मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| अध्यात्म विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - अध्यात्म श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ अध्यात्म Translation - भाषांतर ८२८.दिसे ते नासेल सर्वत्र जाणती । या बोला वित्पत्ती काय काज ॥१॥काज कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ॥२॥शाश्वतासी येणे जाणे हे न घडे । आकार हा मोडे दास म्हणे ॥३॥८२९.छायेमाजी छाया लोपे । तरि काय पुरुष हरपे ॥१॥तैसा देह लोपतां जाण । कदा न घडे मरण ॥२॥खेळा अंती डाव हरपत । तरी कां नटासि आला मृत्यु ॥३॥रामदासी रामी राम । जन्म मरणे कैचा भ्रम ॥४॥८३०.सृष्टि नांदताहे सर्व लोक पाहे । तया अंतरी हे परब्रह्म ॥१॥परब्रह्म आहे निर्मळ निश्चळ । चंचळ चपळ सृष्टि नांदे ॥२॥सृष्टि नांदे तिचे शोधावे अंतर । नित्य निरंतर ओळखावे ॥३॥ओळखावे निजगुज वेदबीज । सहजे सहज सदोदित ॥४॥सदोदित देव येर सर्व माव । ऐसा अभिप्राव दास म्हणे ॥५॥८३१.बहुरत्ना वसुंधरा । मायादेवीचा पसारा ॥१॥अहो बोलतां सरेना । अवघे आयुष्य पुरेना ॥२॥नाना भेद नाना मते । बहुविध असंख्याते ॥३॥दास म्हणे नवलपरी । सृष्टि वर्ते नानापरी ॥४॥८३२.पडसादेसी करी वाद । खळाळा सवेंचि वेवाद ॥१॥तेथे चालेना मीपण । शीण पावावा आपण ॥२॥व्यवधानासवे जावे । प्रतिबिंबेसी भांडावे ॥३॥रामदास म्हणे जीवे । समुद्रासी गडगडावे ॥४॥८३३.सांत बोले बहुविध । तेथे कैंचे एकविध ॥१॥तेथे कोणासी भांडावे । कोणा पंथासी मांडावे ॥२॥बहु यात्रा पृथ्वीवरी । बहु शब्द परोपरी ॥३॥नाना सैन्य नाना पुरे । दास म्हणे ते उत्तरे ॥४॥८३४.माया अविद्येचे बंड । नाना प्रकारी थोतांड ॥१॥अवघे सोडूनियां द्यावे । एका भगवंता पहावे ॥२॥पंचभूतांचा मेळावा । दृश्य पदार्थ आघवा ॥३॥म्हणे रामीरामदास । दृश्यभास मनोभास ॥४॥८३५.बहु रुपे दिसती बहुरुपी दिसेना । खेळवितो नाना बहुरुपे ॥१॥खेळ हा मांडला उणे कांही नाही । खेळाकारे पाही आलया रे ॥२॥बोलवी चालवी सोंग संपादणी । जयाची करणी तो शोधावा ॥३॥रामदास म्हणे सोंगेचि दिसतो । खेळत्याची गती तोचि जाणे ॥४॥८३६.बाह्य नारिकेळ भीतरी करोटी । तैसी परी सृष्टि सस्वरुपी ॥१॥सस्वरुपी माया जैसी द्रुमी छाया । कां ते भासे वायां मृगजळ ॥२॥मृगजळ भासे मार्तंडाकरितां । स्वरुपी पाहतां बिंब नाही ॥३॥नाही जेथे बिंब कैंचे प्रतिबिंब । एकचि स्वयंभ सस्वरुप ॥४॥सस्वरुपी भास नाथिला आभास । धरिजे विश्वास दास म्हणे ॥५॥८३७.कण सांडुनीयां घेऊं नये भूस । गर्भेविण फणस खाऊं नये ॥१॥खाऊं नये नारिकेळाचे करोटे । सालपट खोटे डाळिंबाचे ॥२॥डाळिंबाची त्वचा चोवड ऊंसाचा । स्तंभ कर्दळीचा खातां नये ॥३॥खातां नये नाना फळांची आंठोळी । असो हे वाचाळी वाउगीच ॥४॥वाउगे सांडुनी सार तेंचि घ्यावे । येर ते सांडावे मिथ्याभूत ॥५॥मिथ्याभूत जे जे तत्त्व दृष्टी पडे । म्हणोनियां घडे त्याग त्याचा ॥६॥त्याग त्याचा कीजे जे मने कल्पावे । मग अनुभवे जाणिजेल ॥७॥जाणिजेल सार त्यागितां असार । बोलावा विस्तार कासयासी ॥८॥कासयासी आतां धरावा संदेहो । कल्पनेचा देहो नाशिवंत ॥९॥नाशिवंत आहे नाम आणि रुप । पाहे आपेआप दास म्हणे ॥१०॥८३८.लागलासे मुळी हा देहसमंधु । करीतसे खेदु अहंभाव ॥१॥अहंभाव कदा नये पुरवल्या । भवभ्रमे जाल्या दुःखरासी ॥२॥दुःखरासी जाल्या देहाच्या संबंधे । सर्व ज्ञानबोधे तुटतील ॥३॥तुटती संबंध संतांचे राहणी । होईल झाडणी पंचभूतां ॥४॥पंचभूतां लय स्वरुपाअन्वये । तुटला संशय साधनाचा ॥५॥८३९.स्वप्नी जे देखिले स्वप्नावारी गेले । जागृतीने केले तेंचि खरे ॥१॥तेंचि खरे होते येर सर्व जाते । तैसे ज्ञानियाते संसारिक ॥२॥संसारींची माया जाईल विलया । जाणाराची वायां चिंता काय ॥३॥चिंता काय आतां स्वप्नींच्या सुखाची । सर्व चाले तोंचि बरे दिसे ॥४॥बरे दिसे तरी ज्ञाते न मानिती । दास म्हणे स्थिति पालटेना ॥५॥८४०.जे जे कांही दिसे ते ते सर्व नासे । अविनाश असे आत्मरुप ॥१॥आत्मरुपी दृष्टि घातिलां निवळे । आपेआप कळे मिथ्या माया ॥२॥मिथ्या माया वाटे साचाचिसारिखी । स्वरुपी ओळखी जंव नाही ॥३॥जंव नाही जाली संदेहनिवृत्ति । तंव हे प्रचीति जाणवेना ॥४॥जाणवेना मनी निश्वयावांचूनी । निश्वयो श्रवणी दास म्हणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 29, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP