TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
नवविधा भक्ति.

विविध विषय - नवविधा भक्ति.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


नवविधा भक्ति.

५११ .

देव निराकार त्या नाही आकार । आकारा संहार होत आहे ॥१॥

होत आहे जे जे ते सर्व जाणार । जाणार होणार सर्व माया ॥२॥

सर्व माया दिसे हे पंचभूतिक । आत्मा आहे एक निरंजन ॥३॥

निरंजनी जन वन कांही नसे । दृश्य भास भासे कल्पनेसी ॥४॥

कल्पनेसी भासे ते सर्व कल्पीतां । कल्पनेरहित परब्रह्म ॥५॥

परब्रह्म नाही ऐसा ठाव कैंचा । धन्य तो दैवाचा आत्मज्ञानी ॥६॥

आत्मज्ञानी नर पाहे सारासार । पुढे तदाकार होत आहे ॥७॥

होत असे जन्म सार्थक तयाचा । जेथे सज्जनाचा अनुग्रहो ॥८॥

अनुग्रह घडे बहुतां सुकृते । साक्षात्कार जेथे रोकडाची ॥९॥

अनुग्रह रोकडाची मोक्ष साधूचे संगती । चुके अधोगति आत्मज्ञाने ॥१०॥

आत्मज्ञाने होते आत्मनिवेदन । भक्तीचे लक्षण नवविधा ॥११॥

नवविधा भक्ति श्रवणे करावी । धारणा धारणा श्रवणाची ॥१२॥

श्रवणाची स्थिति ब्रह्मनिरुपण । श्रवण मनन निजध्यास ॥१३॥

निजध्यास जनी वस्तूचा धरावा । विचार करावा आपुलाचि ॥१४॥

आपुलाचि डाव ज्ञाने होतो वाव । जाणिजे उपाय श्रवणाचा ॥१५॥

श्रवणाचा भाव जाणते जाणती । तिन्हीही प्रचीती ऐक्यरुप ॥१६॥

ऐक्यरुप देव भक्त नामांकित । अनन्या अनंत जैसा तैसा ॥१७॥

तैसा आहे लाभ श्रवणभक्तीचा । जेथे विभक्तीचा ठाव नाही ॥१८॥

ठाव नाही ऐसे श्रवण जाणावे । कीर्तन करावे हेंचि आतां ॥१९॥

हेंचि हे कीर्तन नित्य निरंतर । ग्रंथाचे अंतर विवरावे ॥२०॥

विवरावे जेणे तोचि तो जाहला । रंक तो पावला राज्यपद ॥२१॥

पदी पद प्राप्त जाले संतसंगे । सद्य अंतरंगे समाधान ॥२२॥

समाधान जाले श्रवण कीर्तन । रामाच्या स्मरणे चित्तशुद्धि ॥२३॥

चित्तशुद्धि जाली तेणे ते धरावे । सेवन करावे सद्गुरुचे ॥२४॥

सद्गुरु करावा ते पादसेवन । सद्गुरुने ज्ञान होत आहे ॥२५॥

होत आहे ज्ञान सद्गुरुकरितां । होय सार्थकता गुरुचेनि ॥२६॥

गुरुचेनि परलोक ठायी पडे । सार ते निवडे प्रत्ययेसी ॥२७॥

प्रत्ययेसी बोले तेंचि ते बोलणे । अर्चन करणे गुरुदेवा ॥२८॥

गुरुदेवालागी करी नमस्कार । सहावा विचार भक्ति ऐसी ॥२९॥

सर्व दास्य कीजे ते भक्ति सातवी । सख्य ते आठवी भक्ति जाण ॥३०॥

नवमीचे लक्षण आत्मनिवेदन । सर्वदा अभिन्न परब्रह्मी ॥३१॥

परब्रह्म स्वये आपणचि होणे । ऐसी ही लक्षणे सार्थकाची ॥३२॥

सार्थक भजन आत्मनिवेदन । विवेके अभिन्न देवभक्त ॥३३॥

देवभक्त कैसे हे आधी पहावे । स्थितीने रहावे सर्वकाळ ॥३४॥

सर्वकाळ वस्तु आहे जैसी तैसी । देह प्रालब्धासी समर्पिला ॥३५॥

समर्पिला त्यासी होणार होईल । जाणार जाईल पंचभूत ॥३६॥

पंचभूत माया मायिक दिसते । होते आणि जाते स्वप्नाकार ॥३७॥

स्वप्नाकार माया आपण वेगळा । असोनि निराळा सर्वांमध्ये ॥३८॥

सर्वांमध्ये आहे त्यासी सर्व पाहे । आहे तैसा आहे सदोदित ॥३९॥

सदोदित वस्तु तेचि ते आपण । रामदास खूण सांगतसे ॥४०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-24T09:47:01.5630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

working face

  • संदर्भ पृष्ठ 
  • (also surface face) 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.