मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| पाळणा विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव देवताविषयक पदे - पाळणा श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ पाळणा Translation - भाषांतर १०७१.( राग-धनाश्री; ताल-धुमाळी; चाल-अभ्यास पाहिजे )नयेल काय आजिं रामु । माझिया जिवाचा विश्रामु ॥ध्रु०॥दिवस पुरले धैर्य सरले । वियोगे प्राण शमूं ॥१॥पुढती उभा राहे अष्ट दिशा पाहे । विकळ होय परमू ॥२॥रामीरामदास वेधले मानस । केव्हां भेटेल सर्वोत्तमू ॥३॥१०७२.( राग-असावरी; ताल-दीपचंदी )धन्य रघूत्तम धन्य रघूत्तम धन्य रघूत्तमलीळा ।त्रिभुवनकंटक राक्षस मारुनी फोडियल्या बंदिशाळा ॥ध्रु०॥प्रजापालक हा रघुनायक ऐसा कदापि नाही ।उद्वेग नाही चिंता नाही काळदुष्काळहि नाही ॥१॥व्याधि असेना रोग असेना दैन्य वसेना लोकां ।वार्धक्य नाही मरण नाही कांहिच नाही शंका ॥२॥सुंदर लोक सभाग्य बळाचे बहु योग्य बहुत गुणांचे ।विद्यावैभव धर्मस्थापना कीर्तिवंत भूषणाचे ॥३॥१०७३.( राग-श्रीराग; ताल-धुमाळी )देव वैकुंठीचा । कैपक्षी देवाचा । भार फेडिला भूमीचा । आत्मा सर्वांचा ॥१॥पाळक प्रजाचा योगी योगियांचा । राजा सूर्यवंशीचा तो अयोध्येच ॥२॥राम सामर्थ्याचा कैवारी देवांचा । मेघ वोळला सुखाचा न्यायनीतीचा ॥३॥उद्धार अहिल्येचा एकपत्नीव्रताचा । सत्य बोलणे वाचा जप शिवाचा ॥४॥नाथ अनाथांचा स्वामी हनुमंताचा । सोडविता अंतीचा रामदासाचा ॥५॥१०७४.( राग-धनाश्री; ताल-दीपचंदी; चाल-अभ्यास० )राघव पुण्यपरायण रे० ॥ध्रु०॥पुण्यपरायण धार्मिक राजा । आनंद केला बहुत ॥१॥धर्मपरायण धार्मिक राजा । सकळहि नीति न्याय ॥२॥रामराज्य सुखरुप भूमंडळ । दुःखशोक दुरि जाय ॥३॥दास म्हणे हा पूर्णप्रतापी । महिमा सांगो काय ॥४॥१०७५.( राग-विलावल; ताल-धुमाळी; चाल-ऐसे ध्यान समान० )वैकुंठवासी रम्य विलासी देवाचा वरदानी । तेहतीस कोटी सुरवर सोडी भक्तांचा अभिमानी ॥ध्रु०॥तो राघव ध्याय सदाशिव अंतरि नाम जयाचे ।रमणीय सुंदर रुप मनोहर अंतरध्यान तयाचे ॥१॥त्रिंबकभंजन मुनिजनरंजन गंजनदानवपापी ।बाणी जर्जर घोर महावीर केले पूर्ण प्रतापी ॥२॥वरद हरिगण दास बिभीषण सेवक वज्र शरीरी ।भूमि चराचर चंद्र दिवाकर तंवरी भय अपहारी ॥३॥१०७६.( राग-श्रीराग; ताल-धुमाळी )अनेक सप्तस्वरी भरण गगनोदरी विवर विवरो करी भेदाभेद ॥ध्रु०॥राजीवलोचन अमरमोचन । दुरितसंकोचन नाम तुझे ॥१॥झणझणझणझण खणखणखणखण । दणदणदणदण घनस्वर ॥२॥रंग कामाचे सारासार मंडळ तोरा । सारंगीचा वारा विणेध्वनी ॥३॥सुंदर नाचती सवेंचि उफाळती । सरस नाचती गाति अनेक भेद ॥४॥खळखळखळखळ खुळखुळखुळखुळ । निवळ निवळ कळा चपळ गाणे ॥५॥धिधिकट धिधिकट ध्रिमिकट ध्रिमिकट ॥ बिकटबिकटबिकट खलप ताळे ॥६॥अनेक सुस्वरे भेदे अनेक वचनभेदे । अनेक गायनभेदे वेधु लागे ॥७॥नेत्रन्यास करन्यास सिरन्यास पदन्यास । शरीरे अंतरन्यास सकळ कांही ॥८॥उदंडचि सुख लोटे अमृत नलगे वाटे । संगीते अंत दाटे बोलतां न ये ॥९॥रामदास म्हणे आतां गुण सगुण गातां । भक्तिपंथे जातां समाधान ॥१०॥१०७७.( राग-श्रीराग; ताल-झंपा )मुगुट तेजाळ नाना रत्नांची कीळ । भव्य भाळ विशाळ मुख रसाळ ॥१॥आकर्ण नयन ध्यानस्थाचे ध्यान ।सौम्य लीळा गहन जनपावन ॥२॥भूषणमंडित चापशरांकित ।भद्रासनी शोभत पुढे हनुमंत ॥३॥सर्वांगे सुंदर कासे पीतांबर ।चरणी ब्रीदाचा तोडर वांकीगजर ॥४॥सर्व भुवनपाळ दीनाचा दयाळ ।करी भक्ताचा सांभाळ त्रैलोक्यपाळ ॥५॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP