मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
एकादशी

विविध विषय - एकादशी

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


१९०

ज्यासी हरिची प्राप्ति व्हावी । तेणें हरिदिनी करावी ॥१॥

एकादशीं त्यजिल्यां अन्न । लाभ वैकुंठभुवन ॥२॥

रामीरामदास म्हणे । हरिजागरणा येणें ॥३॥

१९१

एकादशीच्या अन्नाखालीं । भयें पातकें पळालीं ॥१॥

कां जे संतीं अव्हेरिलीं । म्हणोनि तेथें थार झालीं ॥२॥

म्हणे रामीरामदास । घडती अंगिकारी त्यास ॥३॥

१९२

एकदशी नव्हे व्रत । वैकुंठींचा महापथ ॥१॥

परी रुक्मांगदाऐसा । व्हावा निश्चय मानसा ॥२॥

एकादशीच्या उपोषणें । विष्णुलोकीं ठाव घेणें ॥३॥

रामीरामदास म्हणे । काय प्रत्यक्षा प्रमाण ॥४॥

१९३

रुक्मांगद होता नर । आम्ही काय आहों खर ॥१॥

देव भक्तवेळाइत । राव रंक नाहीं तेथ ॥२॥

तेणें नेला अवघा गाऊ । आम्ही तरी स्वयें जाऊं ॥३॥

रामीरामदासीं काज । धरा एकमेकीं लाज ॥४॥

१९४

क्षीरापतीची वाटणी । तेथें जाली बहु दाटणी । पैस नाहीं राजांगणीं । कोणालागीं ॥१॥

रंगमाळा निरांजनें । तेथें वस्ती केली मनें । दिवस उगवतां सुमनें । कोमाईलीं ॥२॥

रथ देवाचा ओढिला । यात्रेकरां निरोप जाला । पुढें जायाचा गल्बला । ठायीं ठायीं ॥३॥

भक्तजन म्हणती देवा । आतां लोभ असों द्यावा । बहु सुकृताचा ठेवा । भक्ति तूझी ॥४॥

दास डोंगरीं राहतो । यात्रा देवाची पाहतो । देव भक्तांसवें जातो । ध्यानरुपें ॥५॥

टीप - द्वादशीचे दिवशी भजनाचे अखेरीस हा १९४वा अभंग म्हणून मग खिरापत वाटावयाची असते.

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP