मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
बाळसंतोष.

भारूड - बाळसंतोष.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९६७.
( राग-देस; ताल-धुमाळी )
दाता समर्थ त्रिजगती । अचळ स्वरुपसंपति । सर्वहि सिद्धि वोळंगती ।
कृष्ण याचकाची कीर्ति । बाबा बाळसंतोष ॥१॥
नाम घेतां हरती दोष । भुवनत्रयी कीर्तिघोष । माझा पालटे हा वेष । बाबा बाळ० ॥२॥
मुळी उघडा मी असे । मज पांघराया नसे ।
तुझिया नगरा आलो असे । माया दिधली परियेसी । बाबा बाळ० ॥३॥
पिवळे शुभ्र आणि ताम्र । काळे नीळे हे अंबर ।
याचा मिरवितो बडिवार । आतां देईं चिदंबर । बाबा बाळ० ॥४॥
बाळसंत ते अनंत । कोण जाणे यांचा अंत ।
कळले वर्णोतो किंचित । तुंवा ए केलेसे भराभरित । बाबा बाळ० ॥५॥
बाळसंत ध्रुव जाला । भगवंतासि शरण आला ।
सघनांबरे गौरविला । अढळ अधिष्ठानी केला । बा० ॥६॥
बाळसंत उपमन्यु । दृढ याचकु अनन्यु । क्षीरसागरे अनन्यु ।
केला सुरवरांसि मान्यु । बाबा० ॥७॥
बाळसंत तो प्रल्हाद । नामस्मरणाचा आल्हाद ।
त्यासी दिधला परमानंद । प्रेमांबर दे गोविंद ॥ बाबा० ॥८॥
बाळसंत तो भद्रशीळ ।
जन्मापासुनि प्रेमळ । अचळ दे कृपाळ । मुनि गालवाचा ॥९॥
सनकादिक जनक शुक । ब्रह्मगोलक कौतुक ।
नारदतुंबर अनेक । दे अंबर अलोलिक ॥ बाबा० ॥१०॥
बाळसंत सकळाधारा । रामदास आला द्वारां ।
रामी निर्भर जाला पुरा । दिधले स्वरुपअंबरा । बाबा० ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP