मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|

कालभैरवासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३७८)
कालभैरव हे शंकराचे विश्वसंहारक व भयंकर असे रुप होय. संहारतत्त्वाचे ते मूर्त रुप असते.

पध्दती
१. भैरवासन (चित्र क्र. ३७५) पूर्ण केल्यानंतर छातीवरुन हातांची घडी मोडा.
तळहात जमिनीवर दाबा आणि एकपाद शीर्षासनामध्ये या. तळहात दोन्ही बाजूंच्या कंबरेपाशी ठेवा.
२. उजवा पाय उजवीकडे न्या.
३. श्वास सोडा. शरीर जमिनीवरुन वर उचला (चित्र क्र. ३७६) आणि दोनदा श्वास घ्या.
४. श्वास सोडा. उजवा हात जमिनीवरुन उचला. धड उजवीकडे वळवा आणि उजवा हात उजव्या मांडीशी जोडून ठेवा. (चित्र क्र. ३७७) दोनदा श्वास घ्या.
५. आता उजवा हात वरच्या दिशेला ताणा. (चित्र क्र. ३७८)
६. आता सबंध शरीर एका बाजूला डाव्या तळहातावर आणि उजव्या पायाच्या बाहेरच्या बाजूवर तोललेले असेल. उजव्या पायाचा जमिनीशी ३० अंशांचा कोन झालेला असेल.
७. दीर्घ श्वसन करीत या स्थितीमध्ये सुमारे २० सेकंद राहा.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP