मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
सर्प

भारूड - सर्प

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९९९.
होतां अज्ञानाचे बिळी । डसला देहभाव अंगुळी ॥१॥
अहंविख डसतां व्याळ । वैद्य पाचारा गोपाळ ॥२॥
उगवतां दिवसी डसला तोंडी । चढतां वळतसे मुरकुंडी ॥३॥
सुखदुःखाचिया जाणा । लहरी येताति दारुणा ॥४॥
विषयनिंब लागे गोडू । धान्य हरिनामाचे कडू ॥५॥
वरि वरि हात झाडुनि काय । अभ्यंतर शोधुनि पाहे ॥६॥
रामदासा नित्य उतार । जवळा वैद्य रघुवीर ॥७॥

१०००.
ध्यान लागले विषयांचे । करा उतार हरिनामाचे ॥१॥
अविद्याझेंडु वसला कंठी । बोध पाजुनि फोडा घाटी ॥२॥
ज्ञानतुपे दीप लावा । स्नेह सांडूनि जागवा ॥३॥
रामदास म्हणे अवधारा । जीव आहे तो प्रयत्न करा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP