मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| पाळणा विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव देवताविषयक पदे - पाळणा श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ पाळणा Translation - भाषांतर १०७८.( राग-कल्याण; ताल-धुमाळी )सुंदर रामाबाई । सभराभरीत सर्वां ठायी वो ॥निगमां पार नाही । ते म्यां वर्णावी ते काईं वो ॥ध्रु०॥शरयूतीरवासिनी । वेधव मुनिमानसमोहिनी वो ॥सुरवरसंजीवनी । कैसी शोभत पद्मासनी वो ॥उदार एकवचनी । दुर्मिळ तपसंतपसाधनी वो ॥दशरथ नृपनंदनी । प्रगटे ऋषिवचनालागुनी वो ॥१॥निजमस्तकी वीरगुंठी । त्रिपुटे रेखिला लल्लाटी वो ॥सुरेख सदटा भ्रुकुटी । तेणे सतेज नासापुटी वो ॥२॥कटी तटी सोनसळा । माजी सुदामिनीचा मेळा वो ॥सुवास नाभीकमळा । तेणे पडे मधुकर पाळा वो ॥वामेधरणीबाळा । वनितामंडित ते वेल्हाळा पडे मधुकर पाळा वो ॥चरणी स्पर्शे शिळा । अहिल्या उद्धरली अवलीळा वो ॥३॥विशाळ वक्षस्थळी । विराजित उटी पातळी वो ॥कंठी एकावळी ॥ माजी कौस्तुभमणि झळफळी वो ॥अधरी प्रवाळपाळी । मध्ये शोभे दंतावळी वो ॥रसनारस कल्लोळी । वाचा बोलतसे मंजुळी वो ॥४॥अजानुबाहु सरळ । सुनीळ गगनाहुनि मोकळ वो ।सुपानीरजस्थळ । देखुनि रवितेजे सोज्वळ वो ॥मुद्रा फांकती किळा । तेणे सतेज ग्रहमंडळ वो ॥शरकार्मुकसहमेळे । शोधित असुरा तरुची मुळे वो ॥५॥चिद्गगनाचा गाभा । तैसी सुनील अंगप्रभा वो ॥देखुनि चिद्घन शोभा । जैसी कांती चढली नभा वो ॥रतिनायकवल्लभा । देखुनि सांडी नागरदंभा वो ॥प्रथमारंभ स्तंभा । भरणभूषित शामल शोभा वो ॥६॥भरत बिभीषण पृष्ठी । सवितागुण मानस उत्कटी वो ॥जोडुनि करसंपुटी । ध्यानी मारुतिमानस वेष्टी वो ॥देखुनि सुखपृष्टी । जाली प्रेमरसाची वृष्टी वो ॥सुख संतुष्ट परमेष्टी । हरुषे कोंदे सकळा सृष्टी वो ॥७॥नवपंकज लोचनी । विस्मित करुणामृत सिंचिनी वो ॥शिवसंकट मोचनी । दुर्धर रजनीचरभंजनी वो ॥भवभयसंकोचनी । भक्तां निर्भय पद सूचनी वो ॥रघुकुळउल्हासनी । भोजे विलसत चंद्राननी वो ॥८॥सुकाळ स्वानंदाचा । यावा अंतरला दुःखाचा वो ॥ जगदुद्धार मातेचा । उत्तीर्ण नव्हे की हे वाचा वो ।रामदासभेदाचा । तरंग तुटोनि गेला साचा वो ॥९॥१०७९.( राग-बिलावल; ताल-त्रिताल )ऐसे ध्यान समान न दिसे राम निरुपम लीळा ।सांवळे सुंदर रुप मनोहर शोभति सुमनमाळा ॥ध्रु०॥मुकुटकिरीटीकुंडलमंडित गंडस्थळावरि शोभा ।केयुर दंड उदंड विभूषण लावण्याचा गाभा ॥१॥सरळ कुरळवळ नयनकमळदळ शामला कोमल साजे । झळके इंद्रनीळ तळपे रत्नकीळ मुनिजन ध्यानि विराजे ॥२॥भाळ विशाळ रसाळ विलेपन परिमळ अनिळ विलासी ।मृगमद केशर धूशर आंगी । हसितवदन सुखराशी ॥३॥कटतट वेंकट कांसे पीतपट मिरवत उटी सुगंधे ।रुळत कल्लोळ सुढाळ मालिका डोलति तेणे छंदे ॥४॥जडित पदक वीर कंकण कंकिणी अंदू नेपुर वाजे ।सकळ रिपुकुळ निर्मूळ ऐसे वांकी तोडर ब्रीद गाजे ॥५॥करशरचाप विलाप दानवां काळरुप मनिं मासे ।दास म्हणे रणकर्कश राम अंतक तोहि त्रासे ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP