मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| पाळणा विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव देवताविषयक पदे - पाळणा श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ पाळणा Translation - भाषांतर १०६६.( चाल-अंजनीगीताची )आतां येथे तुजविण । कैसा राहिला माझा प्राण ।नाही राम ना रावण । राहूं मी कोठे ॥ध्रु०॥त्रिजटा बोले जानकीसी । वत्से जासी अयोध्येसी ।आतां माझी गती कैसी । होईल गे सीते ॥१॥जन्मांतरी पाप केले । म्हणुनी राक्षसकुळा आले ।राम परब्रह्म सांवळे । अतरले मज ॥२॥मी तंव राक्षस कुळहीन । नाही केले जप तप ध्यान । राम माझा अभिमान । धरिल गे कैसा ॥३॥सीता बोले त्रिजटेबाई । माझी सर्वस्वे तूं आई । तुजला ठाव रामापायी । देईन मी आतां ॥४॥ऐसी बोले मंजुळ वाणी । त्रिजटा बैसेचि ये ठाईनी ।रामदासाचा अभिमानी । आणी मी येथे ॥५॥१०६७.( अंजनगीत ) लंकेहूनी अयोध्ये येतां । राम लक्ष्मण सीता ।हनुमंते अंजनी माता । दाखविली रामा ॥१॥चौघें केला नमस्कार । काय बोले रघुवीर ।माते तुझिया कुमरे थोर । उपकार केला ॥२॥सीताशुद्धी येणे केली । लक्षुमणाची शक्ति हरिली ।लंका जाळुन निर्दाळिली । राक्षससेना ॥३॥अहिरावण महिरावण जाणा । घात करिती आमुचे प्राणा ।भवानी रुपे दोघां जणा । रक्षियेले येणे ॥४॥माते तुझिया उदरी जाण । हनुमंत जन्मले रत्न ।आवघे माझे रामायण । याचेनी योगे ॥५॥आठरा पद्म वानरभार । रामे युद्ध केले थोर ।सिळा सेतू सिंधू फार । सायासे केला ॥६॥ऐकुनी पुत्राची ही ख्याती । अंजनी तुच्छ मानी चित्ती ।म्हणे कां बा रघूपती । वहासी ओझे ॥७॥हाकां माझ्या उदरी आला । गर्भीहुनी कां नाहे गळाला ।आपण असतां कष्टवीला । स्वामी कां राम ॥८॥माझी ये दुग्धाची ही प्रौढी । कळिकाळाची नरडी मुरडी ।रावणादिक बापुडी । घुंगुर्डी काय ॥९॥क्षणामध्ये रावण वधुनी । जरि कां आणितां राघवपत्नी ।तरी पुत्राचा माझेमनी उल्हास होता ॥१०॥असत्य वाटेल रामा बोली । दुग्धधारा ते सोडिली । शिळा उदरी खोचुन गेली । त्रिखंडे तेव्हां ॥११॥सीता बोले अंजनीसी । बाळावरि कां कोपित होसी ॥आज्ञा नाही हनुमंतासी ॥ श्रीरामे केली ॥१२॥पाहुनी तिच्या पराक्रमा । आश्चर्य वाटले रामा ।रामदासा दिधला प्रेमा । श्रीरामापायी ॥१३॥१०६८. ( एकताल पंचक )वेध लागला रामाचा । सुरवरविश्रामाचा ॥ध्रु०॥तेथे सुरवरनरकिन्नरविद्याधरगंधर्वाचा मेळा ॥ तेथे गायनकळा रंग आगळा । वाहे अमृतवेळा ॥तो सुखसोहळा देखुन डोळा । लाचावे मनमेळा ॥१॥एकताल मृदांगे श्रुति उपांगे । गाती नवरसरंगे ॥एकरंग सुरंगे दाविती संगे । सप्तस्वरांची आंगे ॥एक अनेक रागे आलापयोगे । बिकट ताल सुधांगे ॥एक झकिट किटकिट थरिक थरिक । वाजती चपळांगे ॥२॥तेथे खणखणखणखण टाळ वाजती । झणझणझणझण यंत्रे ॥तेथे दणदणदणदण मृदंग मंजुळ । तालबद्ध परतंत्रे ॥तेथे चणचणचणचण शब्द बोलती । वाणी चपळ सत्पात्रे ॥तेथे घणघणघणघण घंटा वाजती । अनुहाते शूळमंत्रे ॥३॥तेथे झगझगझगझग झळकति रत्ने । खचित बैसे शोभा ॥तेथे धगधगधगधग तेज आगळे । लावण्याचा गाभा ॥तेथे घमघमघमघम सुगंध परिमळ । षट्पद येती लोभा ॥पवनतनुज दासाचे मंडण । निकट राहिला उभा ॥४॥१०६९. ( राग-मारु; ताल-त्रिताल )नये नये नये राघव आजि कां नये ॥ध्रु०॥जीव जीवाचा जप शिवाचा । कृपाळु दीनाचा राघव० ॥१॥प्राण सुरांचा मुनिजनांचा । भरवंसा तयाची ॥२॥विसर जाला काय तयाला । दासांनी गोंविला ॥३॥१०७०.( राग-पावक; ताल-धुमाळी )अव्हेरिले वाटे रामे वैभव काय आतां ।करुन देहाचे दहन पावेन रघुनाथा ॥ध्रु०॥दिवस पुरले रामाचे भरत वाट पाहे ।अश्रु पूर्ण निरज डोळा कंठ दाटताहे हो ॥१॥जनकजननी जिवलग बंधु स्वामि माझा ।कैसा देव दयाळु आत्माराम राजा ॥२॥करुनि निश्चयो दहनाचा पुरिमाजिं आला ।चिन्ह देखोनि भरताचे लोक हडबडिला ॥३॥जनस्वजन रुदती रामदास स्थिती । तंव आनंदाची गुढी घेऊन रुद्र येती ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP