मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| अध्यात्म विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - अध्यात्म श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ अध्यात्म Translation - भाषांतर ८११.कर्ता तूं नव्हेसी करविता नव्हेसी । जाण निश्चयासी आलया रे ॥१॥चंद्रसूर्यकळा धरा मेघमाळा । जीवविती कळा देवापासी ॥२॥देवे केले अन्न केले ते जीवन । तेणे पंचप्राण स्थिर जाले ॥३॥दास म्हणे मना तुज देवे केले । मग त्वां देखिले सर्व कांही ॥४॥८१२.आई आदिपुरुष हेंचि विचारावे । आपुले करावे समाधान ॥१॥समाधान होय देव देखिलीयां । देवेविण वायां शिणो नये ॥२॥शिणो नये देव असोनी सर्वत्र । हे तो देहयंत्र नाशिवंत ॥३॥नाशिवंत देहो त्या नाही संदेहो । दास म्हणे पाहो परब्रह्म ॥४॥८१३.गगना लावूं जातां पंक । लिंपे आपुला हस्तक ॥१॥ऊर्ध्व थुंकतां अंबरी । फिरोनी पडे तोंडावरी ॥२॥हृदयस्थासी देता शिवी । ते परतोनी झोंबे जिवी ॥३॥प्रतिबिंबासी जे जे करी । ते आधींच तोंडावरी ॥४॥रामीरामदासी बुद्धि । जैसी होय तैसी सिद्धि ॥५॥८१४.बहुसाल शीण होतसे कठिण । देवासी जतन करावया ॥१॥करावया भक्तिभावे महोत्साव । देवासाठी राव वोळगावा ॥२॥वोळगावा राव राखावया देव । देवासी उपाव मनुष्याचा ॥३॥मनुष्याचा देव पूजितां कष्टलो । कासावीस आलो वाउगाची ॥४॥वाउगाचि देव पाषाणाचा केला । भाव हा लागला तयापासी ॥५॥तयापासी मन अखंड लागले । तो तया फोडिले कोण्हीएके ॥६॥कोण्हीएके बरा विवेक पहावा । देवा आदिदेवा ओळखावे ॥७॥ओळखावे देवा निर्मळ निश्चळा । निर्गुणा केवळा निरंजना ॥८॥निरंजना देवा कोण्ही उच्छेदिना । फुटेना तुटेना कदाकाळी ॥९॥कदाकाळी देव पडेना झडेना । दृढ उपासना रामदासी ॥१०॥८१५.कर्ता तो कारण हेंचि अप्रमाण । कुल्लाळ रांझणे केंवी घडे ॥१॥केंवी घडे ब्रह्म आकारासी आले । तेणे गुणे जाले सर्वब्रह्म ॥२॥ब्रह्म तेंचि सर्व सर्व तेंचि ब्रह्म । दास म्हणे भ्रम मावळेना ॥३॥८१६.एकवीस स्वर्ग विस्तारला । देव संपुष्टी घातला ॥१॥केले देवासी बंधन । तेंचि पावला आपण ॥ध्रु०॥देव ठायींचा अनंत । त्यास भावी अंतवंत ॥२॥रामदास म्हणे भावे । जैसे द्यावे तैसे घ्यावे ॥३॥८१७.सर्व ब्रह्म ऐसे बोलिले लौकिके । परी हे विवेकी मानिजेना ॥१॥मानिजेना जैसे नाथिले आभाळ । की ते मृगजळ वाउगे ॥२॥वाउगेचि आहे सर्व पंचभूत । नव्हे तो अनंत भूतांऐसा ॥३॥भूतांऐसा देव कदां मानूं नये । वेगी धरी सोय शाश्वताची ॥४॥शाश्वताची सरी मायिकासी देणे । काय विचक्षणा मानिजेल ॥५॥मानिजेल ब्रह्म पदार्थासारिखे । तेथे एक मूर्ख विश्वासती ॥६॥विश्वासती परि सर्वही मायिक । सर्वातीत एक परब्रह्म ॥७॥परब्रह्म सर्वी सर्व परब्रह्मी । गेलियाने ऊर्मि चोजवेल ॥८॥चोजवेल सत्य जाण यथातथ्य । तेंव्हा सर्व मिथ्य जाणवेल ॥९॥जाणवेल ब्रह्म निर्मळ निश्चळ । दृश्याचा विटाळ जेथे नाही ॥१०॥जेथे नाही द्वैत त्या नांव अद्वैत । भक्ताचा एकांत निःसंदेह ॥११॥संदेह तयाचे तोंडी पडो माती । देव आदिअंती एकरुप ॥१२॥एकरुप देव येर सर्व माव । हाचि दृढ भाव ज्ञानियांसी ॥१३॥ज्ञानियांसी खूण पूर्ण समाधानी । धन्य तेचि जनी दास म्हणे ॥१४॥८१८.स्वरुप सांडुनी मीच देह भावी । तो जीव रौरवी पचईल ॥१॥पचईल नर्की देहाच्या संबंधे । सज्जनांच्या बोधे सांडवला ॥२॥सांडुनी विवेक वेद महावाक्य । जीवशिवा ऐक्य जयाचेनि ॥३॥जयाचेनि तुटे संसारबंधन । तयाचे वचन दृढ धरा ॥४॥दृढ धरा मनी अहं ब्रह्म ऐसे । सांगतो विश्वासे रामदास ॥५॥८१९.ताकही पांढरे दूधही पांढरे । चवी जेवणारे जाणिजे ते ॥१॥जाणिजे ते चवी गूळसाखरेची । पाहतां तेथेंचि भेद आहे ॥२॥भेद आहे तैसा अभेदाचे परी । जाणिजे चतुरी दास म्हणे ॥३॥८२०.ज्याचे नाम घेसी तोचि तूं आहेसी । पाहे आपणासी शोधूनियां ॥१॥शोधितां शोधितां मीपणचि नाही । मीपणाचे पाही मूळ सर्व ॥२॥मूळ बरे पहा नसोनियां रहा । आहां तैसे आहां सर्वगत ॥३॥सर्वगत आत्मा तोचि तूं परमात्मा । दास अहं आत्मा सांगतसे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 29, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP