मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया| कश्यपासन * योगासने, बंध आणि क्रिया ताडासन * वृक्षासन * उत्थित त्रिकोणासन * परिवृत्त त्रिकोणासन * उत्थित पार्श्व कोणासन * परिवृत्त पार्श्वकोणासन * वीरभद्रासन १ * वीरभद्रासन २ * वीरभद्रासन ३ * अर्धचंद्रासन * उत्थित हस्तपादांगुष्ठासन * पार्श्वोत्तानासन * प्रसारित पादोत्तानासन १ * प्रसारित पादोत्तानासन २ * परिघासन * उष्ट्रासन * उत्कटासन * पादांगुष्ठासन * पादहस्तासन * उत्तासन * ऊर्ध्व प्रसारित एकपादासन * अर्ध बध्द पद्मोत्तानासन * गरुडासन * वातायनासन * शलभासन * मकरासन * धनुरासन * पार्श्वधनुरासन * चतुरंग दंडासन * नक्रासन * भुजंगासन १ * ऊर्ध्वमुख श्वानासन * अधोमुख श्वानासन * परिपूर्ण नावासन * दण्डासन * अर्धनावासन * गोमुखासन * लोलासन * सिध्दासन * वीरासन * सुप्त वीरासन * पर्यकासन * भेकासन * बध्द कोणासन * पद्मासन * षण्मुखी मुद्रा * पर्वतासन * तोलासन * सिंहासन १ * सिंहासन २ * मत्स्यासन * कुक्कुटासन * गर्भपिंडासन * गोरक्षासन * बध्दपद्मासन * योगमुद्रासन * सुप्त वज्रासन * महामुद्रा पाच * जानुशीर्षासन * परिवृत्त जानु शीर्षासन * अर्ध बध्द पद्म-पश्चिमोत्तानासन * त्र्यंग मुखैकपाद पश्चिमोत्तानासन * क्रौंचासन * मरीचासन १ मरीच्यासन २ * उपविष्ट कोणासन * पश्चिमोत्तानासन * परिवृत पश्चिमोत्तानासन * उभय पादांगुष्ठासन * ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन १ * पूर्वोत्तानासन * आकर्ण धनुरासन * सालंब शीर्षासन १ * ऊर्ध्वदंडासन * सालंब शीर्षासन २ * सालंब शीर्षासन ३ * बध्दहस्त शीर्षासन * मुक्त हस्त शीर्षासन * पार्श्व शीर्षासन * परिवृत्तैकपाद शीर्षासन * एकपाद शीर्षासन * पार्श्वैकपाद शीर्षासन * ऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन * पार्श्वऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन * पिंडासनायुक्त शीर्षासन * सालंब सर्वांगासन १ * सालंब सर्वांगासन २ * निरालंब सर्वांगासन १ * निरालंब सर्वांगासन २ * हलासन * कर्णपीडासन * सुप्तकोणासन * पार्श्व हलासन * एकपाद सर्वांगासन * पार्श्वैकपाद सर्वांगासन * पार्श्वसर्वांगासन * सेतुबंध सर्वांगासन किंवा उत्तान मयूरासन * एकपाद सेतुबंध सर्वांगासन किंवा एकपाद उत्तान मयूरासन * ऊर्ध्व पद्मासनयुक्त सर्वांगासन * ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन २ * पिंडासनयुक्त सर्वांगासन * पार्श्वपिंडासनयुक्त सर्वांगासन * जठर परिवर्तनासन * ऊर्ध्व प्रसारित पादासन * चक्रासन * सुप्तपादांगुष्ठासन * अनंतासन * उत्तान पादासन * सेतुबंधासन * भारद्वाजासन १ * भारद्वाजासन २ * मरीच्यासन १ * मरीच्यासन २ * अर्ध मत्स्येंद्रासन १ * अर्धमत्स्येंद्रासन २ * अर्ध मत्स्येंद्रासन ३ ** परिपूर्ण मत्स्येंद्रासन ** मालासन १ * मालासन २ * पाशासन * अष्टा वक्रासन * एकहस्तभुजासन * द्विहस्त भुजासन * भुजपीडासन * मयूरासन * पद्म मयूरासन * पिंचमयूरासन * हंसासन * शयनासन * अधोमुख वृक्षासन * कूर्मासन * सुप्त कूर्मासन * एकपाद शीर्षासन * स्कंदासन * बुध्दासन * कपिलासन * भैरवासन * कालभैरवासन * चकोरासन * दुर्वासासान ** रुचिकासन * विरंच्यासन १ * विरंच्यासन २ * योगनिद्रासन * द्विपाद शीर्षासन ** टिट्टिभासन ** वसिष्ठासन * कश्यपासन * विश्वामित्रासन * बकासन * पार्श्वबकासन * ऊर्ध्व कुक्कुटासन * पार्श्वकुक्कुटासन * गालवासन * एकपाद गालवासन * द्विपाद कौंडिण्यासन * एकपाद कौंडिण्यासन १ ** एकपाद कौंडिण्यासन २ ** एकपाद बकासन १ ** एकपाद बकासन २ ** योगदंडासन * सुप्त भेकासन ** मूलबंधासन ** वामदेवासन १ * वामदंडासन २ * कंदासन ** हनुमानासन ** समकोणासन ** सुप्त त्रिविक्रमासन ** ऊर्ध्व धनुरासन १ * ऊर्ध्वधनुरासन २ * विपरीत चक्रासन युक्त ऊर्ध्व धनुरासन ** एकपाद ऊर्ध्व धनुरासन * कपोतासन ** लघुवज्रासन ** द्विपाद विपरीत दंडासन ** एकपाद विपरीत दंडासन १ ** एकपाद विपरीत दंडासन २ ** चक्रबंधासन ** मंडलासन ** वृश्चिकासन १ ** वृश्चिकासन २ ** एकपाद राजकपोतासन १ ** वालखिल्यासन ** एकपाद राजकपोतासन १ ** एकपाद राजकपोतासन २ ** एकपाद राजकपोतासन ३ ** भुजंगासन ** राजकपोतासन ** पादांगुष्ठ धनुरासन *** घेरंडासन १ *** घेरंडासन २ *** कपिंजलासन *** शीर्षपादासन *** गंड भेरंडासन *** विपरीत शलभासन *** त्र्यंग मुखोत्तानासन *** नटराजासन *** शवासन (मृतासन) * उड्डियानबंध * नौली सोळा * बंध नाडया आणि चक्रे कश्यपासन * प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे. Tags : scienceyogaयोगशास्त्रशास्त्र कश्यपासन * Translation - भाषांतर (चित्र क्र. ३९९ व ४००)या आसनाला ब्रह्मदेवाचा मुलगा जो मरीची ऋषी त्याच्या मुलाचे (कश्यप ऋषीचे) नाव दिले आहे. विश्वनिर्मितीच्या कामामध्ये त्याचा बराच मोठा वाटा होता. असे सांगतात की कश्यपाने दक्षाच्या तेरा मुलींशी लग्न केले. अदितीला त्याच्या पासून १२ आदित्य (देव) झाले. आणि दितीला दैत्य (राक्षस) झाले. त्याच्या इतर बायकांना नाग, सर्प, पक्षी आणि चंद्रलोकातील अप्सरा अशी विविध आणि असंख्य अपत्ये झाली. अशा तर्हेने कश्यप हा सूर्याचा आणि सर्व प्राण्यांचा पिता होय. म्हणूनच त्याला अनेकदा प्रजापती असे म्हणतात.पध्दती१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्र.१).पुढे वाका. उत्तानासनातल्याप्रमाणे (चित्र क्र.४७) दोन्ही तळहात जमिनीवर टेका. अधोमुख श्वानासनातल्याप्रमाणे (चित्र क्र. ७५) पाय ४ ते ५ फूट मागे न्या. २. सबंध शरीर उजवीकडे वळवा आणि उजवा पंजा व पाऊल यांवर शरीर तोलून धरा. उजव्या पायाची बाहेरची बाजू जमिनीवर ठामपणे रोवा. डावे पाऊल उजव्या पावलावर ठेवा. डावा तळहात डाव्या कंबरेवर ठेवा. शरीर ताठ ठेवून तोल सांभाळा. (चित्र क्र. ३९६).३. श्वास सोडा. डावा गुडघा वाकवा. डावे पाऊल अर्ध पद्मासनातल्याप्रमाणे डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवा. खांद्यापासूनचा डावा हात पाठीच्या मागे न्या. डाव्या पंजाने डाव्या पायाचा आंगठा पकडा. ही या आसनातील अंतिम स्थिती. (चित्र क्र.३९९ व ४००). दीर्घ श्वसन करीत या स्थितीत काही काळ शरीर तोलून धरा. सगळी छाती आणि लांबवलेला उजवा हात ही एका पातळीत असावी. ४. श्वास सोडा. डावे पाऊल पकडीतून मोकळे करुन पुन्हा उजव्या पावलावर ठेवा. डावा पंजा डाव्या मांडीवर ठेवा. (चित्र क्र. ३९६). काही वेळ दीर्घ श्वसन करा. ५. श्वास सोडा आणि शरीर अशा रीतीने डावीकडे वळवा की ते डावा पंजा व डावे पाऊल यांवर तोलले जाईल. उजवे पाऊल अर्ध पदमासनातल्याप्रमाणे डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवा आणि उजवा हात पाठीमागे नेऊन त्याने उजव्या पायाचा आंगठा पकडा. दोन्ही बाजूंकडील आसनाला समान वेळ द्या. ६. श्वास सोडा. उजवे पाऊल मोकळे करा आणि ते डाव्या पावलावर ठेवा. तसेच उजवा हात उजव्या मांडीवर ठेवा. ७. उजवा तळहात जमिनीवर टेका आणि उत्तानासनात या. (चित्र क्र. ४७) काही वेळ श्वास घ्या. श्वास सोडून ताडासनात परत या. (चित्र क्र. १)परिणामया आसनामुळे हाताचे पंजे मजबूत बनतात. पाठीच्या कण्याच्या तळाच्या भागातील वेदना आणि ताठरपणा ही नाहीशी होतात. N/A References : N/A Last Updated : September 12, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP