मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| उपदेशपर विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - उपदेशपर श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथाभूपाळीसमर्थ उपदेशपर Translation - भाषांतर ६११.संसाराची कथा आतां सांगईन । सुखासाठी लग्न आरंभीले ॥१॥आरंभीले लग्न आणिली नोवरी । रिणे घरोघरी मागतसे ॥२॥मागतसे त्यासी कोणीच देईना । अन्नही मिळेना खावयासी ॥३॥खावयासी नाही लेवायासी नाही । अन्न वस्त्र नाही सर्व काळ ॥४॥सर्वकाळ गेला चिंताचि करितां । अखंड दुश्चीता श्वास सांडी ॥५॥सांडी स्नान संध्या सांडी नित्यनेम । रात्रंदिवस काम संसाराचे ॥६॥संसाराचे काम पुरेना उदंड । दीसेंदिस भंड आरंभले ॥७॥आरंभी नोवरी म्हणे आणा आणा । रात्रंदिस आणा आरंभील्या ॥८॥आरंभले घर मांडला संसार । नित्य करकर भांडणाची ॥९॥तेल मीठ आणा भाजीपाले आणा । धान्य घरा आणा कांहीतरी ॥१०॥कांही तरी सेणी सर्पण जळण । पात्र सांठवण करावया ॥११॥करावया स्वैंपाक सांठवणी । गाडगी वेळणी परियेळ ॥१२॥घालावया धुण पाहिजे मांधण । फुटके रांझण धड आणा ॥१३॥धड आणा डेरे भाचरी मडकी । कुंडाले आणिखी घागरी त्या ॥१४॥घागरी दुधाणी सेंदावया पाणी । आणि चिंचवणी घालावया ॥१५॥घालावया सुंठी हिंग जिरे मिरे । सेणेरे पोतेरे पाहिजे की ॥१६॥गोठे दारवंटे चौकटी अर्गळा । कड्या कोंड्या खिळा ठाई ठाई ॥१७॥ठाई पडे अन्न तरी हा भाग्याचा । धोका संसाराचा रात्रंदीस ॥१८॥दिसा धोका करी रात्री चिंता करी । दुःख परोपरी संसारीचे ॥१९॥संसारीचे दुःख कांही एक सुख । सर्व काळ धाक वाहतसे ॥२०॥वाहतसे धाका धाकतसे लोकां । तोंडावरी थुंका पडेना की ॥२१॥पडेना की घर मोडलेसे आढे । रोडकेंसे घोडे हारपले ॥२२॥हारपले आतां पाहो कोणे वाटे । मोडताती कांटे आणि ठेंचा ॥२३॥ठेंचा तिडका द्याव्या मुमळी सोसाव्या । रात्रंदिस सीव्या देती लोक ॥२४॥लोक लाता देती चुकतां मारिती । रिणकरी घेती वेंटाळूनि ॥२५॥वेंटाळुनी घेती मुले घरभरी । अन्न पोटभरी मिळेना की ॥२६॥मिळेना की अन्न कोरडे भोजन । पोरे वणवण करीताती ॥२७॥करिताती चिंता ते अस्त्रीपुरुषे । आहा जगदीशे काय केले ॥२८॥केले थोर पाप सीणावरी सीण । संसार कठीण कळो आला ॥२९॥आला गेला लोक पाहेना विचार । पाहुण्यांनी घर बुडविले ॥३०॥बुडविले घर ते आणा घालती । येती काकुळती दोघेजण ॥३१॥दोघेजणे होती बहुजणे जाली । भिकेसी लागली दारोदारी ॥३२॥दारोदारी दोघे मागती उसने । रिण केले दुणे देया नाही ॥३३॥नाही सुप पाटी पाळी काथवटी । कांही हाटवटी मागतसे ॥३४॥मागतसे माले नागवणेसाठी । म्हणे देशांकाठी घेऊनी जावे ॥३५॥जावे आतां देशी कामा नये कदा । भोगाव्या आपदा किती म्हणूं ॥३६॥किती म्हणूं सीण करावा हव्यास । चित्त कासावीस रात्रंदिस ॥३७॥करीतसे यत्न होउनी येईना । आहारे प्राक्तना काय करुं ॥३८॥काय करुं आता कर्म बळीवंत । आम्हां भगवंत कोठे गेला ॥३९॥गेला हा लौकिक आतां राहे कैसा । ऐसा दाही दिशा येकवटी ॥४०॥येकवटी सेण गोवर्या कराया । आणि पेटवाया सेणकाड्या ॥४१॥सेणकाड्या तृण पाने पत्रावळी । कोणी नाही वळी गुरे खासा ॥४२॥खासा वेगा ताणी खासा आणि पाणी । मागुती आईणी बोलतसे ॥४३॥बोलतसे येक चालतसे येक । मागे पुढे लोक हांसताती ॥४४॥हांसताती त्यासी भांडावया उठतो । भांडतां तुटतो ठायी ठायी ॥४५॥ठायी ठायी पोरे हागती मुतती । खोकिती ओकिती चहूंकडे ॥४६॥चहुंकडे केर दाटला उकीर । नित्य करकर भांडणाची ॥४७॥भांडता भांडता निघोनियां गेला । जाउनियां आला किती वेळ ॥४८॥किती वेळ व्यथा वांचला मागुता । व्यथेवरे व्यथा उद्भवल्या ॥४९॥उद्भवल्या व्यथा रोग परोपरी । तेथेंचि बाहेरी बैसतसे ॥५०॥बैसतसे चोर पोर जाला थोर । मारमारुं बुर काढीतसे ॥५१॥काढीतसे बुर त्या दोघाजणांचा । पाळिला पोरांचा पोरवडा ॥५२॥पोरवडा जाला कामा नाही आला । अदृष्ट पोराला काय बोल ॥५३॥बोलतां बोलतां लाविला गळफांस । अस्त्री कासावीस होतसे ॥५४॥होत असे भंड त्या दोघांजणांचे । सुख संसाराचे बरे पहा ॥५५॥बरे पाहा मनी जाणते लोकहो । वायांवीण मोहो धरीतसे ॥५६॥धरीतसां मोहो देवेवीण वायां । अंती आयाबाया चावळतां ॥५७॥चावळताम का रे देव ओळखाना । धुंडूनि काढाना कोठे तरी ॥५८॥कोठे तरे देव पावेल निर्वाणी । नित्य निरुपणी संतसंगे ॥५९॥संतसंगे दोष नासती विशेष । आणि जगदीश ठायी पडे ॥६०॥ठायी पडे तेव्हां जिणे धन्य जाले । सार्थक चि केले संसाराचे ॥६१॥संसाराचे कोण शाश्वत मानावे । म्हणोनि जाणावे परब्रह्म ॥६२॥निरंजनी जन जनी निरंजन । जाणती सज्जन विवेकाचे ॥६३॥विवेकाचे जन मिळतां संकट । व्यर्थ खटपट ठायी ठायी ॥६४॥ठायी ठायी बंडे मांडली पाषांडे । सांगती उदंडे पोटासाठी ॥६५॥पोटासाठी रडे कष्टती बापुडे । त्यांसी कोणेकडे परलोक ॥६६॥परलोक घडे बहुत सायासे । तेथे ऐसे कैसे बाह्याकारे ॥६७॥बाह्याकारे वायां व्यर्थ चि सिणावे । म्हणोनि जाणावे परब्रह्म ॥६८॥परब्रह्म एक ते नव्हे अनेक । पाहातां विवेक नित्यानित्य ॥६९॥नित्यानित्य जाणे तो साधु जाणावा । उगवील गोवा बहुतांचा ॥७०॥बहुतांचा बंद सोडी निरुपणे । उत्तमे लक्षणे विवेकाची ॥७१॥विवेकाचे वाक्य विवेक जाणती । ज्ञानी ओळखती पूर्णब्रह्म ॥७२॥पूर्णब्रह्म एक निर्मळ निश्चळ । भ्रांतीचे आभाळ तेथे नाही ॥७३॥तेथे नाही जन्म मरण यातना । पूर्ण सनातना ओळखतां ॥७४॥ओळखतां देव ओळखतां भक्त । ओळखता मुक्त होत असे ॥७५॥होत असे मुक्त संसारापासुनी । देह विवरुनि तत्त्वज्ञानी ॥७६॥तत्त्वज्ञानी जरी तत्त्वे तत्त्व झडे । तरी ठायी पडे परब्रह्म ॥७७॥परब्रह्म एक नित्य निराकार । धरिते जोजार मूळमाया ॥७८॥मूळमाया देव चंचळ ईश्वर । विधी हरहर तेथुनियां ॥७९॥तेथुनीयां पंचभूते ही निर्माण । उत्पत्ति लक्षण इच्छारुप ॥८०॥इच्छारुप वृत्ती कल्पना कामना । जया पुनःपुन्हा गर्भवास ॥८१॥गर्भवास जाण विवेके नासती । विवेकी असती जन्म नाही ॥८२॥जन्म नाही ऐसे कैसेनि जाणावे । विवेके बाणावे समाधान ॥८३॥समाधान जाले मीपण शोधितां । वस्तुसी बोधीतां वस्तुरुप ॥८४॥वस्तुरुप नाही वस्तु नाम नाही । आकारचि नाही विवंचता ॥८५॥विवंचावे महावाक्याचे अंतर । नित्य निरंतर जैसे तैसे ॥८६॥तैसेंचि असावे मीपण सांडूनि । पाहो जातां मनी मन नाही ॥८७॥मन नाही तेथे उन्मन हि नाही । आतां कांही कांही उमजले ॥८८॥उमजले मज मीच आडळेना । मीपणे कळेना सर्व कांही ॥८९॥सर्व कांही मिथ्या मीपणही गेले । आपण राहिले पूर्णपणे ॥९०॥पूर्णबोध जाला संदेह तुटला । संसारी सुटला येणे रीती ॥९१॥येणे रीती आतां समाधान जाले । शरीर लागले भजनासी ॥९२॥भजन रामाचे त्रैलोक्यपावन । करितो चिंतन शूळपाणी ॥९३॥शूळपाणी चिंती ते करा चिंतन । माझे तन मन दाशरथी ॥९४॥दाशरथी देव देवांचा कैपक्षी । सर्व काळ रक्षी भक्तजनां ॥९५॥भक्तजन लीन जाले रामपदी । सज्जनसंवादी विवरतां ॥९६॥विवरतां जड चंचळ निश्चळ । तुटे खळखळ मीपणाची ॥९७॥मीपण हे रामपदी निवेदीले । समाधान जाले रामदासी ॥९८॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP