मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
डांका

भारूड - डांका

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९४८.
( अभंग )
पहिला देव तो बद्धाचा । दुसरा देव तो मुमुक्षाचा ।
तिसरा देव तो साधकाचा । चवथा देव तो वेगळा ।
अगम्य त्याची लीळा ॥१॥
पहिला गुण महेशाचा । दुसरा गुण तो ब्रह्म्याच ।
तिसरा गुण तो विष्णूचा । चौथा गुण तो वेगळा ।
अगम्य त्याची लीळा ॥२॥
पहिला भक्त तो कायेचा । दुसरा भक्त तो वाचेचा ।
तिसरा भक्त तो मनाचा । चौथा भक्त तो वेगळा ।
अगम्य त्याची लीळा ॥३॥

९४९.
( पद; राग-कल्याण; ताल-धुमाळी )
रंगा येईं वो रघुनाथे शंकरकुळदैवते । जागविली ज्योती वृत्ती पुढारु दिल्हा ।
दीप्तिभूमिके आसन तुझा डोलारा केला ॥१॥
उचलले दैवत येइल जाइल काई । हृदयस्थ राघव देही प्रगट होई ॥२॥
इतर दैवते जाण घुमविती भोगी । स्वानुभवे भरणे आम्हां तुझिये आंगी ॥३॥
उन्मेषाची डांक सरळ लागली बरी । मोडीत देहचत्वारी संचरली एकसरी ॥४॥
श्रवणी त्रिविध जन जत्रा मिळाली । संसारगार्‍हाणे कैसी उगविती जाली ॥५॥
मीपणाची आरती ओंवाळीन तुज । तूंपण पुसवणे त्वां सांगावे निजगुज ॥६॥     
निरंजन एकाएकी असतां बसला डचक । मायराणीच्या लागभूती घेतले भौतिक ॥७॥
मागसील ते करीन सोडवी लागतसे तव पदी । सोडविसी मांडविसी तेथे धरीन सद्बुद्धि ॥८॥
चौर्‍यांशीचे मेळे खोळे पडिला प्राणी । पांचांचा झळंब वेंवलासे निर्वाणी ॥९॥
अर्थाअर्थी होउनि दिधला भावाचा बळी । बद्धत्व निरसुनी मुक्त केले तत्काळी ॥१०॥
सोडणे नलगे नलगे देह छेदावा । मोकळे करीन करीन मज भाव एक व्हावा ॥११॥
सरला भोग आतां लळीत जाले । रामीरामदासी बरवे सार्थक केले ॥१२॥

९५०.
( अभंग )
मुंजा नरसिंह वेल्हाळ । माथां सोनसळे कुरळ ।
पायीं घागरियाचा चाळ । ठायी ठायी नाचतु ॥ध्रु०॥
सदा पिंपळी राहणे । भाव भक्तांचा पहाणे ।
नवस करुनि बुडवणे । तेणे गुणे कष्टती ॥१॥
देव भाकेसी बळकट । भक्ता सांभाळी निकट ।
रागे करुनि तळपट । निंदक दुर्जने मारी ॥२॥
देव भावे वोळगावा । भावभक्तीने पूजावा ।
नवस लवकरी फेडावा । दास म्हणे पावेल ॥३॥

९५१.
( अभंग )
तुळजाकुमारीच्या रुपे । अथवा बायकोच्या रुपे ।
नानाप्रकारी स्वरुपे । भक्तांलागी दाखवी ॥१॥
भक्तां प्रसन्नचि होते । चुकती ख्यानती लाविते ।
प्रचीत रोकडी दावीते । भक्तिभावासारखी ॥२॥
दास म्हणे चुको नये । देवापाशी उणे काय ।
तूर्त अपाय उपाय । दोन्ही सिद्ध असती ॥३॥

९५२.
( अभंग )
जटा माथ्याच्या विशाळ । नेत्रांमध्ये अग्निज्वाळ ।
दाढा भ्यासुर विक्राळ । भयासुर भगवती ॥१॥
काळी जीभ काळे होट । काळे रात्री धांवे नीट ।
खाऊं खाऊं लखलखाट । पांचवे दिशी झडपिते ॥२॥
जनी सांभाळी भक्तासी । तेव्हां राखे बाळकासी ।
खरे बोलावे देवासी । खोटे कामा नये रे ॥३॥

९५३.
( पद; राग-भैरव; ताल-धुमाळी )
बाह्याकार कामा नये रे । अंतरतो उपाय ॥ध्रु०॥
हरीहर ब्रह्मादिक । देवऋषी इंद्रादिक ।
त्रिलोकींचे सकळीक ॥१॥
देव आकाशी पाताळी । देव नांदे तिही ताळी ।
देव भूती अंतराळी ॥२॥
भूमंडळी नाना घरे । त्या घरांत शरीरे ।
त्या शरीरांत विवरे ॥३॥
देव आपण एकला । सकळांसि पुरवला ।
तो पाहिजे ओळखिला ॥४॥
रामीरामदास म्हणे । अंतरंगे ओळखणे ।
तेणे चुके येणेजाणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP