मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
एकपाद कौंडिण्यासन १ **

एकपाद कौंडिण्यासन १ **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ४४१)
एकपाद म्हणजे एक पाय किंवा पाऊल. कौंडिण्य हे एका ऋषीचे नाव.

पध्दती
१. सालंब शीर्षासन २ (चित्र क्र. १९२) करा.
२. श्वास सोडा. पाय जमिनीशी समांतर होईपर्यंत सरळ व एकत्र ठेवून खाली आणा. (चित्र क्र.४३४) या स्थितीत थोडा वेळ थांबून काही वेळ श्वास घ्या.
३. श्वास सोडा. पाय वाकवा आणि डावा पाय उजव्या बाजूला न्या. डाव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूचा गुडघ्याजवळचा भाग उजव्या दंडाच्या मागच्या बाजूवर, उजव्या बगलेच्या जवळ टेकेल, अशा तर्‍हेने डावा पाय उजव्या दंडावर ठेवा. (चित्र क्र. ४३९) काही वेळा श्वास घ्या आणि शरीर तोलून धरा.
४. डावा पाय एका बाजूला सरळ ताणा आणि उजवा पाय मागच्या बाजूला सरळ ताणा. (चित्र क्र. ४४०) दोनदा श्वास घ्या.
५. श्वास सोडा. डोके जमिनीवरुन उचला. हात लांबवा आणि हातांवर शरीराचा भार उचला. दोन्ही पाय ताठ आणि गुडघ्याशी आवळलेले ठेवा. (चित्र क्र. ४४१) हा आसनाचा अखेरचा टप्पा. या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वसन करीत ३० सेकंदापर्यंत, तुम्हाला शक्य होईल तितका वेळ राहा.
६. दोन्ही गुडघे वाकवा. श्वास सोडा. डोके जमिनीवर टेका. पुन्हा शीर्षासनात जा. नेहमीप्रमाणे श्वसन करीत येथे काही येथे काही वेळ विसावा घ्या.
७. वरील सूचनांमध्ये ‘उजवा’ व ‘डावा’ या शब्दांची उलटापालट करा आणि हे आसन दुसर्‍या बाजूने आधीइतकाच वेळ करा. आता उजवी मांडी डाव्या दंडाच्या मागच्या बाजूवर टेकेल. डावा पाय मागच्या बाजूला सरळ ताणलेला राहील. नंतर क्र. ६ च्या सूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे पुन्हा शीर्षासनात वर जा.
८. हे आसन पूर्ण करताना पाय जमिनीवर आणून विसावा घ्या किंवा ऊर्ध्व धनुरासन (चित्र क्र. ४८६) करुन ताडासनात (चित्र क्र. १) उभे राहा. विपरीत चक्रासन (चित्र क्र. ४८८ ते ४९९) चांगल्या तर्‍हेने येऊ लागले म्हणजे धनुरासनानंतर ते केल्यामुळे आल्हाद वाटतो.

परिणाम
या आसनात पायांचा दाब पोटावर येत असल्यामुळे पोटातील अवयवांना मालिश केले जाते. पाठीचा कना मुरडला जात असल्यामुळे कण्यामध्ये नवचैतन्य येते. हात आणि मान सशक्त बनतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP