TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
गोंधळ

भारूड - गोंधळ

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


गोंधळ
९१९.
( चाल-सांगड बांधा रे० )
अंबे नाम तुझे । चांगले मन माझे रंगले ॥
मी तरी तुझे वो बाळक । न करी जनपांगिले ॥ध्रु०॥
पवित्र ठाणक । माहोर । दुसरे तुळजापूर ।
तेथे नांदती । सुंदर । संताचे माहेर ॥१॥
तिसर्‍याने गाइन मी । आऊंद । लागला तुझा छंद ॥
मूळपीठ शिखरी । भवानी । तूं माझी स्वामिनी ॥२॥
चौथ्याने गाइन मी । रेणुका । सप्तश्री चंडिका ॥
गोंधळ घालिन मी । भवानी । ध्यान तिहीं लोकां ॥३॥
तुज मी ध्यातसे अंतःकरणी । तूं माझी स्वामीणी ॥
दास करीतसे । विनवणी । दोन्ही कर जोडुनी ॥४॥

९२०.
( राग-कल्याण; ताल-धुमाळी )
ब्रह्मी माया उदो । त्रिगुण काया उदो । तत्त्व छाया उदो ॥
चारी वाणी उदे ॥ध्रु०॥
चारी खाणी उदो । अनंत योगी उदो । विद्या बुद्धि उदो ।
नाना विधी उदो ॥१॥
कारण सिद्धी उदो । आगम निगम उदो । साधन सुगम उदो ।
ज्ञानसंगमो उदो ॥२॥
देवा भक्ता उदो । योगी मुक्ता उदो । अनंत सिद्धां उदो ।
उदो दासा उदो ॥३॥

९२१.
( राग-भैरव; ताल-धुमाळी )
लो लो लो लागला लो । आदिशक्तीचा लागल लो ॥ध्रु०॥
अंतरी लो बाहेरी लो । जिकडे तिकडे लागला लो ॥१॥
अंडजी लो जारजी लो । स्वेदजी लो उद्भिजी लो ॥२॥
देवा लो दानवा लो । साधका लो मानवा लो ॥३॥
दास म्हणे रे तोचि जाणे । सद्गुरुवचने खूण बाणे ॥४॥

९२२.
( राग-भैरवी; ताल-धुमाळी )
चेटक नेटके सजले । मानस हि रिझले ॥ध्रु०॥
सत्य कळेना मिथ्या कळेना । सर्वहि एकचि जाले ॥१॥
जाले ते पालटतचि गेले । अनुमानी पडले ॥२॥
आहे म्हणो तरि नाहीच जाले । नाही म्हणो तरि दिसो लागले ॥३॥
आदि अंत विवंचुनि पाहिले । तयास प्रचिती आले ॥४॥
दास म्हणे जाले होऊनि गेले । त्यासी किती लाविले ॥५॥

९२३.
चेंडु वायोने जाला । आकाशे झेलुनी नेला ।
गोपिकेने कव घातली । कवटाळिला ॥१॥
कृष्ण चेंडु पाहो गेला । पाहतां गटकाविला ।
वेणूचा मधुर ऐकिला । स्वर गोपाळी ॥२॥
वनितावृंद मिळाले । यमुनातटासी आले ।
गोपाळांसी आळंगिले । गोपिका केले ॥३॥
रामदास-दाताराचे । चरित्र नेणवे साचे ।
कृष्णे या चेंडुवाचे । प्राशन केले ॥४॥

९२४.
( चाल-असा धरी छंद० )
तुळजामाता, येऊं पाहते घरा । चौक भरा मोते फुलोरा ।
शुद्ध भावे दंडवत करा ॥ध्रु०॥
जाई जुई चंपक अबई । नाना पुष्पे ढीग ठाईं ठाईं ।
सिंहासनी सुंदर तुकाई ॥१॥
केशर कस्तुरी चुवा चंदन । गव्हले कचोरे अगर बावन ।
ऊद गुलाल नख रातांजन ॥२॥
नाड्या पुड्या कुंकुम अबीर । जवादि पाच शुद्ध कर्पूर ।
सिलारस उदबत्त्या थोर ॥३॥
पाने फुले सुगंध तेले । गर्द माजे एकत्र जाले ।
सुवास घेतां चित्त निवाले ॥४॥
दवना मरवा कुसुंबा कुंबा । पूजिली अंबा अंबा जगदंबा ।
पुष्पमाळा लंबा कदंबा ॥५॥
सांगोपांग यंत्रे उपांग । चटक्या चंग चंग मृदांग ।
माजे रंग रंग सुरंग ॥६॥
अंतर एक शरीरे दोनी । दास म्हणे धन्य भवानी ।
निजपद देते भक्तालागुनी ॥७॥


९२५.
( राग-काफी. ताल-दीपचंदी )
जाग जाग रे बोलती । निजेले वोसणती ॥ध्रु०॥
मी एक निर्फळ निश्चळ । दुसरे चंचळ चपळ ।
तिसरे पंचभूत केवळ ॥१॥
मूळमाया संजीविनी । आदिशक्ती नारायणी ।
नाचे भूतांचे भुवनी ॥२॥
सर्वां घटीं विस्तारेली । शक्ति सर्वांगी व्यापिली ।
सृष्टी घुमोंचि लागली ॥३॥
ब्रह्मादिकांची जननी । माता रामवरदायिनी ।
रामदास ध्यातो मनी ॥४॥

९२६.
( अभंग )
जागा रे जागा जागत । चोरटे आहे वागते ।
साचोल जालिया निश्चिंते । राहणे खोटे ॥१॥
नागवले थोर थोर । तुम्ही काय मजूर ।
लटिकाचि धरुनी आधार । दुश्चित कां रे ॥२॥
पाहो जातां आढळेना । पासूनि दूरी होईना ।
लपोनि बैसले कळेना । जागतयासी ॥३॥
हातींचे हिरोनि नेते । धनपीसे लाविते ।
जागेपण पळोनि जाते । परी जवळीच ॥४॥
रामीरामदासापाशी । आले होते अनायासी ।
मरोनि गेले तयासी । ठावचि नाही ॥५॥

९२७.
( अभंग )
जागा रे जागा जागत । चोरटे आहे वागते ।
साचोल जालिया निश्चिते । राहणे खोटे ॥१॥
नागवले थोर थोर । तुम्ही काय मजूर ।
लटिकाचि धरुनी आधार । दुश्चित कां रे ॥२॥
पाहो जातां आढळेना । पासूनि दूरी होईना ।
लपोनि बैसले कळेना । जागतयासी ॥३॥
हातीचे हिरोनि नेते । धनपीसे लावीते ।
जागेपण पळोनि जाते । परी जवळीच ॥४॥
रामीरामदासापाशी । आले होते अनायासी ।
मरोनि गेले तयासी । ठावचि नाही ॥५॥

९२८.
( पद. राग-जोगी; ताल-दीपचंदी )
जाग जागो रे भाई । जमसे करो लडाई ॥ध्रु०॥
जागो जागो बूझो मायाधंदा झूटा ।
अलख पलख प र यं क र देखो आया काल चपेटा ॥१॥
दृढ भक्तिके सिले पेनो एक भावका घोडा ।
रामनामजपमाला लेवो भगाव कालका पीडा ॥२॥
रामदास प्रभुजीके सेवक कहां सुनो तुम भैया ।
मनुषदेहसो व्यर्थ गवाया अंतकाल पस्ताया ॥३॥

९२९.
( पद; चाल-धांव रे रामराया० )
जाग रे जागल्यांनो तुम्ही सावध व्हा रे ।
काया नगरीची जागल करीत जा रे । जागा रे० ॥१॥
स्वर्गलोकी पाताळी मृत्युलोकींचा वास ।
आतां पाहातां पहातां अवघा होईल नास । जागा रे० ॥२॥
जिवाजी पाटलाची साडे तीन हात माडी ।
तिचाच एक पाय ढांसळील तांतडी ।
तिचीच पांच पोरे मोडील कैकांची खोडी । जागा रे० ॥३॥
जिवाजी पाटलाला आहे बा एक नारी ।
टाकूनि मंचक तीज बैसवी वरी ।
तिचीच एक बटीक ही कारभार करी ।
तिच्याच बुद्धीने नगरी नासली सारी । जागा रे० ॥४॥
जिवाजी पाटलाला तुम्ही सावध करा ।
मनाजी कुलकर्णी गांव बुडविल सारा ।
अवघी या कागदाचे गुज आणिले घरा ।
कोल्होजी बाबाने येऊन मुक्काम केला । जागा रे० ॥५॥
आतां पाहतां पाहतां कसा घोंटाला जाला ।   
डोळसवाडीचा पुर निघुन गेला । कानपुर ओस पडले ।
नाकपूर थबकले । जागा रे० ॥६॥
दांताळवाडीचा ठाव मोडुनि गेला ।
हे लक्षण जाले गांडपुर वाहुं लागले । जागा रे० ॥७॥
पेठकर म्हणती आम्ही वसुल दिला ।
देसाई देशपांडे यांनी वसुल काढिला ।
नगद नारायण यांनी अवतार धरिला ।
संतसंतांनी हा घोटाळा झाला । तप्त तप्त भूमि लावी सांडसे अंगाला ।
रामदास म्हणे स्वामी चुकवा चौर्‍यांशी झोला । जागा रे० ॥८॥

९३०.
( पद; चाल-भूपाळीची )
उठा उठा रे साधक हो । किती साधाल ओझी ।
बहु विलंब लागला । सिद्ध व्हा रे सहजी ॥ध्रु०॥
अवघी रात्री निद्रा केली । अझुनी घुर्मी कां दाटली ।
डोळे उघडूनि तरि पाही । पूर्व दिशा उजळली ॥१॥
आतां सांज जाली । निगुती पाटी पसरिली ।
अविद्याभरे झोंप येते । ऊगीच वटवट मांडिली ॥२॥
आपण झोंप घेईना । निद्रा केली देखवेना ।
याचे संगतीचा कंटाळा । आला बहु बडबड सांडीना ॥३॥
लालुची विषयी तुमची । लुलु सुटेना ।
परी चोराचे आढाळे । पुढे मार्ग फुटेना ॥४॥
येथे कैंचे रे मैंदावे । आह्मां आहे अवघे ठावे ।
ये प्रपंची सुखनिद्रा । मोडोन कोणे उठावे ॥५॥
नलगे आह्मां भक्ति । नलगे आह्मा ज्ञान वैराग्य ।
नलगे तीर्थयात्रा । समाधान अव्यंग ॥६॥
मान आपमानाचे पडिले । भ्रांतीचे घोरी ।
नेत्री उदक विवेकाचे । लाउनि उघडा झडकरी ॥७॥
अत्यंत परिचय तुह्मां । सलगी बोलतो ।
याचा विषाद न मानावा । तुमचे हित सांगतो ॥८॥
नलगे तुमचे हित । आह्मां आहेति सखी ।
त्यांचे आम्ही ऐकों । सलगी आहे ते चित्तासारिखी ॥९॥
न ये ते सांगणे । न पुसतां लाजिरवाणे ।
इतुकेंहि कळेना । त्याचे जळो जळो जिणे ॥१०॥
हा दुसर्‍यास सांगतो । आपण काय रे करितो ।
आम्हां न कळत झोंपा घेतो । सवेंचि जागा होतो ॥११॥
जाईना कां परते । सज्ञान मने न सरते ।
या संताचे पदवी । बैसो नेणे अपुर्ते ॥१२॥
संगति सुटेना । तंवरी बोलणे तुटेना ।
तुम्हां अवघीयांचे सोसीन । परि मी निजो देईना ॥१३॥
रामीरामदास । सकळां उदक देतो ।
जो जो अंगिकार करितो । तो तो जागृती येतो ॥१४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:40.6800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

combustibility

  • स्त्री. दहनक्षमता 
  • स्त्री. दहनक्षमता 
  • ज्वलनक्षमता 
  • स्त्री. ज्वलनक्षमता 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय? ते केव्हां देतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.