मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
वाघ्या

भारूड - वाघ्या

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९७३.
( राग-भैरव; ताल-दीपचंदी )
सद्गुरु मार्तंडा । घेऊनि विवेक खंडा ॥ध्रु०॥
चिन्मय पूर्ण स्वयंभा । घेउनि औट हात कोटंबा ॥१॥
भाजुनियां द्वैताला । निश्चय भरित रोडगा केला ॥२॥
येळकोट घे संसारा । बोलुनि उधळुं देहभंडारा ॥३॥
साखळदंड मोहाचा । सोडूनि दिधला श्वान जिवाचा ॥४॥
रामदास हा वाघ्या सोहं भुंकी स्वरुपी जागा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP