मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| पंचीकरण विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - पंचीकरण श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ पंचीकरण Translation - भाषांतर ७३१.माणुसाचे ब्रह्म होते कोणेपरी । ऐसे तूं विचारी आलया रे ॥१॥आलया माणुस हे कोणा म्हणावे । बरे हे जाणावे शोधुनीयां ॥२॥शोधुनीयां पाहतां स्थूळाचा चाळक । सूक्षमाचा एक मनप्राण ॥३॥मनप्राणेविण हे कांही घडेना । हेंचि आणा मना विवेकी हो ॥४॥विवेकी हो तुम्ही विवेक पहावा । संसाराचा गोंवा कोण करी ॥५॥कोण करीतसे सर्वही करणी । दास निरुपणी सावधान ॥६॥७३२.माणुसाचे ब्रह्म शोधितां होईल । प्रचीती येईल रोकडीच ॥१॥रोकडी प्रचीती होते गुरुमुखे । फुका सर्व सुखे हातां येती ॥२॥हातां येती बीजे सज्जनाची गुजे । प्रचीतीच्या भोजे आनंदला ॥३॥आनंदला प्राणी सज्जन सेवितां । क्षुधायी जेवितां तृप्त होती ॥४॥तृप्त जाली बुद्धि निर्गुणाची शुद्धि । लागतां समाधी रामदासी ॥५॥७३३.चारी देह पिंडी चत्वार ब्रह्मांडी । अष्ट देह प्रौढी बोलिजेल ॥१॥बोलिजेल श्रोती अवधान द्यावे । दुश्चित नसावे निरुपणी ॥२॥निरुपणी अष्ट देह ते कवण । स्थूळ लिंग जाण कारण तो ॥३॥चौथा देह जाण तो महाकारण । पांचवे लक्षण विराटाचे ॥४॥हिरण्यगर्भ हेत आणि अव्याकृत । आठवा निश्चित मूळमाया ॥५॥जन्म अष्टदेही साक्षी तो विदेही । रामदासी नाही जन्ममृत्यु ॥६॥७३४.भूतपंचकाचे पंचवीस गुण । याचे स्थूळ जाण उभारले ॥१॥उभारले स्थूळ पांचा पंचकांचे । तेंचि तूं हे साचे केंवि घडे ॥२॥केंवि घडे दृष्टा दृश्य एकरुप । दृष्ट्याचे स्वरुप वेगळेंचि ॥३॥वेगळेंचि जाण अस्थि मांस त्वचा । विस्तार भूतांचा जाणताहे ॥४॥जाणताहे द्रष्टा स्थूळाचा जाणता । विदेही तत्त्वता दास म्हणे ॥५॥७३५.काम क्रोध शोक मोह आणि भय । पंचधा अन्वय आकाशाचा ॥१॥धांवण चळण आणि आकोंचन । वायो प्रसरण निरोधन ॥२॥क्षुधा तृषा निद्रा मैथुन आलस्य । तेजाचे हे अंश पंचविधा ॥३॥लाळ मूत्र शुक्र रक्त आणि मज्जा । आप जाण बोजा पंचविधा ॥४॥अस्थि मांस त्वचा नाडी रोम अंश । दास म्हणे वास देहातीत ॥५॥७३६.पृथ्वी आप तेज वायु ते आकाश । पांचाचे हे अंश पंचवीस ॥१॥अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोम । आपाचेंही वर्म सांगईन ॥२॥शुक्लीत शोणित लाळ आणि मूत्र । स्वेद हे निश्चित पांच तत्त्वे ॥३॥क्षुधा तृषा जाण आलस्य शयन । पांचवे मैथुन तेज साचे ॥४॥चळण वळण आणि प्रसारण । वायो निरोधन आकोंचन ॥५॥काम क्रोध शोक मोह आणि भय । स्थूळ देहान्वय पंचवीस ॥६॥पंचवीस तत्त्वी स्थूळ देह वर्तत । ऐके सावचीत लिंगदेह ॥७॥अंतःकरण मनबुद्धि आणि चित्त । पांचवा निश्चित अहंकार ॥८॥प्राण आणि अपान व्यान आणि उदान । समान हे जाण पंच वायो ॥९॥चक्षु श्रोत्र घ्राण आणि त्वचा । अंश हा तेजाचा ज्ञानेंद्रिये ॥१०॥वाचा पाणी पाद शिस्न आणि गुद । आपचि प्रसिद्ध कर्मेंद्रिये ॥११॥शब्द स्पर्श रुप रस आणि गंध । पांचही प्रसिद्ध विषय हे ॥१२॥ऐसे पंचवीस लिंगदेही अंश । हेंचि पांचही तत्त्वे जाली ॥१३॥७३७.अंतःकरण मन बुद्धि आणि चित्त । दृढ सावचित्त अहंकार ॥१॥व्यानु तो समानु उदानु तो प्राणु । पांचवा अपानु वायु जाण ॥२॥श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा आणि घ्राण । तेज अंश जाण पंचविधा ॥३॥वाचा पाणि पाद शिस्न आणि गुद । आपाचे प्रसिद्ध पंचगुण ॥४॥शब्द स्पर्श रुप रस आणि गंध । पृथ्वी हे विशद दास म्हणे ॥५॥७३८.जडत्व कठिण ते ते पृथ्वी जाण । मृदु ओलेंपण जळ आप ॥१॥आप नाना रस धातु बहुवस । उष्णता तेजस तेंचि तेज ॥२॥वायु स्तब्ध चळ आकाश निश्चळ । मायिक सकळ दास म्हणे ॥३॥७३९.होते आठवण तेंचि अंतःकरण । आतां सावधान मन ऐका ॥१॥संकल्प विकल्प होय नव्हे वाटे । तेंचि मन खोटे काल्पनिक ॥२॥होय नव्हे ऐसा अनुमान जाला । निश्चयोचि केला तेचि बुद्धि ॥३॥निश्चयचि केला याचेंचि चिंतन । तेंचि चित्त जाण निश्चयेंसी ॥४॥अहंकारासवे देह चालताहे । दास म्हणे पाहे अनुभवे ॥५॥७४०.श्रोत्री अंतःकरण त्वचेमध्ये मन । चक्षूंमध्ये जाण बुद्धि आहे ॥१॥जिव्हेमध्ये चित्त नाना स्वाद पाहे । घ्राणामध्ये आहे अहंकार ॥२॥सूक्ष्माचे मूळ शोधुनी पहावे । वर्म पडे ठावे दास म्हणे ॥३॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP