मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
कर्मकांड

विविध विषय - कर्मकांड

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


२३८ .

गुरुसी शरण जावे जीवेभावे । वेदांत ऐकावे तन्मुखाने ॥१॥

यावत्काळ जाली नाही ते पूर्णता । तोंवरी अनंता अर्जावे हो ॥२॥

साधाकाणि सिद्ध पूर्ण तो तिसरा । लक्षणे अवधारा त्यांची मने ॥३॥

जनोक्ति साहोनी साधनी लुब्धला । साधक तो जाला योगापेक्षी ॥४॥

रामदास म्हणे सिद्धाची लक्षणे । ऐकतां चि ध्यान लागो ध्यासा ॥५॥

२३९ .

न व्हावे संन्यासी बाह्यवेषधारी । भार्या असुनी करी भिक्षुधर्म ॥१॥

विष्ठामूत्र करुनी क्षाळी हस्तपाद । मुखवाचा शोधे गंगेतटी ॥२॥

घटिका एक रात्र राहे तयावरी । ऐसे नित्य करी नेमालागी ॥३॥

घालोनि आसन बरवे बैसावे । स्तवन करावे जान्हवीचे ॥४॥

रामदास म्हणे अजपा संकल्प । करा नाश पाप केले तुमचे ॥५॥

२४० .

योगाभ्यास मग यथाशक्त्या करी । तुटे कर्मदोरी ज्या सेवने ॥१॥

ईडामार्गी वायु यथाशक्त्या ओढी । दडपावी गाढी तो कुंभक ॥२॥

पिंगळेच्या मार्गे सांडावे निश्वास । सुषुम्ना वेळ नाश होय जात ॥३॥

पिंगळे करावे युक्तीने पूरक । होईल कुंभक तितुका कीजे ॥४॥

रामदास म्हणे करावे रेचक । जेणे जाला एक प्राणायाम ॥५॥

२४१ .

ऐसे चढवितां चढे विशुद्ध जेव्हां । तुटे सर्व तेव्हां कर्मबंध ॥१॥

करावे ते स्नान वेदोक्तमंत्राने । त्रिपुंड्रधारण अष्ट स्थानी ॥२॥

भूशुद्धि भूतशुध्दि मातृकेचि न्यास । आरंभ संध्येस मग कीजे ॥३॥

शतत्रय जप गायत्रीचा कीजे । सहस्त्र जपिजे गुरुमंत्र ॥४॥

रामदास म्हणे यथाशक्ति मती । पुजावे श्रीपति मनी मूर्ती ॥५॥

२४२ .

करोनि पूजन वाचावे पुराण । श्रेष्ठ रामायण भागवत ॥१॥

स्तोत्र पाठ कीजे भिक्षेला मागतां । प्रिय तो अनंता येणे नेमे ॥२॥

आरंभ भिक्षेचा प्रहराचे वरी । मागावी घटिका चारी ग्रामामाजी ॥३॥

आणोनि ते अन्न भार्येसे अर्पावे । माध्यान्हीका जावे तीर्थावरी ॥४॥

रामदास म्हणे माध्यान्हीची विधि । आचरितां सिद्धि होय प्राण्या ॥५॥

२४३ .

जाऊनीयां तीर्थी स्नानासी करावे । त्रिपुंड्र धरावे द्वारावतिने ॥१॥

आसन मृगचर्म पात्र तो भोपळा । योगियाची कळा ऐसी धरिजे ॥२॥

माध्यान्हसंध्याणि सूर्यउपस्थान । जाल्या ब्रह्मयज्ञ मग कीजे ॥३॥

प्रतीक लक्षावा निर्मळ आकाशी । पृष्टी गभस्तीसी करोनियां ॥४॥

रामदास चिन्हे सांगे पुरुषाची । अवधी काळाची समजे तेणे ॥५॥

२४४ .

षण्मास मरण काळा तो पुरुष । होय देख त्यास निश्चयाने ॥१॥

नानावर्ण भासे उद्वेग होईल । पिंवळा रोगील भय लाली ॥२॥

दक्षिणभुजाहीन धर्मींचा तो नाश । थोडके आयुष्य राहील तो ॥३॥

वामभुजाहीन स्त्री षण्मासि जात । शिरहीन होत मरण मासी ॥४॥

रामदास म्हणे प्रतीक लक्षण । पाहोनि अवधान ठेवी काळा ॥५॥

२४५ .

इकडे भार्येने अन्न शिजवोनी । ठेवावे झांकुनी पति ये तो ॥१॥

माध्यान्ह सरोनि आश्रमासी यावे । देवासी करावे धूप दीप ॥२॥

नैवेद्य दावावे पदार्थ जो केला । श्रीवैश्वदेवाला मग कीजे ॥३॥

अतिथी पूजावा प्राप्त जाले द्वार । नाही हे उत्तर तया न कीजे ॥४॥

रामदास म्हणे प्रमाण सूत्राचे । घेतले लोकांचे खंडनार्थ ॥५॥

२४६ .

गोग्रास काढोनी कीजे भाग तीन । अतिथी आपण दोन घ्यावे ॥१॥

तिसरा जो भाग भार्येसि अर्पावा । अतिथी तर्पावा आर्ततेने ॥२॥

ग्रासोग्रासी राम म्हणत जेवावे । आंचवूनि घ्यावे तुळसीदळ ॥३॥

सरली ते भिक्षा स्तोत्रे जे उरली । पढावी त्या काळी शांत चित्ते ॥४॥

२४७ .

करावे स्तवन ऐकावे पुराण । शेष घडी तीन दिन राहेतो ॥१॥

क्षाळुनी पद हस्त संध्या आरंभावी । सरस्वती ध्यावी ब्रह्मदेवी ॥२॥

गभस्तिमंडळ नेत्राने लक्षावे । मरण पाहावे येणे आपुले ॥३॥

वर्ते उणे भासे षण्मासी मरण । तळी जरी न्युन मास तीन ॥४॥

रामदास म्हणे दक्षिणभागी उणे । दो मासी मरण हा नेम हो ॥५॥

२४८ .

वामभुजा कोरहि न दिसे जेव्हां । एकमासी तेव्हां मरण हो ॥१॥

मध्ये छिद्र देखे उरले दहा दिन । सधूम्रदर्शन उरले पांच ॥२॥

ज्वाळा निघे ऐसा गभस्ति अस्तासी । अवधी मरणाची प्रहर आठ ॥३॥

द्विशत गायत्री नियमे पढावी । मग ते म्हणावी रामरक्षा ॥४॥

रामदास म्हणे सायंकाळी कर्म । अतिप्त अति वर्म तेथिल हो ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP