TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पाळणा

देवताविषयक पदे - पाळणा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


पाळणा
१०४१.
( राग-देस; ताल-धुमाळी )
कैं भेटेल मागुता । राघव आतां ॥ध्रु०॥
स्वस्थ न वाटे चित्ता । बोले कौसल्या माता ॥१॥
राम वनासी जातां । रुदती सर्व कांता ॥२॥
रामदासी अवस्था । लागली समस्तां ॥३॥

१०४२.
( राग-शंकराभरण; ताल-धुमाळी )
अव्हेरुं नको रे सखया ।
रामा प्राणसांगतिया सीणलीयाच्या विसावया । दीनबंधु ॥ध्रु०॥
राम हा स्वानंदयोगी । लक्षुमण पृष्ठभागी ।
अतिशय वीतरागी । नवजो मागे ॥१॥
राम म्हणे बा सुमित्रा । राहे राहे राजपुत्रा ।
संपत्ति भोगिसी विचित्रा । कष्टसी वनी ॥२॥
आत्मयारामा तूं जासी । तुज ओवाळून आपणासी ।
कंठ दाटे नयनेसी । नीरलोटे ॥३॥
उदास न बोले दासा । अनाथाचा तूं कोंवसा ।
तुजवीणे मज कैसा । वेळ गमे ॥४॥
भोग रोग रामेंविण । जनवमनप्रमाण ।
रामसंयोगी जीवन । वनचि सुख ॥५॥
रामा तूं अंतरसाक्षी । परेची वाचा परिक्षी ।
सद्भाव लाघवी लक्षी । विचक्षण ॥६॥
राम कृपेचा कोंवळा । जाणोनि अंतरकळा ।
रामीरामदास केला । आपणा ऐसा ॥७॥

१०४३.
( चाल-दिंडीचा )
उभे राहती सकळ राम अंतरला ।
नाही देहाचे स्मरण प्राण सवे गेला ।
वियोग न कंठे तोचि ठाकून आला ।
आम्ही प्रपंची राम सांडुन गेला ॥ध्रु०॥
अयोध्या नगर उलथले बाहेरि दाटलेसे ।
राम राजीवनयन वना जातसे ।
वृत्ति वेधल्या रघुनाथी जन पाहत असे ।
सर्व प्रपंची उदास देहभाव नसे ॥१॥
रामे अव्हेरिले वाटे वैभव काय आतां ।
आम्हां येणेचि गोविले रामा मागे जातां ।
राम राजीवलोचन जवळी होता ।
आम्ही पाहिलाचि नाही कैंचा दैवहतां ॥२॥
आस सांडून राज्याची वनवासी जाला ।
योगी सर्वांगी सुंदर पंचवटिकेसी गेला ।
रामदासाचा कैवारी उणे देखोनि आला ।
देव जयजयकार करिती त्यां आनंद जाला ॥३॥

१०४४.
( राग-खमाज; ताल-धुमाळी )
कृपाळू रघुवीरे खादिली भिलटीबोरे । उच्छिष्ट आदरे अंगिकारी रे ॥ध्रु०॥
वैभवे नाही चाड । देवाते भावचि गोड । पुरवितो कोड । अनन्याचे रे ॥१॥
दुर्लभ ब्रह्मादिकांसी । सुलभ वानरांसी । काय तयापासी । भावेविण रे ॥२॥
रामीरामदास म्हणे । देव हा दयाळूपणे । उठवितो रणे वानरांची रे ॥३॥

१०४५.
( चाल-साधुसंतां मागणे० )
कैसा हा दयाळु आत्माराम । दासाकारणे भोगिले नानाश्रमु ।
त्याचा पूर्ण केला सर्व कामु । देऊनि वैभव तोडिला भवभ्रमु ॥ध्रु०॥
अकस्मात वाली वधियेला । नीच शब्द तो आपण घेतला ।
सुग्रीव तो राज्यी बैसवीला । सेखी सायुज्यताप्रसाद दिधला ॥१॥
दहा वेळ रावण दहा शिरी । शिवपूजने पावला लंकापुरी ।
रामे अप्रयासे बिभीषणाकरी । देऊनि चिरंजीव केला ध्रुवासरी ॥२॥
चौदा वर्षे आपणां वनवास । वधिले भुवनकंटक राक्षस ।
देव पाठविले रामे निजपदास । स्वये पावविले रामीरामदास ॥३॥

१०४६.
( राग-गारा; ताल-दादरा )
कटक रघुनाथजीचे । वानर आणि रिसांचे ॥ध्रु०॥
अन्नवस्त्र हे कांहीच नलगे । अंतराळी वीर वांगे ॥१॥
चपळ तपिळ महावीर मिळाले । रजनीचरांचे न चाले ॥२॥
श्रृंग तरुवर पर्वत घेती । मुखवाद्ये गर्जताती ॥३॥

१०४७.
( राग-कल्याण; ताल-त्रिताल )
दयाळा रामा सोडवी आम्हां । हरहृदयविश्रामा ॥ध्रु०॥
बंधन पावलो बहू जाजावले । देव म्हणती कावलो ॥१॥
यातना हे नाना । कांहीच चालेना । दुःख जाहले मना ॥२॥
शीणावरि शीण । होतसे कठिण । थोर मांडले निर्वाण ॥३॥
कर्कश उत्तरी । नित्य मारामारी । धांवे होऊनि कैवारी ॥४॥
दास चौताळला । त्रिकूट जाळिला । थोर आधार वाटला ॥५॥

१०४८.
( राग-मांड किंवा जोगी; ताल-दीपचंदी )
सांग मला हनुमंता । राघव माझा सुखी आहे की ॥ध्रु०॥
कनकमृगामुळे मोहित जाले । हा बसला मज गोत ॥१॥
दीर सुलक्षण लक्षुमण गांजिला । अनुभविते आतां ॥२॥
दास म्हणे परिपूर्ण रघुवीर । परिवाहे मनी चिंता ॥३॥

१०४९.
( चाल-पाळण्याची )
जाय हनुमंता वेगेंसी । घेउनि ये रामासी । रामाविरहित जिवासी ।
न गमे मज परियेसी ॥ध्रु०॥
अगणित बळ तुझे भगवंता । पावलासि आकांता ।
बोधुनि रघुनाथा म्हणे सीता । भेटवी तूं मज आतां ॥१॥
अगाध सिंधु हा उड्डाण । करुनि येसी सुजाण ।
तुझिया उपकारा उत्तीर्ण । नव्हती मज संपूर्ण ॥२॥
मन हे व्याकूळ केवळ । होत असे तळमळ ।
झडकरि जाउनियां कृपाळ । दाखवी घननीळ ॥३॥
मज तूं श्रीराम दाखविसी । होईन तुझी दासी ।
कृपा करिं कां रे गुणराशी । लागेन मी पायांसी ॥४॥
उशीर न लावी गा अणु कांही । जा शीघ्र लवलाही ।
रामदासाचा प्रभु पाही । भेटवी म्हणे वैदेही ॥५॥

१०५०.
सांग सखया निभ्रांत । भेटईल रघुनाथ ।
तरि राखेन जीवित । अन्यथा न राहे चित्त ॥१॥
आत्मा माझा राम वनी । अंतरला मायेचेनि ।
त्यजिली की यालागुनी । न पवे कां अझुनी ॥२॥
राघव साच न भेटे । शब्दी तो सुख न वटे ।
रामालागी प्राण फुटे । वियोग क्षण न कंठे ॥३॥
आत्मया राघवाप्रति । सांग सखया मारुति ।
वियोग कंठूं मी किती । वेगी पावे रघुपती ॥४॥
तुज मज चापपाणि । अहिरावण विघडोनी ।
ठेविले अशोकवनी । शोक वाढे माझे मनी ॥५॥
लक्ष्मण तुझा स्वबांधी । छळिला विषयबुद्धि ।
आडठेले भयोदधि । सोडवी करुणानिधी ॥६॥
तुझे अतर्क्य संधान । भेदील हे त्रिभुवन ।
तेथे किती तो रावण । रामदासी सोडी पूर्ण ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-10T21:49:35.6970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

shelf sea

  • मंच सागर 
RANDOM WORD

Did you know?

What are the names for Ekadashi (11th day in fortnight)?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site