मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| मुरली विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव देवताविषयक पदे - मुरली श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ मुरली Translation - भाषांतर ११३३.( राग-केदार; ताल-त्रिताल; चाल-हरिविण० )हरि वेणु वाहे त्रिभंगी । गोपीगोपाळांचे संगी ॥ध्रु०॥भ्रुकुटी वेंकट वेंकट पाहे । चपळ कर पल्लवताहे ॥१॥श्रवणे अहंभाव गळाले । सकळ चकित जाले ॥२॥नादमुळी उद्भव जेथे । दासजन तन्मय तेथे ॥३॥११३४.( राग-मारु; चाल-हित गेले रे० )वेणु वाजे, सुरस वेणु० ॥ध्रु०॥रुणझुण रुणझुण मंजुळ मंजुळ । अहो रंग माजे ॥१॥ऐकोनी तो कीळ थक्कित कोकिळ । अहो कंठ लाजे ॥२॥धीर समीरे यमुनातीरे । अहो तुंव माजे ॥३॥दासपालक चित्तपालक । अहो गोपिराजे ॥४॥११३५.( राग-कानडा; ताल-दादरा; चाल-कष्ट करी ते० )वेणु मंजुळ गे माय वृंदावनी वो ॥ध्रु०॥कान्हो सांवळा हरी गोवर्धनोद्धारी । रक्षितसे नानापरी ॥१॥ऐकोनि मुरलीसी तल्लीन जाहली कैसी । पशुपक्षि जालही पिशी ॥२॥दासा सुख देतसे तो हा गोपाळवेषे । आसनी शयनी कृष्ण भासे ॥३॥११३६.( राग-काफी; ताल-दादरा )वृंदावनी सुंदर ध्वनी । वेणु वाजे रसिक बनी । ध्यानी मनी कृष्ण चिंतनी ॥ध्रु०॥रागोद्धार स्पष्ट उच्चार । सुरवर नर किन्नर । चाकाटले पशु खेचर ॥१॥लोकपाळ गातो निवळ । तुंबे जळ रोधे अनिळ ।श्रोतेजन होति व्याकुळ ॥२॥दास म्हणे कुशल जाणे । गायनकला अंतरि बाणे ।गुणी जन होति शाहणे ॥३॥११३७.( राग-खमाज; ताल-दादरा )सुरस मधुर वेणु । वाजवितो रुणझुणु । विकळ होता हे प्राणु । भेटिकारणे ॥१॥रुप मनी आठवे । आवडी घेतली जीवे । यदुवीरा पहावे । सर्व सांडोनी ॥२॥अखंड लागले ध्यान । स्वरुपी गुंतले मन ।सकळ पाहतां जन । आठवे हरी ॥३॥सकळ सांडोनी आस । तयालागी उदास ।फिरे रामीरामदास । वेधु लागला हरिचा ॥४॥११३८.( चाल-उद्धवा शांतवन० )वृंदावनकुंजामाजी घननीळ पितांबरधारी । मायानटवेषे नटला स्वरुप पाहतां अविकारी ।अनन्य भावे रंगलिया भोंवत्या वेष्टित व्रजनारी ।मुरलीनादे हरिवेधे विसरुनि गेल्या तनु चारी ॥ध्रु०॥सहजी निजसदनी वनिता एकी दधिमंथन करिती ।मंजुळ ध्वनि जो आइकला भरला मनमोहन चित्ती ।विगलित वसने धांवति त्या कैंची गृहसुतपतिभ्रांति ।सन्मुख श्रीहरि देखुनियां ते तटस्थ होउनियां राहती ॥१॥सुर मुनि किन्नर येती नारद तुंबर गीत गाती ।नादे अंबर दुमदुमले दृढतर समरस रसवृत्ती ।शिवसनकादिक महायोगे सुमनवर्षाव करिती ।रासविलास निजलीलेसहित श्रीहरि न्याहाळिती ॥२॥सुरंग मुरली हरिअधरी अधरामृतरस पान करी ।मंजुळ ध्वनि अति गति गमके अलाप उमटति सप्तस्वरी ।उपांग वेणु ब्रह्मविणे तालमृदांग घनगजरी । थरिकुकु थरिकुकु थरिकुकु था शाम मनोहर नृत्य करी ॥३॥स्वरुप सुंदर कृष्णाचे सार आगमनिगमाचे । स्तवितां वाचा पारुषल्या निवांत श्रुति नेती वाचे ।मांडुनि ठाण त्रिभंगीचे मुनिमोहित जे नवलाचे ।दर्शनमात्रे भय वारी अनन्य रामदासाचे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP