TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
लपंडाव

भारूड - लपंडाव

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


लपंडाव
९७२.
( राग-श्रीराग; ताल-धुमाळी )
लपंडाई आणि डाई । दिसेना की ठाईंचे ठाई ।
डाई येतां होते भंडाई ॥ध्रु०॥
आहे आहे आहे की नाही । नाही नाही विवेके पाही ।
सावधानपणे तूं राही ॥१॥
जवळीच परी आडळेना । अनुमाने ठाई पडेना ।
ज्ञानदृष्टीवीण कळेना ॥२॥
घरामधे बाहेरी येतो । येतो जातो परी दिसेना तो ।
देतो घेतो परी कळेना तो ॥३॥
खेळ मोडा पिंपळ तोडा । म्हातारीचे डोचके फोडा ।
फोडीना तो जाणावा वेडा ॥४॥
जाणतया डाई चुकली । नेणतया ठाकुनि आली ।
गैब दास डाई बिडाली ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:46.5370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तनखा

  • पु. १ तंखा . सरकारी तिजोरीतून रक्कम देण्याचा हुकूम ; वरात ; सरकारी वसुलांतून तोडून दिलेले उत्पन्न . २ प्राचीनकाळांत आदिलशहाने बसविलेली जमाबंदी , पट्टी . ही अकबराच्या कारकीर्दीत तोडरमल्ल याने पुन्हा दुरुस्त केली . मलिकंबराने केलेल्या प्रतबंदीस तनखा व भाऊंनी बसविलेल्या पट्टीस कमाल म्हणत . तनखाही हर्दू तपियाचा दिवाणांत देत नाहीस . - रा १५ . २७१ . ३ औरंगजेबाच्या कारकिर्दीत मक्केला यात्रेकरुंना नेणारी जहाजे सुरतच्या बंदरात जी असत त्यांच्या खर्चासाठी तोडून दिलेला वसूल . ४ वसूल ; एखाद्या गांवचा , परगण्याचा जमाबंदीचा , वसुलाचा तक्ता . ५ स्वामित्व ; हक्क . ६ संबंध . ( क्रि० तोडणे ; तोडून टाकणे ). त्या गृहस्थाने आपल्या बायकोचा तनखा तोडून टाकला . ७ पगार ; वेतन . ८ खर्ची . तुम्हाकडे सर्दारमुलुक बहादूर यांनी पर्गणे पालीम येथील ऐवजी तन्खा केली त्या बाबत ऐवज येणे . रा . २२ . १०१ . [ फा . तन्ख्वाह ] सामाशब्द - दास्तान - पु . वसुलाचा सांठ , गल्ला . गडोगडी तनखा , तनखादास्तान , इस्ताद आदिकरुन गडाच्या प्रयोजनाची वस्तुजात गडास संग्रह करुन ठेवावेच लागते . - मराआ ३४ . [ तनखा + फा . दाश्तन = सांठा ] 
  • m  An assignment on the revenues. Claim in; connection with. A standard rent-roll. 
  • ना. पगार , मानधन , वेतन , रोजंदारी . 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site