मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| उपदेशपर विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - उपदेशपर श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ उपदेशपर Translation - भाषांतर ६५१.येथे काय रे वाजते । कोठे काय गजबजिते ॥१॥उगाच करिती कोल्हाळ । माझे उठले कपाळ ॥२॥हांका मारोनी वरडती । टाळ अवघे चि कुटती ॥३॥कोठे कैचे आले लुट । वाया जाले टाळकुटे ॥४॥वेडी संसार सांडिला । व्यर्थ गलबला मांडिला ॥५॥दास म्हणे त्या मूर्खाला । हरिकथेचा वीट आला ॥६॥६५२.हरिकथेचा आला राग । थेर होतां घाली त्याग ॥१॥ऐसे प्रकारीचे जन । नाही देवाचे भजन ॥२॥कळावंताचे के गाणे । ऐकताती जीवप्राणे ॥३॥करिती लग्नाचा उत्साव । नाही देवमहोत्साव ॥४॥भूतदया नाही पोटी । खाती लोभाची चोरटी ॥५॥रामीरामदास म्हणे । देवधर्म कोण जाणे ॥६॥६५३.यथातथ्य आठवेना । कांही स्वहित घडेना ॥१॥कातड्याचे बंदीखानी । नव महिने पतन ॥२॥बारा वर्षे बाळपण । आंगी होते मूर्खपण ॥३॥पुढे तारुण्याच्या भरे । आले कामाचे काविरे ॥४॥पुढे आले वृद्धपण । सवेंचि पातले मरण ॥५॥दास म्हणे रात्रंदिस । नाही मराया अवकाश ॥६॥६५४.मुंगुसाचे कानी बाळी । मुंगुस हिंडे आळोआळी ॥१॥तरि ते पाळिले जाणावे । पराधीन चि स्वभावे ॥२॥वेडे आलसे पाहुणे । तरि ते जगाचे मेहुणे ॥३॥कार्यकर्ता कीर्तिवंत । त्यास जाणती समस्त ॥४॥कार्यकर्ता तो झांकेना । वेध लावी विश्वजनां ॥५॥दास म्हणे फुटबळाचा । तोचि पुरुष दैवाचा ॥६॥६५५.नाही ज्ञानाचा विचार । केला अज्ञाने संचार ॥१॥मना आले ते बोलती । चालो नये ते चालती ॥२॥अवघा स्वधर्म बुडाला । देह प्रपंची गोंविला ॥३॥रामीरामदास म्हणे । अविद्येची ही लक्षणे ॥४॥६५६.आले संसाराचे ज्ञान । तेणे जाले समाधान ॥१॥सकळ साराचेहिं सार । ऐसा माझा हा संसार ॥२॥कैंचा देव कैंचा धर्म । तीर्थयात्रा कैंचा भ्रम ॥३॥कैंचे ध्यान कैंचे ज्ञान । अन्न हेंचि समाधान ॥४॥व्यर्थ गाणे हे लौकिकी । येणे पोट भरेना की ॥५॥रामदास म्हणे भले । आम्हां सत्य हे सकळ ॥६॥६५७.कल्पनेची भरोवरी । मन सर्वकाळ करी ॥१॥स्वप्न सत्यचि वाटले ॥ दृढ जीवेंसी धरिले ॥धृ०॥अवघा मायिक विचार । तोचि मानिला साचार ॥२॥नाना मंदिरे सुंदरे । दिव्यांबरे मनोहरे ॥३॥जीव सुखे सुखावला । थोर आनंद भासला ॥४॥रामदास म्हणे मद । लिंगदेहाचा आनंद ॥५॥६५८.सुडके होतसे झाडाचे । पटकर होतसे हाडाचे ॥१॥यांत सोवळे ते कोण । पाहा पाहा विचक्षण ॥ध्रु०॥पाहो जातां घरोघर । कथीकेची येक धार ॥२॥चुडे दांतावले हाडे । पाहा सोंवळे निवाडे ॥३॥न्यायेनीती विवंचना । हिंगावांचुनी चालेना ॥४॥दास म्हणे रे संतत । कांही पाहो नये अंत ॥५॥६५९.दुःखे दुःख वाढत आहे । सुखे सुख वाढत आहे ॥ध्रु०॥बर्याने बरे चि होते । वाईटे वाईट येते ॥१॥हटाने हट बळावे । मिळतां मिळणी फावे ॥२॥सुशब्दे माणुस जोडे । कुशब्दे अंतर मोडे ॥३॥प्रीतीने प्रीतिच लागे । विकल्पे अंतर भंगे ॥४॥सेवके दास्य करावे । राघवे प्रसन्न व्हावे ॥५॥६६०.पुण्य पहावया कारणे । देव धाडी बोलावणे ॥१॥वाट लागेल धरावी । पुण्यसामग्री करावी ॥२॥वाटवेच नाही जया । पुढे सुख कैंचे तया ॥३॥रामीरामदास म्हणे । बुद्धिवंत ते शाहाणे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP