मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| गवळणी विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव देवताविषयक पदे - गवळणी श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ गवळणी Translation - भाषांतर ११३९.( चाल-साधुसंतां मागणे )गोपी म्हणती तूं कैसा रे कृपाळु । करितो म्हणसी भक्तांचा प्रतिपाळु ।तुजकारणे जीव जाला रे विकळु । युगासारिखा कठिण जातो वेळू ॥ध्रु०॥आम्ही अवस्था भुललो तुझ्या योगे । दुःखी जालो रे तुझिया वियोगे ।आम्हां सांडोनी जातोसी रागे रागे । सुख पाहतां नाढळे तुझ्या संगे ॥१॥कृपा भाकितां भाकितां जाला शीण । अंतर गुंतले न कंठे तुजविण ।कृपाकोमळ म्हणती विश्वजन । परि तूं पाहतां अंतरीचा कठिण ॥२॥गोपी वचने बोलताती उदास । पोटी लागली भेटीची थोर आस ।वाट पाहती चिंतनी रात्रंदिवस । देव पावला सरिसे निज दास ॥३॥११४०.( राग-छायालगत्व खमाज; ताल-धुमाळी )राधे तूझा कृष्ण हरी । गोकुळांत फंद करी ॥जाउनि गौळणीला धरी । दही दूध चोरी करी ॥ध्रु०॥मथुरेची गौळण थाट । शिरी गोरसाचा माठ ॥अडवितो आमुची वाट । करितो मस्करी ॥१॥संगे घेउनी गोपाळ । हिंडतसे रानोमाळ ॥करितो आमुचे बहु हाल । सोसावे कुठवरी ॥२॥गुण याचे सांगूं किती । सांगतां मज वाटे भ्रांती ॥वाईट आहे याची रीति । ऐसा हा ब्रह्मचारी ॥३॥गौळण होऊनियां लीन । जाती हरीला शरण ॥क्षमा करीजे मनमोहन । दास चरण धरी ॥४॥११४१. ( राग-मारु; ताल-धुमाळी )नावडे नावडे आतां संसार । येणे गोपाळे वेधिले अंतर वो बाइये ।चपळ नयन बाणी भेदिले वो । मनमोहन आठवे निरंतर वो बाइये ॥ध्रु०॥वसंतसमयी निशा निवळ वो । हरि वेणु वाजवितो मंजुळ वो बाइये ।रहा हो रहा हो स्थिर तुम्ही । तेणे गुणे माझे मन चंचळ वो बाइये ॥१॥अविद्याविषय नको सासुर वो । चाड नाही मज मायामाहियेरे वो बाइये ।मधुर श्रवणे वृत्ति मोहरिली । रामदासाच्या दातारे वो बाइये ॥२॥११४२.( राग-जयजयवंती; ताल-दादरा )डोलत डोलत चाले । श्रवणी कुंडल हाले । भेदिक वचन बोले । चित्तचोरटा ॥१॥सकळ कळांचा हरी । भेटवा हो झडकरी ।तयाविण देहा उरी । नाही साजणी ॥२॥चपळनयनबाणी । भेदीले वो साजणी । पाहतां न पुरे धणी । डोळियांची ॥३॥ऐसा हरि लाघवी । मुनिजनां वेधु लावी ।रामीरामदास कवी । साबडा म्हणे ॥४॥११४३.( राग केदार; ताल-त्रिताल; चाल-राजीवनयन राम० )हरिवीण घडी गमेना । हरीविण शोक शमेना ॥ध्रु०॥रुप मनोहर ज्याचे । लागले ध्यान तयाचे ॥१॥युगासम दिवस जातो । रामदास वाट पाहतो ॥२॥११४४.( राग-बागेश्री; ताल-धुमाळी )धरी आपुला हा छंद । मुरलि वाजवितो मंद ।गीत गातो गोविंद । पाहुं चला गे बाई ॥ध्रु०॥पांवा वाजवी गोपळ । गळां शोभे वनमाळ ।कोटि तरणी तेजाळ । कृष्ण देवकीचा बाळ । वेगी दावा हो ॥१॥करीन स्वामीचे काज । न धरी लौकिक लाज ।देह विटंबीन आज । पाहुं चला यदुराज ॥२॥सांडुनि शरिराचा रंग । चित्ता जाला असे भंग ।धरा कृष्णजीचा संग । पाहुं चला श्रीरंग ॥३॥रामदासाची आस । जीव जाला उदास ।धरुं मी कवणाची कांस । सहजी सहज प्रकाश । प्रकाशला हो बाई ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP