मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| उपदेशपर विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - उपदेशपर श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ उपदेशपर Translation - भाषांतर ६८१.डोळां अज्ञाने झांपडी । भोवे देहबुद्धि घानोडी ॥१॥ऐसा अज्ञान पशु जाणे । जुंपिला संसाराच्या घाणे ॥२॥खांदी ओझे विषयांचे । पाठी फटके सुखदुःखाचे ॥३॥रामीरामदास म्हणे । व्यर्थ गेले त्याचे जिणे ॥४॥६८२.नको करुं अभिमान । होणार ते देवाधीन ॥१॥बहू द्रव्याने भुलले । काळे सर्वहि ग्रासिले ॥२॥जे जे म्हणती मी शक्त । ते ते जाहले अशक्त ॥३॥रामदास सांगे वाट । कैचा होईल शेवट ॥४॥६८३.होणार ते कांही आतां पालटेना । तरी चिंता मना कां करिसी ॥१॥नादा बिंदा भेटी जाली जये काळी । तेव्हांचि कपाळी लिहियेले ॥२॥हानि मृत्यू लाभ होणार जाणार । सर्वहि संसार संचिताचा ॥३॥लल्लाटी लिहिले होउनियां गेले । संचीत भोगिले पाहिजे ते ॥४॥त्यागुनीयां देश सेविला विदेश । तरी सावकाश भोगप्राप्ति ॥५॥सुखचा आनंद दुःखे होय खेद । ऐसे दोन्ही भेद पुरातन ॥६॥देहाचे निमित्त चुकवितां नये । आतां चिंता काय करुनियां ॥७॥त्रैलोक्य त्यागावे तरी ते भोगावे । प्राक्तन सांगावे कोणापासी ॥८॥प्रालब्ध चुकेना ब्रह्मादिकांचेनि । सर्व देव यांनी भोगियेले ॥९॥भोगियेले देव दानव मानव । किन्नर गंधर्व लोकपाळ ॥१०॥प्राप्त पालटाया बहु प्रेत्न केले । परी पालटीले नाहीत की ॥११॥रावण बाहेर आणि कंसासुर । परी ते होणार होत आहे ॥१२॥पुत्राचेनि सळे झाली नागकुळे । सुटेना कपाळे परीक्षिती ॥१३॥ऐसे थोर थोर सांगतां अपार । भोगिले साचार होणाराते ॥१४॥होणार ते आहे देहाचा संबंध । रामदासी बोध देहातीत ॥१५॥६८४.जाणावा तो लंड ज्ञानियां तरमुंड । शक्तीविण तोंड वाजवीतो ॥ध्रु०॥कर्माचिये वेळे भक्त म्हणवावे । ज्ञान मोकलावे भक्तपणे ॥१॥स्वधर्माचे वेळे ज्ञाने झांकी डोळे । भोजनाचे वेळे सावधान ॥२॥भक्तीचे समयी अद्वैत गोसावी । पोटस्ते पोसावी कन्यापुत्र ॥३॥विधीचिये वेळे निस्पृह वैरागी । पुढे द्रव्यालागी हिंडतसे ॥४॥सर्व ब्रह्मा ऐसा निश्चयो थावरी । मागे निंदा करी सज्जनाची ॥५॥निरुपणी त्याग जनांसी सांगत । स्वये लोलगंत तंबाखूचा ॥६॥दास म्हणे मना नको काढूं वर्मे । प्राणी केली कर्मे पावतील ॥७॥६८५.शरण जावे रामराया ॥ पुढती न पाविजे हे काया ॥१॥जीव जीवांचा आहार ॥ विश्व होतसे काहार ॥२॥एक शोके आक्रंदती ॥ तेणे दुजे सुखी होती ॥३॥दास म्हणे सर्व दुःख ॥ रामाविण कैसे सुख ॥४॥६८६.वासनेची बेडी देहबुद्धि वांकडी । वाजे हुडहुडी ममतेची ॥१॥वैराग्याचा वन्ही विझोनियां गेला । संचित खायाला पुण्य नाही ॥२॥भक्ति पांघरुण ते माझे सांडले । मज ओसंडीले संतजनी ॥३॥नामसंजीवनी मुखी नाही पाणी । निंदेची पोहाणी प्रबळली ॥४॥रामदास म्हणे ऐसियाचे जिणे । सदा दैन्यवाणे रामेविण ॥५॥६८७.सर्व सृष्टीचा चालक । चोजवेना देव एक ॥१॥तरित्वां साधिले ते काय । कोण पाहिला उपाय ॥२॥कोण उपजोनि मरतो । न कळे की कोठे जातो ॥३॥देव कोण भक्त कोण । हा तो अवघाचि अनुमान ॥४॥रामदास सांगे हित । तुझे तुज न कळे स्वहित ॥५॥६८८.सर्व काळ शेंडामूळ । येत जातसे मुंगुळ ॥१॥तैसा कां करिसी येरझारा । शरण जाई रघुवीरा ॥२॥हाती धरुनियां सुत । खालवनी येते जाते ॥३॥दास म्हणे जळावरी । जैसी फिरतसे भोंवरी ॥४॥६८९.येतां संसारासी झाल्या दुःखराशी । कोणाला असोसी कासयाची ॥१॥पात्र कोणी एक भरला वमक । खायाचा विवेक तेथे कैंचा ॥२॥विषय नासका कळला आसका । सुख नाही सुख नाही एका देवेविण ॥३॥देवेवीण एका सर्व कांही फोल । वासना गुंतली कोणेठायी ॥४॥कोणे ठायी आतां असोसी राहिली । वासना गुंतली रामपायी ॥५॥रामपायी जन्ममृत्यु आढळेना । दास म्हणे मना सावधान ॥६॥६९०.सावधानपणे काहीच नुरावे । त्वरे उद्धरावे कोणीएके ॥१॥कोणी एक इच्छा देवाची मानावी । आपुली नाणावी वासना हे ॥२॥वासनेसी मनापासूनी कंटाळा । जन्मासी वेगळा सहजचि ॥३॥सहजचि आतां मन कंटाळले । पोंचट वाटले सर्व कांही ॥४॥सर्व कांही दिसे मिथ्या वोडंबरी । साचाचिये परी कोण मानी ॥५॥मानेसेंहि नाही असोसीही नाही । दास कांही नाही राम एक ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP