपाद राजकपोतासन १ ** एकपाद राजकपोतासन २ ** एकपाद राजकपोतासन ३ ** भुजंगासन ** राजकपोतासन ** पादांगुष्ठ धनुरासन *** घेरंडासन १ *** घेरंडासन २ *** कपिंजलासन *** शीर्षपादासन *** गंड भेरंडासन *** विपरीत शलभासन *** त्र्यंग मुखोत्तानासन *** नटराजासन *** शवासन (मृतासन) * उड्डियानबंध * नौली सोळा * बंध नाडया आणि चक्रे सिंहासन १ * प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे. Tags : scienceyogaयोगशास्त्रशास्त्र सिंहासन १ * Translation - भाषांतर (चित्र क्र. १०९) या आसनाला नरसिंह या विष्णूच्या एका अवताराचे नाव दिले आहे. आपल्याला दिवसा किंवा रात्री, घरात किंवा बाहेर, जमिनीवर किंवा पाण्यात आणि देवाच्या किंवा माणसाच्या, किंवा पशूंच्या हातून मृत्यू येऊ नये असा वर असुरांचा राजा हिरण्यकश्यपू याने ब्रह्मदेवाकडून मिळवला होता. नंतर हिरण्यकश्यपूने देवांना आणि मनुष्यांना, तसेच विष्णुभक्त असलेला आपला मुलगा प्रल्हाद यालाही त्रास देण्यास सुरवात केली. प्रल्हादाला त्याने अनेक दिव्यांमधून जायला लावले, परंतु विष्णूच्या कृपेमुळे तो सुरक्षित राहिला. आणि सर्वसाक्षी व सर्वशक्तीमान अशा विष्णूचे महात्म्य अधिक श्रध्देने आणि जोमाने लोकांनी शिकवू लागला. त्यामुळे चिडून जाऊन हिरण्यकश्य़पूने मुलाला विचारले की विष्णू जर सर्वव्यापी असेल तर राजवाडयातल्या एखाद्या खांबामध्ये तो कसा दिसत नाही ? आपल्या मुलाची श्रध्दा ही कशी चुकीची आहे हे त्याला पटवून देण्यासाठी त्याने तुच्छतापूर्वक त्या खांबावर लाथ मारली. प्रल्हादाने विष्णूचा धावा केला, तेव्हा तो देव वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग माणसाचा अशा भयंकर रुपात खांबातून प्रकट झाला. देवाने हिरण्यकश्यपूला उचलले, स्वत: उंबरठयावर बसला आणि हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन त्याने आपल्या पंज्याने त्याचे शरीर फाडून त्याला मारुन टाकले. भारतीय शिल्पांमध्ये नरसिंह अवतार अनेकदा दाखवला जातो. वेरुळच्या लेण्यांमध्ये अशा तर्हेची एक सामर्थ्यवान शिल्पकृती पाहायला मिळते. या आसनाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार जुन्या ग्रंथांत सांगितलेला असून त्याची पध्दती येथे दिली आहे. दुसरा प्रकार करावयास कठीण असला तरी त्याच्यापासून लाभ अधिक चांगले मिळतात. हा प्रकार सिंहासन २ या शीर्षकाखाली दिला आहे. (चित्र क्र. ११०) पध्दती १. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)२. ढुंगण उचला. उजवा गुडघा वाकवा आणि उजवे पाऊल डाव्या कुल्ल्याखाली ठेवा. डावा गुडघा मोडा आणि डावे पाऊल उजव्या कुल्ल्याखाली ठेवा. डावा घोटा उजव्या घोटयाच्या खाले असू द्या. ३. पायाची बोटे मागच्या बाजूस वळवून टाचांवर बसा.४. शरीराचा भार मांडी आणि गुडघे यांवर टाका.५. धड पुढच्या दिशेला न्या. गुडघे आणि पाठ ताठ ठेवा. ६. उजवा तळहात उजव्या गुडघ्यावर आणि डावा तळहात डाव्या गुढग्यावर ठेवा. हात सरळ पसरा आणि ताठ ठेवा. बोटे पसरुन ती गुडघ्यांवर दाबून ठेवा. ७. जबडा वासा आणि जीभ बाहेर काढून ती हनुवटीच्या दिशेने जास्तीत जास्त ताणा. (चित्र क्र. १०९)८. भुवयांच्या मध्ये किंवा नाकाच्या अग्रावर दृष्टी खिळवा. या स्थितीत तोंडाने श्वसन करीत सुमारे ३० सेकंद रहा. ९. जीभ ओढून तोंडात न्या. गुडघ्यावरुन हात उचला आणि पाय लांब करा यानंतर प्रथम डावे पाऊल उजव्या कुल्ल्याखाली आणि नंतर उजवे पाऊल डाव्या कुल्ल्याखाली, अशा तर्हेने बसून हे आसन पुन्हा करा. १०. दोन्ही बाजूंकडील आसनात सारखाच वेळ राहा. परिणामया आसनामुळे श्वासाची दुर्गंधी जाते आणि जीभ स्वच्छ होते. सातत्याने हे आसन केल्यामुळे शब्दोच्चार अधिक स्पष्ट होऊ लागतात. त्यामुळे बोलताना चाचरणार्या व्यक्तींना हे आसन उपयुक्त आहे. या आसनामुळे तीन बंधांवर प्रभुत्व मिळविण्यास मदत होते. (विभाग ३ पाहा) N/A References : N/A Last Updated : September 09, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP