मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
कंदासन **

कंदासन **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ४७०,४७१,४७१अ, आणि ४७१ब)
कंद म्हणजे झाडाचा कांदा; मूळ किंवा गाठ. ‘हठयोगप्रदीपिके’च्या तिसर्‍या अध्यायातील १०७ व्या आणि ११ व्या श्लोकामध्ये कंदाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे :
१०७. ‘जेथे सर्व नाडया एकत्र येऊन पुन्हा आपापल्या दिशेने निघून जातात अशा ठिकाणाच्या म्हणजे कंदाच्या वरती कुंडलिनी निद्रिस्त असते. ती योग्यांना मुक्ती देते आणि अज्ञानी लोकांना बंधनात टाकते. ज्याला कुंडलिनीचे ज्ञान झाले त्याला योगाचे झाले.’
‘११३.’ "कंद गुदद्वाराच्या वर १२ इंच अंतरावर असतो. तो गोलाकार असल्याचे आणि पांढर्‍या व मऊ कापडाने आच्छादिल्यासारखा असल्याचे वर्णन केले जाते.” (संहितेमध्ये वापरलेला शब्द ‘वितस्ती’ म्हणजे वीत किंवा १२ अंगुळे असा आहे.)

पध्दती
१. पाय सरळ समोर पसरून जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७) गुडघे वाकवा. मांडया फाकवा. टाचा शिवणीजवळ याव्यात अशा तर्‍हेने पावले धडाकडे आणा. आणि गुडघे जमिनीवर राहू द्या. ही स्थिती बध्दकोणासनासारखी (चित्र क्र. १०१) आहे.
२. उजवे पाऊल उजव्या हाताने आणि डावे पाऊल डाव्या हाताने धरा.
३. हातांच्या मदतीने पावले धडाच्या जवळ आणा. घोटे उलटे करा. (चित्र क्र. ४६७) गुडघे आणि मांडया खेचून धरा (चित्र क्र. ४६८) आणि टाचा व पावलांच्या बाहेरच्या बाजू बेंबी आणि छाती यांवर ठेवा. (चित्र क्र. ४६९) सुरवातीच्या काळात पावले खाली घसरण्याचा संभव असतो. काही आठवडे पावले छातीशी घट्ट धरुन या स्थितीचा सराव करा.
४. हात सोडा आणि ते सरळ समोर लांबवा. हातांची मागची बाजू गुडघ्यांवर टेका. (चित्र क्र. ४७०) किंवा छातीसमोर तळहात जुळवा. (चित्र क्र.४७१) पाठ ताठ ठेवा. आणि दीर्घ श्वसन करीत या स्थितीत सुमारे ३० सेकंद राहा.
५. प्रगत विद्यार्थ्यांनी हात जुळवून डोक्याच्या वर धरण्यास हरकत नाही. (चित्र क्र. ४७१ अ) नंतर पाठीच्या मागच्या बाजूला हात जुळवून तोल सांभाळण्याचा प्रयत्न करा. (चित्र क्र. ४७१ ब) या आसनाचा सगळ्यात कठीण भाग आहे.
६. हातांनी पावले धरा. ती जमिनीवर आणा आणि विसावा घ्या.
७. ओटीपोटातील आणि पायातील जोडस्नायू येथे वाटोळे फिरत असल्यामुळे हे आसन नीट करता येण्यास दीर्घ काळ लागतो.

परिणाम
बेंबीच्या खालच्या प्रत्येक स्नायूला व्यायाम घडतो. या आसनामुळे कंबर, गुडघे आणि घोटे यांच्या सांध्यामधील ताठरपणा नाहीसा होतो. लैंगिक शक्ती पुन्हा परत मिळते आणि लैंगिक वासनेवर ताबा मिळतो. या आसनामुळे स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूरक चक्र यांना व्यायाम घडतो व त्यामुळे पचनक्रिया योग्य तर्‍हेने होऊ लागते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP