मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
नामस्मरण

विविध विषय - नामस्मरण

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.



५७१.
रामाचे चरित्र सांगता अपार । जाहला विस्तार तिही लोकी ॥१॥
तिही लोकी हरे वांटुनी दिधले । ते आम्हा लाधले काही एक ॥२॥
कांही एक भाग्य होते पूर्वजांचे । पापियासी कैचे रामनाम ॥३॥
रामनामे कोटिकुळे उद्धरती । संशय धरिती तेचि पापी ॥४॥
पापियाचे पाप जळे एकसरे । जरी मनी धरे रामनाम ॥५॥
रामनाम काशी शिव उपदेशी । आधार सर्वांसी सर्व जाणे ॥६॥
सर्व जाणे अंती रामनामे गती । आणि वेदश्रुती गर्जताती ॥७॥
गर्जती पुराणे आणि संतजन । करावे भजन राघवाचे ॥८॥
राघवाचे ध्यान आवडे कीर्तन । तोचि तो पावन लोकांमध्ये ॥९॥
लोकांमध्ये तरे आणि जना तारी । धन्य तो संसारी दास म्हणे ॥१०॥

५७२.
काय करावे ते संपत्तीचे लोक । जानकीनायक जेथे नाही ॥१॥
जेथे नाही माझा श्रीराम समर्थ । त्याचे जिणे व्यर्थ कोटि गुणे ॥२॥
कोटि गुणे उणे जिणे त्या नराचे । जानकीवराचे नाम नाही ॥३॥
नाम नाही मनी रुप नाही ध्यानी । तया कां जननी प्रसवली ॥४॥
प्रसवली जननी जाला भूमिभार । दुस्तर संसार उल्लंघेना ॥५॥
उल्लंघेना एका रामनामेंविण । रामदास खूण सांगतसे ॥६॥

५७३.
राघवाचे नाम राखशील जरी । तुज राखे तरी देवराणा ॥१॥
देवराणा माझे जीवनाचे जीवन । आवडीने खूण सांगतसे ॥२॥
सांगतसे खूण माझे अंतरीची । सर्वहि सुखाची सुखमूर्ति ॥३॥
सुखमूर्ति राम सोडूं नको कदा । तुज तो आपदा लागो नेदी ॥४॥
लागो नेदी कष्ट आपुल्या दासासी । रामीरामदासी साहाकारी ॥५॥

५७४.
रामीचे भजन तेंचि माझे ज्ञान । तेणे समाधान पावईन ॥१॥
रामासी वर्णितां देही विदेहता । जाली तन्मयता सहजचि ॥२॥
राघवाचे रुप ते माझे स्वरुप । तेणे सुखरुप निरंतर ॥३॥
रामदास म्हणे मज येणे गती । राम सीतापतीचेनि नामे ॥४॥

५७५.
पळशी तूं तरी नाम कोठे नेशी । आम्ही अहर्निशी नाम घोकूं ॥१॥
आम्हापासोनियां जातां नये तुज । ते हे वर्म बीज नाम जपूं ॥२॥
देवा आम्हां तुजे नाम हो पाहिजे । मग भेटी सहजे देणे लागे ॥३॥
भोळे भक्त आम्ही चुकलेचि कर्म । सांपडले वर्म रामदासा ॥४॥

४७६.
रामउपासक तोचि एक धन्य । जो कोणी अनन्य रामनामी ॥१॥
रामनामी भाव जयाचा केवळ । येर खळखळ आवडेना ॥२॥
नावडती मंत्र विविध विचित्र । जया यंत्र तंत्र रामनाम ॥३॥
रामनाम धर्म रामनाम अर्थ । चारीहि पुरुषार्थ रामनाम ॥४॥
रामनाम जप रामनाम तप । शुद्ध हे स्वरुप रामनाम ॥५॥
रामनाम शुद्धि रामनाम बुद्धि । सर्वशास्त्रविधि रामनाम ॥६॥
रामनाम योग रामनम याग । सर्वस्वाचा त्याग रामनाम ॥७॥
रामनाम गती रामनाम मती । आदि मध्य अंती रामनाम ॥८॥
रामनामे येणे कृतकृत्य होणे । रामदास म्हणे स्वानुभवे ॥९॥

५७७.
राम म्हणतं सुटे साठी । ब्रह्म लाभे फुकासाठी ॥१॥
रामनामी भाव । धरी संती सांगितले ॥२॥
रामीरामदास म्हणे ॥ न मानी त्याचे दैव उणे ॥३॥

५७८.
एवढा लाभ फुकासाठी ॥ ०कोणा देववेल पाठी ॥१॥
करितं नामाचा गजर ॥ जोडे वैकुंठाचा धुर ॥२॥
योग याग नलगे तप ॥ केवळ हरिनामाचा जप ॥३॥
रामीरामदास म्हणे ॥ स्वानुभवाचेनि खुणे ॥४॥

५७९.
रामनाम कामधेनु ॥ दोहितसे पंचाननु ॥१॥
पुरवी मनाची कामना ॥ सेखी वोळली उन्मना ॥२॥
नामामृतसंजीवनी ॥ मृत्यु निरसला सज्जनी ॥३॥
रामनाम चिंतामणी ॥ दास निश्चिंत स्मरणी ॥४॥

५८०.
परिसा निंदानींची मातृका । सप्रचीत तिही लोकां ॥१॥
राम अक्षरे ये दोनी । सेवा भावाच्या अनुपानी ॥२॥
हेंचि भेषज विश्वनाथ । कर्णी घालुनी करी मुक्त ॥३॥
आधी शंकरे सेविले । विषा प्रतीतीस आले ॥४॥
ऐसे सप्रतीत प्रसिद्ध । सर्वकाळ स्वतःसिद्ध ॥५॥
विनवी रामीरामदास । हे उपतिष्ठे भाविकांस ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP