मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
षण्मुखी मुद्रा *

षण्मुखी मुद्रा *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १०६)
षण म्हणजे सहा आणि मुख म्हणजे तोंड. षण्मुख हे कार्तिकेय या सहा तोंडाच्या युध्ददेवतेचे नाव आहे. मुद्रा म्हणजे छाप, किंवा शिक्का, किंवा मोहोर. या स्थितीला पराड्मुखी मुद्रा, शांभवी मुद्रा (शंभू म्हणजे शिव-कार्तिकेयाचा पिता, म्हणून शिवाचे अपत्य म्हणजे शांभव), तसेच योनिमुद्रा (योनी म्हणजे उत्पत्तिस्थान किंवा गर्भाशय) अशीही नावे आहेत. अभ्यासक या मुद्रेमध्ये स्वत:च्या अस्तित्वाचे आदिमूळ स्वत:मध्ये डोकावून शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणून हे नाव पडले आहे.

पध्दती
१. पद्मासनामध्ये बसा. (चित्र क्र. १०४) पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोके सरळ ठेवा.
२. हात उचलून चेहर्‍याकडे न्या. कोपरे खांद्याच्या पातळीपर्यंत उचला. आंगठे कानांच्या छिद्रांवर ठेवून बाहेरचे सगळे आवाज बंद करुन टाका. कानावर ठेवलेल्या आंगठयामुळे वेदना होऊ लागल्या तर कर्णछिद्रानजीक असलेल्या स्नायूच्या उंचवटयावर अंगठा ठेवून त्याने कर्णछिद्रे बंद करुन टाका.
३. पापण्या मिटा. परंतु बुब्बुळे वरच्या दिशेला असू द्या. तर्जनी आणि मधले बोट बंद पापण्यावर अशा तर्‍हेने ठेवा की पहिल्या दोन पेरांनीच संपूर्ण डोळ्यावर दाब येईल. मात्र बुब्बुळावर दाब देऊ नका. मधल्या बोटाने पापण्या खाली ओढा. भुवईखालच्या पापण्यांचा जो भाग आहे तो उजव्या बोटाने वर ढकला. डोळ्यांच्या दोन्ही टोकांशी हलका दाब द्या.
४. कान आणि डोळे यांवरील दाब समान असू द्या.
५. अनामिकांच्या टोकांनी दोन्ही नाकपुडया दाबून धरा. दोन नाकपुड्यांवरील दाब सारखा असू द्या. त्यामुळे श्वसनाचा मार्ग अरुंद होईल. आणि दीर्घ, संथ, स्थिर, लयबध्द आणि सूक्ष्म श्वसन सुरु करता येईल. ]
६. करंगळ्या वरच्या ओठावर ठेवा म्हणजे श्वसनाची लय त्या सांभाळू शकतील.
७. सृष्टी आत स्थिर करुन या स्थितीत शक्य तितका वेळ राहा. (चित्र क्र. १०६)

परिणाम
इंद्रिये आत वळतात, आणि लयबध्द श्वसनामुळे मनाच्या इतस्तत: भटकण्याला आळा बसतो. यामुळे अंतरंगात शांती निर्माण होते व आत्म्याचा दिव्य ध्वनी ऐकू येऊ लागतो. "इकडे पहा ! आत पहा ! बाहेर पडू नका, कारण सर्व शांतीचा मूलस्त्रोत हा तुमच्यामध्येच आहे.” या मुद्रेमुळे अभ्यासकाला ‘प्रत्याहार’ या योगाच्या पाचव्या टप्प्याची पूर्वतयारी करता येते. पाचव्या टप्प्यामध्ये अभ्यासकाला इंद्रियांच्या दास्यातून मुक्त होण्याचा मुक्त होण्याचा आणि वासनांच्या मागून धावण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करायचा असतो.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP