मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| कोंडे विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव भारुडे - कोंडे श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : bharudgathasamarthaगाथाभारुडसमर्थ कोंडे Translation - भाषांतर ९०६.सत्ताविसी जे तेरावे । त्याचे श्रीमुख बरवे ॥१॥पांचांअक्षरी उच्चार । त्यासी माझा नमस्कार ॥२॥रत्नसंख्या अभ्यंतरी । सर्वकाळ त्या सुंदरी ॥३॥इंद्रासनाचे आयन । रामदासे केले ध्यान ॥४॥९०७.प्लवंगमी आव्हारिले । जेणे तयासी निर्मिले ॥१॥त्याच्या नामाऐसे करा । तेणे भवसिंधु तरा ॥२॥दिनकर नाम जे ठेविले । पवनात्मजे सिद्ध केले ॥३॥रामदास म्हणे भावे । सत्ताविसी जे तेविसावे ॥४॥९०८.बारामाजी एकादशी । जन्म जाहला तयासी ॥१॥त्याचे नामी एकाक्षर । गाळोनियाम निरंतर ॥२॥बाळ पिसे आणि मूर्ख । त्रिवर्गा परम सुख ॥३॥रामीरामदास म्हणे । रायविनोदी बोलणे ॥४॥९०९.सप्तामाजी जो दुसरा । त्यासि होय एकोदरा ॥१॥तिचा कांत गेला शाम । त्याचा धरा नित्यनेम ॥२॥कलहप्रियाची भगिनी । त्याच्या पित्याची जननी ॥३॥रामदास म्हणे कळी । माजी पूज्य भूमंडळी ॥४॥९१०.सार मुक्ताचा उगमू । तेथे ज्याचा पराक्रमू ॥१॥चंद्र उपमा जयाचे । अर्ध रजनीचरभक्षाचे ॥ध्रु०॥जे या आकाशासि नाही । तेथे उद्भवले सर्वही ॥२॥तृप्त जाहली अष्टमा । त्यास जयाची उपमा ॥३॥रामदास म्हने त्याचे । राम दोहींच्या नामाचे ॥४॥९११.साठींमाजी जो दशमू । त्याच्या पित्याचा जो आश्रमू ॥१॥पित्या पुत्राच्या आश्रमा । गेल्या कोणाचा महिमा ॥२॥भारामध्ये गेले मास । तितुकी आन ते जयास ॥३॥म्हणे रामीरामदास । उभयतांचा एक अंश ॥४॥९१२.पांचांमध्ये जे पहिले । पहा तैंसेचि वहिले ॥१॥तिही अक्षरी उच्चार । आहे चौघांचे ही सार ॥२॥सातां जणांचे शेवटी । आठाकरितां होय भेटी ॥३॥रामीरामदास म्हणे । नवांमाजी पहिल्या गुणे ॥४॥९१३.पहिल्या गुणे दुसरा पक्ष । तेणे लक्षावा अलक्ष ॥१॥देव जवळी चूकला । भक्त भेदे भांबावला ॥२॥पुढे सांपडतां धन । वायां करावे साधन ॥३॥रामदास म्हणे सार । येथे पाहिजे विचार ॥४॥९१४.( पद. राग-कल्याण; ताल-धुमाळी ). दास म्हणे रोकडे । सांग माझे कुवाडे । मनबुद्धिकानडे । ते काय गे बाइये ॥ध्रु०॥महि नव्हे पावक । वायु नव्हे उदक । नभासहि व्यापक । ते काय० ॥१॥स्थूळ लिंग कारण । तिहींस जे आगळे । प्रणवयावेगळे ते० ॥२॥बहु घनदाट ते । नाही काळी वीटते । अखंडीत भेटते ॥३॥जवळी ते न दिसे । तर्कासीहि न भासे । तेजेवीण प्रकाशे ॥४॥सर्वां भूती कोंदले । सर्व गिळोनी राहिले ।दासा रुप संचले । ते काय गे बाइये ॥५॥९१५.खेळा रे भाईंनो खेळा रे ॥ अंतराळी मन मेळा रे ॥ध्रु०॥जळ नाही तेथे जाला प्रबळ ॥ तया वृक्षाचे मूळ चोजवेना ॥१॥बीजेवीण अंकुर मुळेविण विस्तार ॥ फळेविण पडिभर दाटलेसे ॥२॥धरितां मूळ सांपडे डाळ ॥ चुकले फळ त्या मुळाकडे ॥३॥विस्तार तोडिला खेळचि मोडिला ॥ रामचि जोडिला रामदासी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 10, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP