मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| मारुती विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव देवताविषयक पदे - मारुती श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ मारुती Translation - भाषांतर १११३.कैवारी हनुमान, आमुचा ॥ध्रु०॥पाठी असतां तो जगजेठी । वरकड काय गुमान ॥१॥नित्य निरंतर रक्षी नाना परी । धरुनियां अभिमान ॥२॥द्रोणागिरी करि घेउनि आला लक्ष्मणप्राणनिधान ॥३॥दासानुदासा हा भरंवसा । वहातसे त्याची आण ॥४॥१११४.मारुति सख्या बलभीमा रे० ॥ध्रु०॥अंजनिचे वचनामृत सेवुनि । दाखविसी बलसीमा रे० ॥१॥वज्रतनू अति भीम पराक्रम । संगित गायनसीमा रे० ॥२॥दास म्हणे तूं रक्षी आम्हां । त्रिभुवनपालनसीमा रे० ॥३॥१११५.( राग-देशीखमाज; ताल-धुमाळी; चाल-बहुरंगा रे० )महिमंता रे हनुमंता । संगितज्ञानमहंता रे ॥ध्रु०॥बलभीमा रे गुणसीमा । सीमाचि होय निःसीमा रे ॥१॥कळिकाळा रे विक्राळा । नेत्रिं भयानक ज्वाळा रे ॥२॥हरिधामा रे गुणग्रामा । दास म्हणे प्रिय रामा रे ॥३॥१११६.( राग-देस; ताल-त्रिताल )मारुति हा श्रीरामाचा दास । ध्यावा मनी हो ॥ध्रु०॥कुंडलमंडित पीतांबर कांटे ॥ गर्भी सुवर्णाची कास ॥१॥वानरवेषे हा बलसागर । भेदियले सुर्यमंळास ॥२॥अणिमादिक कर जोडूनि ठेले । न पाहे त्यांची वास ॥३॥रामभजनपर दास निरंतर । संभाळीतो धरा विश्वास ॥४॥१११७.( राग-काफी; ताल-दीपचंदी; चाल-राजी राखो रे० )आनंदरुप वनारी रे तो आनं ॥ध्रु०॥सुरवरनरमुनिजनमनमोहन । सकळ जनां सुखकारी रे ॥१॥अचपळ चपळ तनु सडपातळ । दास म्हणे मदनारी रे ॥२॥१११८.( चाल-उद्धवा शांतवन० )किती प्रताप वर्णू याचा । श्रीसमर्थ मारुतीचा ॥ध्रु०॥सूर्य तपेल बारा कळी । पृथ्वीची होईल होळी । अंतक जो कळिकाळाचा ॥१॥कल्पे अनंत होती जाती । नोहे वृद्ध तरुण मारुती । अजरामर देह जयाचा ॥२॥दास म्हणे धन्य बलभीमा । सहस्त्रमुखा न वर्णवे महिमा । काय बोलूं मी एक जिभेचा ॥३॥१११९.( राग-सारंग; ताल-धुमाळी )सामर्थ्याचा गाभा । तो हा भीम भयानक उभा ॥पाहतां सुंदर शोभा । लांचावले मन लोभा ॥ध्रु०॥हुंकारे भुभुःकारे । काळ म्हणे रे बा रे ॥विघ्न तगेना थारे । धन्य हनुमंता रे ॥१॥दास म्हणे वीर गाढा । रगडित घनसर दाढा ॥अभिनव हाचि पवाडा । पाहतां न दिसे जोडा ॥२॥११२०.( राग-सारंग; ताल-धुमाळी )पिंगाक्ष भव्य वदना । देवा निर्भय भक्तसदना ॥ध्रु०॥चंचल रुप वितंड स्वरुप । दया रघुभूप उदंड करी ॥१॥पुच्छे लपेटून दैत्य झपेटून । काळ चपेटून नेत असे जयवंत हरिवर ॥२॥भव्य भयानक तो कपिनायक । मज वरदायक दास म्हणे महिमा न गणे हर ॥३॥११२१.( राग-देशी खमाज; ताल-धुमाळी )अचाट बळ या भीमाचे । अघटित घडवी नेमाचे ॥ध्रु०॥सीताशुद्धि लागेना लागेना भूगोळ फिरतां भागेना ॥१॥घमंड केली त्रिकुटी त्रिकूटी । राक्षसाला कुटाकूटी ॥२॥उदंड मोठा धाकूटा धाकूटा । हडबडले त्रिकूटा ॥३॥लांगूळ लांब उदंड उदंड । वेढो शके ब्रह्मांड ॥४॥वज्रशरीरी छेदेना छेदेना । कळिकाळ भेदेना ॥५॥वानर मोठा हटवादी हटवादी । त्रिकूटी जन रोधी ॥६॥उदंड गगनी उडाला उडाला । द्रोणगिरी घेउनि आला ॥७॥धुराची नेल्या पाताळा पाताळा । साधुनि आला त्या काळा ॥८॥आवडी मोठे कामाचा कामाचा । दास म्हणे प्रिय रामाचा ॥९॥११२२.( राग-देशी खमाज; ताल-धुमाळी ) अचाट बळ या भीमाचे । कार्य करितो नेमाचे ॥१॥अवघड लंका रोधिली रोधिली । बळेंचि सीता शोधिली ॥२॥दुरिपंथ तो उडाला उडाला । द्रोणागिरी घेउनि आला ॥३॥रघुनाथाला विश्वास विश्वास । धन्य मारुती निकट दास ॥४॥११२३.( राग-कानडा; ताल-त्रिताल )तो हा प्रळयरुद्र हनुमान । न वर्णवे महिमान ॥ध्रु०॥नील शैल्यसम भीषण भीमवारण वज्रशरीरी । ठाण उड्डाण मांडूनी उभा लांगुळ भूमी थरारी ॥१॥कांचकच्छ पीतांबर कांसे वाहुनी पहा चपेटा ।तीक्ष्ण नखे रोमावळी सित काळासी देत थपेटा ॥२॥कुंडले लोळ कपोळ झळाळित लोचन पीटतावी ।विक्रांतानन दशन भयंकर अदट वरि दटावी ॥३॥ब्रह्मचारी शिखा सूत्रधारी मेखळा अती शोभताहे ।दास उदास रामासन्मुख हस्तक जोडूनी आहे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP