मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
सुप्त कूर्मासन *

सुप्त कूर्मासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३६८)
या स्थितीमध्ये १ ते २ मिनिटे राहा. पावलांची घडी मधून मधून बदलणे इष्ट असते. सुरवातीला उजवे पाऊल डाव्या पावलावर ठेवलेले असेल तर घडी बदलताना डावे पाऊल उजव्या पावलावर ठेवावे, त्यामुळे दोन्ही पाय समतोलपणे विकसित होतील.
१०. श्वास घ्या. डोके वर उचला. हात आणि पाय मोकळे करा. पाय सरळ समोर पसरा. जमिनीवर पडा आणि विसावा घ्या.
११. वर वर्णन केलेल्या सर्व टप्प्यांमध्ये श्वसन नेहमीप्रमाणेच ठेवा.

परिणाम
हे आसन योगी लोक पवित्र मानतात. अर्जुनाला स्थितप्रज्ञाचे गुणधर्म सांगताना भगवान म्हणतात, ‘कासव ज्याप्रमाणे आपले अवयव सर्व बाजूंनी आवरुन आकुंचित करते त्याप्रमाणे तो आपली इंद्रिये विषयांपासून आवरुन मागे घेतो. त्या वेळी त्याचा प्रज्ञा सु-स्थिर बनते.’ (भगवद्‍गीता अध्याय २, श्लोक ५८) या आसनात सर्व अवयव आवरुन घेतले जातात व शरीर कासवाप्रमाणे दिसते. मन शांत आणि स्थिर होते व सुख आणि दु:ख या दोहोंतही मनाचा समतोल साधू लागतो. हळू हळू मन दु:खात असले तरी चिंतामुक्त होते आणि ते सुखात असले तरी तटस्थ राहू लागते. तसेच काम, भय आणि क्रोध या भावनांची मनावरची पकड सैल होऊ लागते. केवळ शारीरिक पातळीवर पाहिले तरी या आसनाचे परिणाम अतिशय महत्त्वपूर्ण होतात. या आसनामुळे पाठीचा कणा सुदृढ बनतो. पोटातील अवयव कार्यान्वित होतात. एकूण शरीर चैतन्यपूर्ण व निरोगी बनते, मेंदूच्या शिरांना त्यामुळे शीतलता येते आणि आसन पूर्ण केल्यानंतर दीर्घ आणि गाढ झोपेतून उठल्यावर वाटतो तसा ताजेपणा अनुभवाला येतो. योगसाधनेच्या पाचव्या टप्प्याला ‘प्रत्याहार’ (विषयांपासून इंद्रिये मागे खेचणे) असे नाव आहे. साधकाला वरील आसनामुळे प्रत्याहाराची पूर्वतयारी करता येते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP