मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
एकपाद विपरीत दंडासन २ **

एकपाद विपरीत दंडासन २ **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र.५२३)
आधीच्या आसनाचा हा अधिक कठीण प्रकार आहे.

पध्दती
१. द्विपाद विपरीत दंडासन करा. (चित्र क्र.५१६)
२. दोन्ही पावले डोक्याकडे न्या.
३. बोटांची पकड सोडा. मनगटे पसरा आणि तळहात जमिनीवर टेका.
४. श्वास सोडून डोके जमिनीवरुन उचला, मान पायांच्या दिशेने लांबवा आणि उजवा पाय हातांच्या अधिक जवळ आणा.
५. उजवा घोटा दोन्ही हातांनी पकडा आणि संपूर्ण पाऊल जमिनीवर ठेवा (चित्र क्र. ५२२).
६. घोटयावर घट्ट पकड बसली की श्वास सोडा आणि खांदे वर ताणून व कणा लांबवून डावा पाय काटकोनात वर न्या. गुडघ्याशी ताठ ठेवून पाय उभा राहू द्या. (चित्र क्र. ५२३)
७. या स्थितीत १० ते १५ सेकंद राहा. पोटाचे स्नायू आकुंचित झाल्यामुळे श्वसन जलद आणि अवघड होईल.
८. डावा पाय जमिनीवर आणा.
९. उजवा घोटा सोडा आणि डावा घोटा पकडा. आता उजवा पाय वर नेऊन वर वर्णिलेले आसन पुन्हा करा. आधीच्या इतकाच वेळ हेही आसन करा. नंतर वर नेलेला पाय खाली आणा.
१०.घोटा सोडा आणि श्वास सोडून दोन्ही पाय वर नेऊन सालंब शीर्षासन १ (चित्र क्र.१९०) करा. मग ते जमिनीवर आणा आणि विसावा घ्या किंवा ऊर्ध्व धनुरासन (चित्र क्र.४८६) करुन ताडासनात (चित्र क्र. १) उभे राहा किंवा विपरीत चक्रासनात जा. (चित्र क्र.४८८ ते ४९९).

परिणाम
या आसनात पोटाच्या स्नायूंना व्यायाम घडतो आणि कणा सुधारतो. यातील वाकणे अधिक कष्टाचे असल्यामुळे लाभही तितके अधिक मिळतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP