मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
बहुरुपी

भारूड - बहुरुपी

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९६४.
( राग-काफी; ताल-धुमाळी )
खेळतो एकला बहुरुपी रे । पाहतां अत्यंत साक्षेपी रे ॥ध्रु०॥
सोंगे धरितां नानापरी रे । बहुतचि कळाकुसरी रे ॥१॥
दाखवी अनेक धातामाता रे । बोलतो अभिनव धाता रे ॥२॥
सदा पडदे लावितसे रे । फौजा सोंगाच्या दावितसे रे ॥३॥
गातो नाचतो वाजवितो रे । त्याग करितो देतो घेतो रे ॥४॥
ऐसा हा भूमंडळे थोडा रे । पाहताम तयासि नाही जोडा रे ॥५॥
अखंड खेळतो प्रगटेना रे । पाहती उदंड तयां दिसेना रे ॥६॥
पाहो जातां अंतचि लागेना रे । दास म्हणे खेळतां मागेना रे ॥७॥

९६५.
( राग-देस; ताल-धुमाळी )
माधोजीका ब्याह बनायो । एकेक दोभर सीधा पायो ।
ताको तीनो रोट बनायो । ताथे पंच चुरमा कीयो ॥१॥
जिने किया सो अपना खावे । वाके देखत खल्लक रोवे ।
मेरा मेरा सब कोइ भावे । झूटे हि मनमे प्रस्तावे ॥२॥
आज तो भला बोलो माधोजू । सुन माने सो साधोजू ।
खोज मनमो बाधाजू । बोध भये सुं गाजो जु ॥३॥
परदेशी माधो आया है । भेदो ताल बजाया है ।
घर घर फेरी पाया है । वचन अनेक सुनाया है ॥४॥
बरसकी रस सुनावे भाई । एक अनेक जमा नवल्याई ।
उस तनकसी जब खबर पाई । तो मासाई कासाई आई ॥५॥
वाराई नाराई आई । बामाई रामाई आई । शामाई धामाई आई ।
बोधाई कल्पाई आई ॥६॥
देसदेसकी बात सुनाऊं । ठोरठोरकी रहनी गाऊं ।
अबका जायसे फेर न आऊं । तांथे मनसे पूरण पाऊं ॥७॥
वो शंखधारी चपळा नारी । तलकी तिलीया बोजल भारी ।
तिजी जबतब दांत उघारी । वो नरसी पूरगका कोपहि भारी ॥८॥
वो सिद्धाश्रमकी कोपहिकारी । शरयूतिरकी संकटहारी ।
गोकुलकी चंचलचित्त बिहारी । भीमातरिकी बारी भोरी ॥९॥
माधोजीके पद सुनयो कान । माधोजीकूं दीजे दान ।
माधोजीकूं कीजे मान । तांथे पावे परम निधान ॥१०॥
पूर्वपंथसु माधो आयो । पश्चम जहांकी तहां समायो ।
रामीरामदास कहावे । कांहासे आवे कांहासे जावे ॥११॥

९६६.
दुधगा म्हणे मला केळांसरिसे न्याना । त्यांच्या मोले कां विकाना ॥१॥
वृंदावन म्हणे आजा बाबा । मजला कां न म्हणावे आंबा ॥२॥
गळ्याभोंवते अबिर लावितसाना । आग्या म्हणे मला तैसे कां लावाना ॥३॥
जवादिऐसे मजला कां मानाना । पुंगळ करितसे कल्पना ॥४॥
वस्त्रालागी पुटे देतसा नाना । कांबळकीडा म्हणे माझे कां हो द्याना ॥५॥
ढेंकुण म्हणे सेज फुलांची घालितां । आमची थाटे कां मारितां ॥६॥
पिसा पिसोळे घुंगरडी मारितसा । उगा करितां का वळसा ॥७॥
डांस कानटे बोलति ढेकणी । आम्हां काम करितां जांचणी ॥८॥
माशा गोमाशा त्या वसुवा पिसुवा । म्हणती बरे कर जीवा ॥९॥
वाघ मारिती अस्वले वेवदारीती । लोक तयासी मारिती ॥१०॥
दास म्हणे रे हा सहज स्वभाव । देऊन गेला रे तो देव ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP