मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
शारदा

देवताविषयक पदे - शारदा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


१०१५.
( राग-काफी; ताल-दादरा )
वंदा रे वंदा रे शारदा । शारदा देवी साधकासी वरदा ॥ध्रु०॥
परा पश्यंती मध्यमा । प्रसन्न होते उत्तमा आणि मध्यमा ॥१॥
त्रैलोकी जाणती कळा । तयेवीण कळाचि होती विकळा ॥२॥
दास म्हणे प्रचीती । सकळ जनी देतसे जगज्जेती ॥३॥

१०१६.
( चाल-भजनी )
ब्रह्मकुमारी शारदा ते वरदा ब्र० ॥ध्रु०॥
साधकाचे अभ्यंतरी ते शारदा । चतुर्विधा वागेश्वरी ते० ॥१॥
स्फूर्तिरुपे प्रकाशली ते० । वाचारुपे अनुवादली ते० ॥२॥
रामदासी कार्यसिद्धि ते० । चित्ती सहजसमाधी ते० ॥३॥

१०१७.
( चाल-साधुसंतां मागणे० )
कथाकथनी वंदिली सरस्वती । कथा० ॥ध्रु०॥
विणापुस्तकधारिणी । अनेकसुखकारिणी ।
अघेंदुरित हारिणी । त्रिभुवनतारिणी ॥१॥
चत्वार वाचा बोलवी । सकळ जन चालवी ।
त्रिभुवन हालवी । निरंजन पालवी ॥२॥
दास म्हणे अंतरी । अंतरी जगदांतरी ।
निगमगुज विवरी । आपुले हित करी ॥३॥

१०१८
( राग-भूप; ताल-त्रिताल )
नमिन मी गायका । गायका वरदायका ॥ध्रु०॥
विणापुस्तकधारिणी । अनेकसुखकारिणी । अधेंदुरितहारिणी ॥१॥
चत्वारवाचा बोलवी । सकळ जन चालवी । त्रिभुवन हालवी ।
निरंजन पालवी ॥२॥
दास म्हणे अंतरी । अंतरी जगदांतरी । निगमगुज विवरी ।
आपुले हित ते करी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP