मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| उपदेशपर विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - उपदेशपर श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ उपदेशपर Translation - भाषांतर ७२०.रीसाचियेपरी व्हावे सावचित्त । ध्यानी भगवंत सोडुंनये ॥१॥सोडूं नये सर्वकाळ निजध्यास । श्रवणअभ्यास असो द्यावा ॥२॥असो द्यावा सदा सन्निध विवेक । तेणे देव एक चोजवेल ॥३॥चोजवेल देव श्रवणमनने । कुबुद्धि साधने पालटावी ॥४॥पालटावी सर्व देहाची अहंता । शोधावी तत्त्वतां देहबुद्धि ॥५॥देहबुद्धि सर्व ज्ञान शोधूं जातां । निसंगा अनंता भेटी होय ॥६॥भेटी होय ज्ञाने निर्गुण देवाची । मग नाही चीची संसाराची ॥७॥संसाराची चीची यातना यमाची । चुकविता तोचि धन्य एक ॥८॥धन्य एक जनी तोचि तो पाहातां । मुक्ति सायुज्यता जया लाभे ॥९॥जया लाभे मुक्ति सगुणाची भक्ति । दास म्हणे शक्तिआगळा तो ॥१०॥७२१.ज्ञानाचे लक्षण क्रियासंरक्षण । वरी विशेषेण रामनाम ॥१॥रामनाम वाचे विवेक अंतरी । अनुताप वरी त्यागावया ॥२॥त्यागावया भेदा बाह्य लोलंगता । पाहिजे तत्त्वतां अनुताप ॥३॥अनुतापे त्याग बाह्यात्कार जाला । विवेकाने केला अंतरीचा ॥४॥अंतरीचा त्याग विवेके करावा । बाहेर धरावा अनुताप ॥५॥तापे भक्ति विवेक वैराग्य । घडे त्याचे भाग्य काय सांगो ॥६॥काय सांगो भाग्य अचळ चळेना । महिमा कळेना ब्रह्मादिकां ॥७॥ब्रह्मादिकां लाभ ज्ञानाचा दुर्लभ । तो होय सुलभ साधुसंगे ॥८॥७२२.प्रचीतीचा देव सप्रचीत भाव । करावा उपाव सप्रचीत ॥१॥प्रचीतीचा वैद्य प्रचीतीची मात्रा । प्रचीतीच्या मंत्रा पाठकीजे ॥२॥प्रचीतीने कोणी एक ते पाहावे । जन ओळखावे प्रचीतीने ॥३॥प्रचीतीने इष्ट प्रचीतीने मित्र । प्रचीतीने सूत्र कोणी एक ॥४॥कोणी एक कार्य प्रचीती उपाय । दास म्हणे सोय प्रचीतीची ॥५॥७२३.चित्त आहे कैसे मळिण ते कैसे । शुद्ध होते कैसे विचारावे ॥१॥वैद्य ओळखेना रोगहि कळेना । औषध मिळेना प्रचीतीचे ॥२॥अनुमाने देव अनुमाने भक्त । अनुमाने मुक्त अनुमानी ॥३॥अनुमाने केले अनुमाने कल्पिले । निर्फळ जाहले सर्व कांही ॥४॥सर्व कांही बरे प्रचीत आलियां । दास म्हणे वायां अप्रचीती ॥५॥७२४.प्रत्ययाचे ज्ञान तेंचि ते प्रमाण । येर अप्रमाण सर्व कांही ॥१॥सर्व कांही धर्म आणि कर्माकर्म । चुकलियां वर्म व्यर्थ जाती ॥२॥व्यर्थ जाती जन्म ज्ञानावांचुनीया । केले कष्ट वाया निरर्थक ॥३॥निरर्थक जन्म पशूचिये परी । जंव ते अंतरी ज्ञान नव्हे ॥४॥ज्ञान नव्हे सोपे ते आधी पहावे । शाश्वत शोधावे दास म्हणे ॥५॥७२५.प्रचीतीवेगळे मिथ्या सर्व कांही । निर्फळचि पाही अप्रचीती ॥१॥अप्रचीती जेथे फळ कैचे तेथे । निर्फळचि स्वार्थे कासावीस ॥२॥प्रचीतीची वारी जया आंगी वसे । संग्रहाचे पिसे लाभेविण ॥३॥लाभेंविण लाभ मानिला सुलभ । लाभ नाही लोभ प्रगटला ॥४॥प्रगटला लोभ केले निरर्थक । प्रचीति सार्थक दास म्हणे ॥५॥७२६.शाहाणे दिसतां ब्रह्मज्ञानेविण । संसाराचा शीण करुनीयां ॥१॥करुनि संसार रात्रंदिस धंदा । कैसे हो गोविंदा चुकलेती ॥२॥चुकलेती वायां तुम्ही कां बद्ध हो । अंतरी संदेहो जन्मवरी ॥३॥जन्मवरी वोझे वाहिले वाउगे । व्यर्थ कामरंगे रंगोनीयां ॥४॥रंगोनीयां कामी अंतरावे रामी । दास म्हणे उर्मि कामा नये ॥५॥७२७.गगन आडतचि नाही । तैसे निरंजन पाही ॥१॥चंचळगुण ते सगुण । विकारे आडतो पवन ॥२॥सारासार निवडत नाही । प्रत्ययाने पाही कांही ॥३॥७२८.माजी बांधावा भोपळा । तैसी बांधो नये शिळा ॥१॥सारासार निवडावे । तैसे जाणोनियां घ्यावे ॥२॥रत्न खडे येर खडे । सगट देतां प्राणी रडे ॥३॥एके ठायी सोने लाख । लाख देतां मारी हांक ॥४॥मनुष्य गोडे गोड घेते । कडू अवघेंचि सांडिते ॥५॥सदा सज्जनाचा संग । दुर्जनाचा संतत्याग ॥६॥दास म्हणे भक्ति सार । नको अभक्त गव्हार ॥७॥७२९.माजी बांधावा भोपळा । तैसी बांधो नये शिळा ॥१॥घेऊं येते तेंचि घ्यावे । येर अवघेचि सांडावे ॥२॥विषयवल्ली अमरवल्ली । अवघी देवेंचि निर्मिली ॥३॥अवघे सृष्टीचे लगट । करुं नये की सगट ॥४॥अवघे सगट सारिखेच । वाट मोडली साधनाची ॥५॥आवघेंचि केले देव । जे मानेल तेंचि घ्यावे ॥६॥दास म्हणे हरिजन । धन्य जाण ते सज्जन ॥७॥७३०.ऐका नवरस सुंदर सरस । जेणे होय रस सर्वकाळ ॥१॥प्रथम शृंगार दुसरा तो हास्य । तिसरा तो रस करुणेचा ॥२॥रौद्र तो चतुर्थ वीर तो पांचवा । रस तो सहावा भयानक ॥३॥मोहो तो सातवा बीभत्स हा आठवा । लज्जा तो नववा रस जाण ॥४॥रसिक बोलणे रसिकचि गाणे । रसिक वाचणे प्रसंगीत ॥५॥ज्याचे त्याचे परी आवडीसारखे । बोलतां आरीखे लुब्ध होती ॥६॥लुब्ध होती तरी मृदचि बोलावे । नेमस्त चालावे नीतिन्याये ॥७॥नीतिन्याये बहुतेकांसी मानीतो । व्याप करील तो भाग्यवंत ॥८॥भाग्यवंत नर यत्नासी तत्पर । अखंड विचार चाळणेचा ॥९॥चाळणेचा यत्न यत्नाची चाळणा । अखंड शाहाणा तोचि एक ॥१०॥प्रवृत्ति निवृत्ति चाळणा पाहिजे । दास म्हणे कीजे विचारणा ॥११॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP