मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
ऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन *

ऊर्ध्वपद्मासनयुक्त शीर्षासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. २११)
ऊर्ध्व म्हणजे वर किंवा उंच. पद्मासनाचे वर्णन आधी केले आहे (चित्र क्र. १०४). या प्रकारात डोक्यावर उभे राहून पद्मासन केले जाते.

पध्दती
१. एकपाद (चित्र क्र. २०८ व २०९) व पार्श्वैकपाद (चित्र क्र. २१०) शीर्षासने केल्यानंतर हे आसन करावे. त्या दोन आसनांच्या नंतर पद्मासन करा. प्रथम उजवे पाऊल डाव्या मांडीवर आणि नंतर डावे पाऊल उजव्या मांडीवर ठेवा.
२. गुडघे एकमेकांच्या अधिक जवळ आणा आणि मांडया वर काटकोनात ताणून धरा. (चित्र क्र. २११)
३. दीर्घ आणि समतोल श्वसन करीत या स्थितीत अर्धे मिनिट राहा. मग श्वास सोडा आणि मांडया जास्तीत जास्त पाठीमागे ताणा. (चित्र क्र. २१२)
४. मांडी मोडा आणि शीर्षासनात या. आता डावे पाऊल उजव्या मांडीवर आणि उजवे पाऊल डाव्या मांडीवर अशा तर्‍हेने मांडी घाला. या स्थितीतही अर्धे मिनिट रहा. आणि मांडया जास्तीत जास्त मागे ताणा.
५. मांडया वरच्या दिशेस ताणताना डोके अगर मान यांची स्थिती बदलू नका.

परिणाम
या आसनामुळे छातीचा भाग, बरगडया आणि ओटीपोटाचा भाग यांना जादा ताण बसतो. त्यामुळे छाती पूर्णपणे फुगवली जाते व ओटीपोटाच्या भागात रक्तप्रवाह योग्य तर्‍हेने वाहू लागतो. या भागांना आणखी ताण देण्यासाठी शीर्षासन मध्येच करताना मांडया (पद्मासन स्थितीतल्या) बाजूला वळवून हे आसन करता येते. त्या आसनाचे नाव आहे :

N/A

References : N/A
Last Updated : September 11, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP