मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| उपदेशपर विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - उपदेशपर श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ उपदेशपर Translation - भाषांतर ७०१.देव पाषाण भाविला । तोचि अंतरी दाविला ॥१॥जैसा भाव असे जेथे । तैसा देव वसे तेथे ॥२॥दृश्य बांधोनियां गळां । देव जाहला निराळा ॥३॥दास म्हणे भावातीत । होतां प्रगटे अनंत ॥४॥७०२.जाला स्वरुपी निश्चय । तरि कां वाटतसे भय ॥१॥ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणां आपण ॥ध्रु०॥क्षण एक मी निरास । क्षणे म्हणे मी मनुष्य ॥२॥रामीरामदास म्हणे । देहबुद्धीचेनि गुणे ॥३॥७०३.तंवरी रे तंवरी भवगजाचे भान । जव सद्गुरुपंचानन । देखिला नाही ॥१॥तंवरी रे तंवरी मायावन प्रबळ ।जंव ज्ञानवडवानळ पेटला नाही ॥२॥तंवरी रे तंवरी विषयसुखद्योत । जंव निजबोधगभस्त देखिला नाही ॥३॥तंवरी रे तंवरी जन्ममरणदुःख ।जंव सद्गुरुवचनपीयूष घेतले नाही ॥४॥तंवरी रे तंवरी मानसमृगतृष्णा ।जंव स्वानंदपूर्ण कृष्णा देखिली नाही ॥५॥रामदास म्हणे हे अवघी बुचबंगाळी ।ऐसा थोडा बळी जो देहबुद्धि सांडी ॥६॥७०४.तंवरी रे तंवरी वैराग्याचे ठाण । जंव कामिनीकटाक्षबाणे भेदिले नाही ॥१॥ तंवरी रे तंवरी सदृढता भक्तीची ।जंव चाली विकल्पाची जाली नाही ॥२॥तंवरि रे तंवरि शब्दज्ञानबोध । जंव तो नैश्वर क्रोध पातला नाही ॥३॥तंवरि रे तंवरि सकळहि बाधक ।जंव तो रघुनायक कृपा न करी ॥४॥रामीरामदासी भेटला सद्गुरुराव ।सकळ भावाभाव सुखरुप जाले ॥५॥७०५.तंवरि रे तंवरी परमार्थ स्वयंभ । जव पोटागीवरी लोभ आला नाही ॥१॥तंवरी रे तंवरी डगमगीना कदा ।जंव देहासी आपदा जाल्या नाही ॥२॥तंवरी रे तंवरी अत्यंत सद्भाव ।जंव ते निःशेष वैभव आले नाही ॥३॥तंवरी रे तंवरी धीरत्वाची मात ।जंव प्रपंची आघात जाला नाही ॥४॥तंवरी रे तंवरी दावी निराभिमान ।जंव देहासी अपमान जाला नाही ॥५॥रामदास म्हणे आवघी बुचबंगाळी ।ऐसा थोडा बळी जो देहबुद्धि सोडी ॥६॥७०६.तंवरी रे तंवरी न घडे अवज्ञा । जंव ते कांही आज्ञा केली नाही ॥१॥तंवरी रे तंवरी कडकडीत वैरागी ।जंव ते पोटी भडागी जाली नाही ॥२॥तंवरी रे तंवरी ज्ञान ते सांगावे ।जंव ते मागावे अर्थ कांही ॥३॥तंवरी रे तंवरी शब्दज्ञानसुख । जंव ते संसारीचे दुःख जाले नाही ॥४॥तंवरी रे तंवरी निर्भयाच्या गोष्टी । जंव भेणे पाय पोटी गेले नाही ॥५॥रामदास म्हणे हे तंवरीच कठिण ।जंव ते पूर्ण समाधान जाले नाही ॥६॥७०७.एक लाभ सीतापती । दुजी संताची संगती ॥१॥लाभ नाही यावेगळा । थोर भक्तीचा सोहळा ॥२॥हरिकथा निरुपण । सदा श्रवणमनन ॥३॥दानधर्म आहे सार । दास म्हणे परोपकार ॥४॥७०८.ऐसे कैसे रे भजन । करिताती मूर्ख जन ॥१॥गधड्यास नमन केले । तेणे थोबाड फोडिले ॥२॥कुतर्यास पुंजू गेला । तेणे तेथेचि फाडिला ॥३॥उंचनीच सारिखेचि । दास म्हणे होते ची ची ॥४॥७०९.जो कां भगवंताचा दास । त्याने असावे उदास ॥१॥जे कां देतिल तेंचि घ्यावे । कोणा कांही न मागावे ॥२॥सदा श्रवणमनन । आणि इंद्रियदमन ॥३॥नानापरी बोधुनि जीवा । आपुला परमार्थ करावा ॥४॥आशा कोणाची न करावी । बुध्दि भगवंती लावावी ॥५॥रामदासी पूर्णकाम । बुद्धि दिली हे श्रीरामे ॥६॥७१०.काळ काळा की पिंवळा । काळा निळा की सांवळा ।काळ दुरी की जवळा । कैसा आहे ॥१॥काळ उंच की ठेंगणा । काळ वेड की शाहणा ।काळ कैसा आहे जाणा । प्रचीतीने ॥२॥काळ मायेमध्ये आला । की तो निराळा राहिला ।याचा प्रत्ययो पाहिला । म्हणजे बरे ॥३॥कालज्ञान तालज्ञान । तत्त्वज्ञान पिंडज्ञान ।साधुमुखे समाधान बरे पहा ॥४॥दास मौजेने बोलिला । कीं तो उगाच चावळला ।चित्त द्यावे त्याचे बोला । श्रोतेजनी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP