मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| उपदेशपर विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - उपदेशपर श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ उपदेशपर Translation - भाषांतर ६७१.रावणासारिखी कोणाची संपत्ति । तोहि गेला अंती एकलाचि ॥१॥एकलाचि गेला तो वाली वानर । कपी थोर थोर तेहि गेले ॥२॥गेले चक्रवर्ती थोर वैभवाचे । फारा आयुष्याचे ऋषेश्वर ॥३॥ऋषेश्वर गेले मार्कंडीसारिखे । बहुतांचे लेखे कोण करी ॥४॥कोण करी सर्व शाश्वत आपुले । सर्व राज्य गेले कौरवांचे ॥५॥कौरव निमाले पांडव गळाले । यादवहि गेले एकसरे ॥६॥एकसरां गेले राजे थोर थोर । आणिक श्रीधर भाग्यवंत ॥७॥भाग्यवंत गेले एका मागे एक । हरिश्चंद्रादिक पुण्यशीळ ॥८॥पुण्यशीळ गेले कीर्ती ठेवूनीयां । पापी गेले वायां अधोगति ॥९॥अधोगति गेले देवा न भजतां । संसारी असतां माझे माझे ॥१०॥माझे माझे म्हणे साचाचीयेपरी । सेखी दुराचारी एकलाचि ॥११॥एकलाचि येतां एकलाचि जातां । मध्येंचि दुश्चिता मायाजाळ ॥१२॥मायाजाळी पापेजन गुंडाळले । पुण्यशीळ गेले सुटोनियां ॥१३॥सुटोनीयां गेले सायुज्यपदासी । रामीरामदासी चिरंजीव ॥१४॥६७२.सर्व देव जेणे घातले बांदोडी । त्याची मुरकुंडी रणांगणी ॥१॥ऐसा काळ आहे सर्वां गिळिताहे । विचारुनि पाहे आलया रे ॥२॥इंद्रजित नाम इंद्रासी जिंकिले । त्याचे शीर नेले गोळांगुळी ॥३॥देवां दैत्यां वाळी बळी भूमंडळी । तया एके काळी मृत्यु आला ॥४॥देवासी पीटिले तया जाळंधरे । तोडिले शंकरे शिर त्याचे ॥५॥करे भस्म करी नाम भस्मासुर । तयाचा संहार विष्णु करी ॥६॥प्रल्हादाचा पिता चिरंजीव होता । नरसिंह मारिता त्यासी होय ॥७॥विरोचना घरी विष्णु जाला नारी । तया यमपुरी दाखविली ॥८॥गजासुर गेला दुंदुभी निमाला । प्रताप राहिला वैभवाचा ॥९॥ऐसे थोर थोर प्रतापी अपार । गेले कलेवर सांडूनीयां ॥१०॥शरीर संपत्ति सर्व गेली अंती । सोसिल्या विपत्ती एकाएकी ॥११॥म्हणोनी वैभवा कदा भुलो नये । क्षणा होय काय ते कळेना ॥१२॥रामदास म्हणे स्वहित करणे । निर्धारे मरणे मागे पुढे ॥१३॥६७३.सूर्याकार भिंती लिहिला सूर्य चांग । प्रकाश तो चांग नये नये ॥१॥धीट पाठ कवित्व करवेल अव्यंग । प्रसादिक रंग नये नये ॥२॥संताची आकृति आणवेल युक्ती । परि कामक्रोधा शांति नये नये ॥३॥भागवतीचा भाव आणवेल आव । करणीचा स्वभाव नये नये ॥४॥रामदास म्हणे रामकृपेवांचोनी । बोलाऐसी करणी नये नये ॥५॥६७४.देखतां दिनमणी नेत्रां होय पारणी । उलुकास पळणी नव्हेल काय ॥१॥सेवितां अमृत अमर होइजे सत्य । राहूसी ते मृत्य नव्हेल काय ॥२॥पक्वान्ने षडरसे रुचि वाटे सर्वांसी । विष रोगियांसी नव्हेल काय ॥३॥देखतां दर्पण सकळां समाधान । निर्नासिका अपमान नव्हेल काय ॥४॥वर्षतां मुक्तासी आनंद हंसासी । प्रळय वायसासी नव्हेल काय ॥५॥रामदासी करितां रामाचे दास्य । हतभाग्यासी विष नव्हेल काय ॥६॥६७५.मृत्तिकेचा शौच करी नानापरी । मागुता टरारी नर्क तेथे ॥१॥नर्क तेथे आहे तो कैसा काढावा । व्यर्थ वाढवावा ॥२॥लोकाचार केला लौकिका देखतां । अंतरी शुद्धता आढळेना ॥३॥आढळेना ज्ञान पूर्ण समाधान । सर्वदा बंधन संदेहाचे ॥४॥संदेहाचे पाप जाले वज्रलेप । विचारे निष्पाप रामदासी ॥५॥६७६.शिंक जांभई खोकला । तितुका काळ व्यर्थ गेला ॥१॥आतां ऐसे न करावे । नाम जीवी ते धरावे ॥२॥श्वास उश्वास निघतो । तितुका काळ व्यर्थ जातो ॥३॥पात्यांपाते नलगत । तितुके वय व्यर्थ जात ॥४॥लागे अवचित उचकी । तितुके वय काळ लेखी ॥५॥म्हणे रामीरामदास । होतो आयुष्याचा र्हास ॥६॥६७७.पूर्व भूमिका सांडिली । जीव झाला दिशाभुली ॥१॥ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणा आपण ॥२॥द्रव्य आपण ठेविले । ज्याचे तयासि चुकले ॥३॥रामदास म्हणे घरी । दार चुकले अंधारी ॥४॥६७८.कर्ता एक देव तेणे केले सर्व । तयापाशी गर्व कामा नये ॥१॥देह हे देवाचे वित्त कुबेराचे । तेथे या जीवाचे काय आहे ॥२॥देता देववीता नेता नेववीता । कर्ता करवीता जीव नव्हे ॥३॥निमित्ताचा धणी केला असे प्राणी । पहातां निर्वाणी जीव कैंचा ॥४॥लक्षुमी देवाची सर्व सत्ता त्याची । त्याविण जीवाची उरी नाही ॥५॥दास म्हणे मना सावध असावे । दुश्चित नसावे सर्वकाळ ॥६॥६७९.स्वप्न हा संसार मायिक व्यवहार । म्हणोनि साचार मानूं नये ॥१॥मानूं नये सर्व जायाचे आपुले । ज्याचे त्याने नेले दुःख काय ॥२॥दुःख काय आतां स्वप्नसुख जातां । साच ते तत्त्वतां दृढ धरी ॥३॥दृढ धरी मना जानकीजीवना । तेणे समाधाना पावशील ॥४॥पावशील निज स्वरुप आपुले । जरी ते घडले रामदास्य ॥५॥रामदास्य घडे बहुतां सुकृते । कांही पुण्य होते पूर्वजांचे ॥६॥६८०.पायी लावूनियां दोरी । भोंगा बांधिला लेंकुरी ॥१॥तैसा पावसी बंधन । मग तुज सोडी कोण ॥२॥हाती धरोनी वानर । हिंडविती दारोदार ॥३॥रामदास म्हणे पाहे । रीस धांपा देत आहे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP