मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
शीर्षपादासन ***

शीर्षपादासन ***

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र.५७०)
शीर्ष म्हणजे डोके व पाद म्हणजे पाऊल. पाठ वाकवून करण्याचे हे सर्वात कठीण आसन. हे शीर्षासनात (चित्र क्र.१९०) डोक्यावर उभे राहून करायचे असते. शीर्षासन करुन पाठीची कमान करावयाची व पावले खाली आणीत टाचा मानेच्या मागच्या भागावर ठेवायच्या, आणि पायांचे आंगठे हातांनी पकडून डोक्याच्या मागच्या भागला लावायचे.

पध्दती
१. जमिनीवर सतरंजी पसरा, त्यावर गुडघे टेका आणि सालंब शीर्षासन १ (चित्र क्र.१९०) करा.
२. गुडघे वाकवा. पाय पाठीमागे खाली न्या. (चित्र क्र.५१७ आणि ५१८) श्वास सोडा, कणा ताणा, ढुंगण आकुंचित करा. मांडया मागे नेऊन खाली आणा. (चित्र क्र. ५६८) तसेच बोटे डोक्याच्या मागच्या भागाला लागतील अशा बेताने पावले खाली आणा. कोपरे न हालवता मनगटे जमिनीवरुन किंचित उचला आणि बोटांची पकड न सोडता हातांनी पायांचे आंगठे धरा. (चित्र क्र. ५७०) छाती पुढे न्या आणि काही सेकंद - शक्य तितके अधिक सेकंद - या स्थितीत राहा.
३. पाठ वाकवून करावयाच्या इतर आसनांमध्ये कणा ताणण्यासाठी काही साहाय्य मिळविता येते. येथे मात्र योग्य ती कमान साधण्यासाठी कण्याला केवळ स्वावलंबनाने हालचाल करावी लागते.
४. कणा, छाती, खांदे व मान यांना पूर्ण ताण बसतो आणि पोट आकुंचित होते, त्यामुळे नेहमीप्रमाणे श्वसन करणे कठीण होईल. पुन्हा शीर्षासन १ मध्ये (चित्र क्र.१९०) या. पाय घसरवीत जमिनीवर आणा आणि आराम करा. किंवा ऊर्ध्वधनुरासन (चित्र क्र.४८६) करुन ताडासनात उभे राहा किंवा विपरीत चक्रासन व पुढली आसने करा. (चित्र क्र.४८८ ते ४९९).

परिणाम
या आसनाने शीर्षासन १ (चित्र क्र.१९०) चे लाभ मिळतातच, पण त्याशिवाय सर्व मणक्यांना व्यायाम घडतो. कण्याकडील रक्त-पुरवठा वाढत असल्यामुळे मज्जातंतूंची झीज थांबते. ताण बसल्यामुळे पोटातील स्नायूंना सुदृढता येते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP